वर्षभरासाठी आपण तांदूळ आणताे आणि अगदी सगळी काळजी घेऊन साठवून ठेवताे. पण काही काळाने कधीतरी चुकून ओला हात लागतो किंवा तांदूळ भरताना काहीतरी राहून जातं आणि मग तांदळात किडे, अळ्या होण्यास सुरुवात होते. याचा लगेचच बंदोबस्त केला तर उत्तम. नाहीतर मग हळूहळू त्याचंं प्रमाण वाढत जातं आणि मग तांदूळ साफ करणं कठीण हाेऊन जातं. एवढ्या महागड्या धान्याचं नुकसान होऊ नये म्हणून हे काही घरगुती उपाय करून बघा. काही किडे, अळ्या असतील तर निघून जातील आणि तांदूळ स्वच्छ होईल. (how to store rice)
तांदूळात किडे, अळ्या झाल्यास हे घरगुती उपाय (how to remove insects from rice?)१. जर अळ्या किंवा किडे यांचं प्रमाण कमी असेल तर सगळा तांदूळ एकदा चाळणीने चाळून घ्या. तांदूळ भरताना त्याला बोरीक पावडर लावा आणि नंतरच भरा. हे करताना हात किंवा तांदळाची बरणी, कोठी यांना कुठेही ओलसरपणा नको. २. तांदूळ ज्या कोठीत भरणार आहात त्या कोठीच्या तळाशी आणि मध्येमध्ये कडुनिंबाची पानं टाका. तांदूळ आणि कडुनिंबाची पाने असे थर एकमेकांवर देऊन ठेवा.
३. काडेपेटीच्या काडीमध्ये असणारे सल्फर धान्याला लागलेली कीड घालविण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे तांदूळाच्या डब्याभोवती काडेपेटी ठेवा. त्या वासानेही कीड, अळ्या होणार नाहीत.
वर्षभराचं धान्य घ्यायचं पण कीड लागण्याची, अळ्या होण्याची भीती वाटते? करा ९ गोष्टी, धान्य राहील सुरक्षित४. तांदूळाच्या डब्यात लवंगा टाकून ठेवणे हा देखील कीड, अळ्या घालविण्याचा एक चांगला उपाय आहे. यासाठी साधारण १० किलो तांदूळ असतील तर त्यात अर्धी वाटी लवंगा घालून ठेवाव्या. लवंगाचा वास गेला की पुन्हा त्या लवंगा काढून नविन फ्रेश लवंगा टाकाव्या.
५. तांदळातील कीड, अळ्या काढून टाकण्यासाठी स्वयंपाक घरातील मसाल्यात असणारे तेजपान किंवा तमालपत्रदेखील उपयुक्त ठरते. ६. यासोबतच लसणाच्या पाकळ्या देखील तांदूळातील अळ्या, किडे कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यासाठी लसूण पाकळ्या मोकळ्या करा. त्यांची टरफलं काढू नका. या पाकळ्या तांदूळात ठिकठिकाणी टाकून ठेवा. साधारण दर १० ते १५ दिवसांनी जुन्या पाकळ्या काढून नव्या लसूण पाकळ्या टाकाव्या. किडे, अळ्या कमी होऊन तांदूळ वर्षभर सुरक्षित राहील.