देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमीच ट्रेण्डी आणि हॉट फोटोशूट करत असते. असेच आणखी एक फोटोशुट प्रियांकाने केले असून ते सध्या जबरदस्त व्हायरल झाले आहे. प्रियांकाने एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी हे फोटो शुट केले आहे. लाल रंगाच्या टॉपमध्ये प्रियांका अतिशय हॉट दिसत असून यामध्ये तिचे मंगळसूत्र सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरले आहे. हॉट ड्रेसिंगवर कुल ॲण्ड मॉडर्न मंगळसूत्र असा प्रियांकाचा देसी अवतार आजच्या मॉडर्न विवाहित महिलांना नक्कीच आवडणारा आहे.
बऱ्याचदा आपल्याकडे मंगळसूत्राचे जे पारंपरिक डिझाईन्स असतात, ते सगळ्याच वेस्टर्न कपड्यांवर शोभून दिसत नाहीत. त्यामुळे असे काही ट्रेण्डी कपडे घातल्यानंतर बहुसंख्य मॉडर्न महिला मंगळसूत्र घालणे पसंत करत नाहीत. अशा सर्व महिलांना प्रियांकाचा हा लूक जबरदस्त आवडणारा आहे. कारण तिने हे मंगळसूत्र एका वेस्टर्न गाऊनवरच परिधान केले असून ते खूपच आकर्षक दिसत आहे. मंगळसूत्राचे कलेक्शन करणाऱ्या महिलांना प्रियांकाने घातलेले नव्या प्रकारचे मंगळसूत्र निश्चितच आवडणारे आहे.
या फोटोशूट दरम्यान प्रियांकाने लग्जरी फॅशन ब्रँडचा लाल रंगाचा गाऊन स्टाईल ड्रेस घातला आहे. या ड्रेसच्या बाह्यांना फ्रिल लावलेले असून गळ्याचा पॅटर्न व्ही शेपमध्ये आहे. त्यावर तिने घातलेले नाजूक मंगळसूत्र अतिशय उठून दिसत आहे. प्रियांकाने घातलेले मंगळसूत्र हे बल्गारी या इटालियन लक्झरी ब्रॅण्डचे आहे. पाच लहान लहान गोल आकाराचे डिझाईन्स या मंगळसूत्रात आहेत. डायमंड, सोने आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन या मंगळसूत्रासाठी वापरण्यात आले आहेत. अतिशय नाजूक आणि सुबक असणारे हे मंगळसूत्र क्लासी लूक देणारे आहे. अशा प्रकारचे मॉडर्न महिलांना आवडणारे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स बल्गारी ब्रॅण्ड लवकरच लॉन्च करणार आहे, असेही प्रियांकाने सांगितले.