Lokmat Sakhi >Social Viral > कपड्यांवरचे हट्टी डाग काढण्याचा १ सोपा उपाय ; १० मिनीटांत कपडे दिसतील नव्यासारखे

कपड्यांवरचे हट्टी डाग काढण्याचा १ सोपा उपाय ; १० मिनीटांत कपडे दिसतील नव्यासारखे

Home Remedy to Remove Stains on Clothes : घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून हा उपाय होणारा असल्याने त्यासाठी फारसा खर्चही येत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2023 11:47 AM2023-04-11T11:47:40+5:302023-04-11T11:49:15+5:30

Home Remedy to Remove Stains on Clothes : घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून हा उपाय होणारा असल्याने त्यासाठी फारसा खर्चही येत नाही.

Home Remedy to Remove Stains on Clothes : 1 easy solution to remove stubborn stains on clothes; Clothes will be white in 10 minutes | कपड्यांवरचे हट्टी डाग काढण्याचा १ सोपा उपाय ; १० मिनीटांत कपडे दिसतील नव्यासारखे

कपड्यांवरचे हट्टी डाग काढण्याचा १ सोपा उपाय ; १० मिनीटांत कपडे दिसतील नव्यासारखे

घाईगडबडीत खाताना किंवा आणखी काही करताना आपल्या कपड्यांवर नकळत डाग पडतात. अनेकदा हे डाग इतके चिकट असतात की काही केल्या ते निघत नाहीत. कपडे पांढरे किंवा फिकट रंगाचे असले तर हे डाग जास्त उठून दिसतात. अशावेळी आपल्याला एकदम ओशाळल्यासारखे होते. हे कपडे आपण घरी आल्यावर धुवायला टाकतो. मात्र वॉशिंग मशीनमध्ये हे डाग निघतातच असे नाही. बरेचदा कपडे साबण लावून किंवा अन्य काही सोल्यूशन लावून ब्रशने कितीही घासले तरी हे डाग निघत नाहीत (Home Remedies to Remove Stains on Clothes).  

हे डाग तेलाचे, शाईचे, मसाल्याचे किंवा आंब्याचे असतात. हे डाग गडद असले तर ते उठून दिसतात आणि लवकर निघतही नाहीत. कपड्यांवर एकदा डाग तसेच राहीले की नंतर ते कापडात मुरतात आणि मग काही केल्या ते निघत नाहीत. कपडे महागाचे असतील तर आपण ते ड्रायक्लिनिंगला टाकतो. पण हल्ली ड्रायक्लिनिंगचे रेटही खूप जास्त वाढले असल्याने आर्थिक गणित वाढत जाते. अशावेळी घरच्या घरी कपड्यांवरचे डाग काढण्यासाठी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून हा उपाय होणारा असल्याने त्यासाठी फारसा खर्चही येत नाही. आता हे डाग काढण्यासाठीचे सोल्यूशन कसे तयार करायचे आणि त्याचा कसा वापर करायचा ते पाहूया.

१. एका वाटीत १ चमचा बेकींग सोडा घेऊन त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा. 

२. त्यामध्ये १ चमचा व्हाईट व्हिनेगर मिसळायचे. 

३. मग यामध्ये कोणतीही डीश वॉश जेल मिसळायची आणि थोडं पाणी घालायचं.


४. हे सगळे मिश्रण एखाद्या चमच्याने चांगले एकजीव करुन घ्यायचे. 

५. त्यानंतर कपड्याला ज्याठिकाणी डाग पडलेला आहे त्याठिकाणी हे मिश्रण लावायचे.

६. खराब झालेल्या टूथब्रशने हा डाग घासायचा. अगदी काही मिनीटांत हा डाग निघायला मदत होते आणि कपडा पहिल्यासारखा स्वच्छ होतो. 

Web Title: Home Remedy to Remove Stains on Clothes : 1 easy solution to remove stubborn stains on clothes; Clothes will be white in 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.