ऋतू कोणताही असो आपल्या आजूबाजूला डास कायमच भुणभुणत असतात. डास घरात येऊन आपल्याला चावतात. डास चावल्याने होणारे संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी डास पळवण्याचे विविध उपाय आपण करतो. दिवसभर गुड नाइट वापरणं किंवा डास पळवणाऱ्या कॉईल जाळणं हे उपाय करूनही जर डास चावतच (Home Remedy for Mosquito Bites) राहिले तर डास जवळ येऊ नये, चावू नये म्हणून अंगाला मॉस्किटो रिपेलण्ट लावले जाते. बहुतेक लोकांच्या घरात मॉस्किटो किलर लिक्विड कॉइल व मशीन सकाळपासून रात्रीपर्यंत सुरूच असते. अशा परिस्थितीत, या क्रिम्समुळे डासांचा त्रास तर कमी होतोच परंतु त्याचे त्वचेवर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात(Genius Home Remedy For Mosquito Bites That Really Work).
मॉस्किटो रिपेलण्टमध्ये अनेक प्रकारच्या रासायनिक घटकांचा भरपूर वापर केलेला असतो. हे घटक आपल्या त्वचेसाठी हानिकारक मानले जातात. बाजारात उपलब्ध असलेल्या मॉस्किटो रिपेलेंटमध्ये अनेक रसायने असतात आणि ती डासांसाठी प्रभावी असतात, परंतु आपल्या स्किनसाठी ते फायदेशीर नसते. याचबरोबर, मॉस्किटो (Use a banana peel for mosquito bites) किलर लिक्विडमध्ये बाष्पयुक्त रसायने असतात जे डासांना मारण्याचे काम करतात. डास मारण्याच्या वेगवेगळ्या प्रॉडक्टसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक केमिकल्स व विषारी द्रव्य असतात, ज्यामुळे आरोग्याची हानी होऊ शकते. खरंतर सतत चावणाऱ्या डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण या विषारी, केमिकल्सयुक्त प्रॉडक्टसचा वापर करतो. अशावेळी आपण घरातील नेहमीच्या वापरातील काही नैसर्गिक पदार्थ वापरून या डासांना घराबाहेर पळवून लावू शकतो(Banana Peel For Mosquito Bites 6 Ways To Use The Discarded Peel).
मच्छर, डासांपासून बचाव करण्यासाठी केळ्याच्या सालींचा वापर...
१. केळीच्या सालींच्या वासाने डास दूर पळतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी खोलीच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात केळीची सालं ठेवा, यामुळे डासांच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
२. केळीची सालं मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करा. घराच्या ज्या कोपऱ्यांमध्ये डास जास्त प्रमाणांत असतात त्या ठिकाणी ही पेस्ट एका वाटीत ठेवा. केळीच्या सालीची पेस्ट डासांना दूर ठेवण्यास मदत करते.
डास चावल्यामुळे चेहऱ्यावर - हातापायांवर पुरळ येते, आग होते, खाज सुटते? ५ सोपे घरगुती उपाय...
३. एका वाटीत केळीच्या साली घेऊन त्या जाळून त्याचा धूर सर्व घरात पसरवून घ्या. या वासाने डास घरातून बाहेर पळून जातात. केळीची साले जाळून थोड्या वेळासाठी खोलीत ठेवा, यामुळे डासांपासून सुटका मिळते.
४. डास चावल्यानंतर आपली त्वचा लालसर होऊन त्या भागातील त्वचा थोडी जाड होते, अशावेळी त्या भागावर केळीची सालं हलकेच चोळून घ्यावी. केळीच्या सालीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात यामुळे त्वचेचे रक्षण केले जाते.
दिवाळीसाठी झटपट वाती करण्याच्या ३ ट्रिक्स, किचकट काम करा फक्त १० मिनिटांत आणि वातीही होतील सुंदर...
५. केळीच्या सालीत असणारे लांब आणि बारीक रेषांसारखे तंतू एका बाऊलमध्ये घेऊन त्यात गुलाबपाणी मिसळून ते एकत्रित मिक्सरमध्ये बारीक वाटून पेस्ट तयार करून घ्यावी. डास चावलेल्या भागावर ही पेस्ट लावून ठेवावी. यामुळे त्वचेचा दाह कमी होऊन त्वचेचे संरक्षण केले जाते.
६. केळीच्या सालीत असणाऱ्या रेषांसारखे तंतू घेऊन त्यात ग्लिसरीन मिसळून हे एकत्रित मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट एखाद्या क्रिम प्रमाणेच आपण त्वचेला लावू शकतो. यामुळे डासांपासून त्वेचेचे संरक्षण केले जाते.