Lokmat Sakhi >Social Viral > संगमरवरी देव्हाऱ्यावर तेलकट डाग पडले ? ३ सोपे उपाय, देव्हारा चमकेल नव्यासारखा...

संगमरवरी देव्हाऱ्यावर तेलकट डाग पडले ? ३ सोपे उपाय, देव्हारा चमकेल नव्यासारखा...

how to clean marble temple : पांढऱ्याशुभ्र संगमरवरी देव्हाऱ्यावर काळे, चिकट डाग पडलेत ? ३ सोप्या टिप्स फॉलो करा, काही मिनिटांत देव्हारा पूर्वीसारखा नवा दिसू लगेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2023 08:56 PM2023-10-18T20:56:27+5:302023-10-18T21:10:31+5:30

how to clean marble temple : पांढऱ्याशुभ्र संगमरवरी देव्हाऱ्यावर काळे, चिकट डाग पडलेत ? ३ सोप्या टिप्स फॉलो करा, काही मिनिटांत देव्हारा पूर्वीसारखा नवा दिसू लगेल...

How can I clean my temple at home, how to clean marble temple, White marble mandir cleaning tips | संगमरवरी देव्हाऱ्यावर तेलकट डाग पडले ? ३ सोपे उपाय, देव्हारा चमकेल नव्यासारखा...

संगमरवरी देव्हाऱ्यावर तेलकट डाग पडले ? ३ सोपे उपाय, देव्हारा चमकेल नव्यासारखा...

सध्या सणवाराचे दिवस सुरु आहेत. सगळीकडेच सणाचा उत्साह, आनंद दिसत आहे. सणवार म्हटल्यावर घराची साफसफाई ही ओघाने आलीच. सणवार यायच्या आधी आपण एकूणच संपूर्ण घराची साफसफाई करतो. सध्या नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांसाठीची जोरदार तयारी सगळ्यांकडेच सुरु असेल. आपल्या सगळ्यांच्याच घरात एक छोटंसं देवघर असत. हे देवघर लाकडी किंवा संगमरवरी असते. घराप्रमाणेच आपले देवघर देखील दररोज स्वच्छ करावे लागते. देवघरात आपण उदबत्ती, धूप लावतो, देवदेवतांना हळद, कुंकू वाहतो. यासगळ्या गोष्टींमुळे देवघर काहीवेळा अस्वच्छ होते. यासोबतच काहीवेळा देवघरात तेलाचे चिकट डाग पडतात. या सगळ्या गोष्टींमुळे देवघर अस्वच्छ दिसते. त्यातही जर आपले देवघर हे पांढऱ्या संगमरवराचे असेल तर त्याची अधिकच काळजी घ्यावी लागते(How do you clean a marble temple in your house?).

पांढऱ्या संगमरवराचे देवघर हे दिसताना अतिशय सुंदर दिसते पण त्याची तितकीच स्वच्छता ठेवणे कठीण काम असते. या सणावाराला आपले देवघर हे सुंदर व आकर्षक दिसावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. या संगमरवरी देवघरातील (White marble mandir cleaning tips) तेलाचे चिकट डाग, उदबत्ती, धूप यांचे काळे डाग, तसेच हळदी कुंकवाचे डाग हे पटकन दिसून येतात. त्यामुळे हे संगमरवरी देवघर (How do I maintain the shine of a marble temple?) स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात. यंदाच्या सणावाराला जर आपल्याला आपले देवघर स्वच्छ करुन पुन्हा नव्यासारखे चमकवायचे असल्यास काही टिप्स नक्की फॉलो करा( how to clean marble temple). 

पांढऱ्याशुभ्र संगमरवरी देव्हाऱ्यावरील चिकट, तेलकट डाग कसे घालवावेत ?  

१. कॉर्नफ्लॉअर तेलाचा चिकटपणा दूर करण्यास मदत करेल :- सणावाराच्या निमित्ताने किंवा एरवी रोज देवघरात दिवा तर नक्कीच लावला जातो. त्यामुळे या संगमरवरी मार्बलवर तेलाच्या चिकट खुणा राहतात. जेव्हा असे होते, तेव्हा अनेक प्रयत्न करूनही हे चिकट तेलाचे डाग जाता जात नाहीत. कितीही घासले, पुसले तरीही हे तेलाचे हट्टी डाग सहजपणे निघत नाहीत. यापासून सुटका हवी असेल तर चिकट जागी थोडे कॉर्नफ्लॉअर भुरभुरवून ठेवा. सुमारे १० ते १५ मिनिटांनंतर, ते कापडाने पुसून स्वच्छ करून घ्यावे. असे केल्याने चिकट तेलाचे डाग सहज दूर होतील.

वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये साचला काळा घाण थर ? ३ सोप्या ट्रिक्स, ड्रायर करा चुटकीसरशी स्वच्छ...

२. लोखंडी तारेचा स्क्रबर वापरावा :- संगमरवरी देव्हाऱ्यातील तेलाचे किंवा इतर डाग घालवण्यासाठी आपण लोखंडी तारेचा स्क्रबर वापरु शकता. व्हिनेगर, लिंबू आणि बेकिंग सोडा या तिन्ही गोष्टी समप्रमाणात घेऊन त्याची घट्टसर पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट थेट डागांवर लावावी. १० ते १५ मिनिटे ही पेस्ट डागांवर तशीच ठेवून द्यावी. त्यानंतर  लोखंडी तारेचा स्क्रबर घेऊन हे डाग घासून काढावेत यामुळे संगमरावरी देव्हारा पुन्हा पहिल्यासारखा स्वच्छ दिसू लागेल. 

कॉटनच्या चुरगळलेल्या शर्टाला इस्त्री करणे म्हणजे वेळखाऊ काम, सोप्या ट्रिक्स वापरुन इतरांवर पाडा आपली कडक छाप...

३. बेकिंग सोड्याचा असा करा वापर :- आपण बेकिंग सोड्याचा वापर करून देव्हाऱ्यातील फरशीवरील हट्टी डाग काढू शकता. यासाठी बेकिंग सोड्यामध्ये पाणी घालून घट्टसर पेस्ट तयार करावी. आता ही पेस्ट थेट डागावर लावा आणि ती सुकल्यानंतर स्वच्छ कापडाने घासून घ्या. यामुळे हट्टी, चिकट, तेलकट डाग सहजपणे काढून टाकण्यास मदत होईल.

अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा वापर घरात कोणकोणत्या कामांसाठी करता येतो ? फक्त चपात्या-पराठे गुंडाळत असाल तर हे वाचा..

Web Title: How can I clean my temple at home, how to clean marble temple, White marble mandir cleaning tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.