पावसाळ्याच्या दिवसांत घरात डास, पाली माश्यांबरोबरच झुरळांचा वावर वाढतो. कारण या वातावरणात किटक नेहमी आडोश्याच्या शोधात असतात. अशावेळी पाली घरात प्रवेश करतात. घरात किचन ओट्याजवळ अन्नाचे कण पडले असतील किंवा खरकटं पडलं असेल तर त्या ठिकाणी लगेचच बारीक बारीक धुरळं तयार होतात. तर कधी फ्रिजमधल्या अन्नावरही झुरळं येतात. (Home Remedies Will Help To Get Rid Of Cockroaches) झुरळांचा वावर घरात वाढल्याने गंभीर स्थिती उद्भवू शकते. झुरळांना पळवण्यासाठी लागणारे केमिकल्स शरीरासाठी हानीकारक ठरू शकतात. अशा स्थितीत घरगुती उपाय तुम्ही झुरळांपासून सुटका मिळवू शकता.
भारतीय जेवणात तमालपत्र खूपच महत्वाचे असते. यामुळे जेवणाला चव येते पण तमालपत्राचा वापर करून तुम्ही घरातील किटकांना दूर ठेवू शकता. जसं की तमालपत्राचा वास तीव्र असल्यामुळे याच्या वासाने झुरळं दूर पळतात.
बोरिक पावडर झुरळांना दूर पळवण्याचा एक सोपा उपाय आहे. पीठात बोरीक पावडर मिसळून याच्या गोळ्या तयार करा. या गोळ्या अशा ठिकाणी ठेवा जिथे झुरळं किंवा किडे येतात. त्यानंतर तुम्हाला झुरळं गायब झालेली दिसतील.
बेकिंग सोडा अनेक घरांमध्ये वापरला जातो. बेकिंग सोडा झुरळांना पळवण्याचा एक उत्तम उपाय आहे. एक कप पाण्यात बेकिंग सोडा आणि थोडी साखर मिसळा. हे पाणी अशा ठिकाणी ठेवा जिथे झुरळं येतात. या उपायाने झुरळं दूर पळतील.
लवंग झुरळांना दूर पळवण्यासाठी फायदेशीर ठरतात. याचा वापर तुम्ही किचनमध्ये करू शकता. ज्या ठिकाणाहून झुरळं किडे येतात त्या ठिकाणी हा घरगुती उपाय केल्याने फायदे मिळतील.
रॉकेलचा गंध खूप तीव्र असतो. घरात केरोसिन असेल तर त्याचे काही थेंब स्वयंपाकघराच्या कानाकोपऱ्याला घाला. याच्या वासाने झुरळं घरात येणार नाहीत.