Join us

महागडे रुम फ्रेशनर कशाला? फक्त २० रुपयांत घरीच तयार करा घर सुगंधी ठेवणारं फ्रेशनर.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2023 15:28 IST

Homemade Room Freshner: घर सुगंधी ठेवण्यासाठी आता महागडे रुम फ्रेशनर आणण्याची काहीच गरज नाही... हा एक सोपा उपाय पाहा...

ठळक मुद्देबघा हा सोपा उपाय केल्याने तुमचं घर कसं सुगंधित राहील आणि ते ही फक्त २० रुपयांत 

काही काळापुर्वी स्वत:ला सुगंधित ठेवण्यासाठी अत्तराचा वापर व्हायचा. महिला केसांमध्ये गजरा माळायच्या. आता त्या अत्तराची जागा परफ्यूम आणि डिओ यांनी घेतली. तसेच पुर्वी घर सुगंधित ठेवण्यासाठी उदबत्ती, धूप किंवा केवडा, जाई- जुई अशा सुगंधी फुलांचा वापर व्हायचा. त्या जागी आता महागडे रुम फ्रेशनर आले आहेत. काही कार्यक्रमानिमित्त किंवा पाहूणे येणार असल्यावर, सणावाराच्या दिवशी वातावरण सुगंधी आणि प्रसन्न व्हावे म्हणून आपण घरात रुम फ्रेशनर हमखास वापरतो. पण दरवेळी एवढे महागडे फ्रेशनर वापरण्याची गरज नाही. त्याऐवजी आता हे फक्त २० रुपयांत (Homemade room freshner just in 20 Rs) घरच्याघरी तयार होणारे रुम फ्रेशनर वापरून पाहा. (How to make natural room freshner at home?)

 

घरच्याघरी रुम फ्रेशनर कसं तयार करायचं?

घरच्याघरी अगदी स्वस्तात मस्त रुम फ्रेशनर कसं तयार करायचं याविषयीचा एक व्हिडिओ world_of_chetana या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

शिल्पा शेट्टी करतेय मुलासोबत व्यायाम, बघा मुलाला नेमकं शिकवतेय तरी काय- व्यायामाचा हा कोणता प्रकार?

घरीच रुम फ्रेशनर तयार करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला दोन प्लास्टिकच्या साध्या डब्या, रॉक साल्ट, कपडे सुगंधी ठेवणारं कपड्यांचे क्लिन्झर, ६ ते ७ लवंग आणि ४ ते ५ कापूर वड्या लागणार आहेत. 

प्लास्टिकच्या ज्या डब्या आपण घेणार आहोत, त्याची झाकणं पक्की पाहिजेत. एक खिळा गरम करा आणि डब्यांच्या झाकणारा ७ ते ८ छिद्र पाडा.

 

आता डबीमध्ये अर्धी डबी भरली जाईल एवढे रॉक साल्ट टाका. त्यात २ ते ३ टेबलस्पून कपडे सुगंधित ठेवणारं लिक्विड टाका. 

त्याच्यावर लवंगा आणि सगळ्यात वर कापूर अशा पद्धतीने ते रचून घ्या.

नवरात्रीत देवीच्या नैवेद्याला करा साजूक तुपातला बदामाचा शिरा... बघा एकदम सोपी- चवदार रेसिपी 

डब्यांची झाकणं लावून टाका आणि या डब्या तुमच्या खोल्यांमध्ये ठेवून द्या. ही डबी तुम्ही तुमच्या गाडीतही ठेवू शकता.

बघा हा सोपा उपाय केल्याने तुमचं घर कसं सुगंधित राहील आणि ते ही फक्त २० रुपयांत 

 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी