आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा प्रभाव लोकांमध्ये वाढत चालला आहे (Artificial intelligence). एआयद्वारे फोटोंमध्ये बदल आणि व्हिडिओमध्येही बदल करता येतात. एआय जितकं फायदेशीर आहे, तितकेच त्याचे तोटे देखील आहेत. पण एआयचा वापर काही लोक गंमत करण्यासाठीही करतात (Aishwarya Rai).
उदाहरणार्थ तरुण कलाकर म्हातारपणी कसे दिसतील याचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयात व्हायरल झाले होते. नुकताच विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचाही फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ऐश्वर्या राय म्हातारपणी नक्की कशी दिसेल? तिचा व्हिडिओ व्हायरल होत असून, ज्यात ती लहानपणी ते वृद्धापकाळात कशी दिसेल हे एआयद्वारे दाखवण्यात आलं आहे(How Aishwarya rai look after old age; Viral Video).
दुधापेक्षा 'या' छोट्या दाण्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त; हाडंचं काय - केस, त्वचाही चमकेल
ऐश्वर्या राय लहानपणी ते वृद्ध झाल्यावर कशी दिसेल पाहा
ऐश्वर्या राय बच्चनचा उल्लेख होतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सौंदर्याचे ज्वलंत चित्र उभे राहते. जिने केवळ तिच्या सौंदर्यानेच नव्हे तर तिच्या अभिनयातूनही चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
पन्नाशीतही ऐश्वर्या तितकीच सुंदर आणि सोज्वळ दिसते. पण म्हातारपणात ती कशी दिसेल? हे पाहण्यासाठी नक्कीच तिचे चाहते उत्सुक असतील.
इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह सुरेश नावाच्या पेजवर ऐश्वर्या रायचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या लहानपणी, तारुण्यात आणि वृद्धापकाळात कशी दिसेल हे एआयद्वारे दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात 'या' पद्धतीने बदाम खाल तर मिळेल पोषण; अन्यथा कर्करोग आणि..
नेटकऱ्यांची मजेशीर कमेण्ट्स
मजेशीर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ऐश्वर्या राय जया बच्चनसारखी दिसत आहे.' तर आणखीन एकाने, 'ऐश्वर्या म्हातारपणीही सौंदर्याची खाण दिसेल.' ऐश्वर्या रायच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ऐश्वर्या लवकरच गुलाब जामुन या चित्रपटात दिसणार आहे. अनुराग कश्यप या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.