Join us

किचन सिंक सतत तुंबते, वैतागलात? करा 'हे' सोपे उपाय, पाणी तुंबणारच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 17:46 IST

ड्रेनेज साफ करण्यासाठी प्लंबरला बोलवू शकता. मात्र जर तुम्ही घरच्याघरीच किफायतशीर उपाय शोधत असाल तर या तुमच्यासाठी काही सोप्या पद्धती खूप उपयुक्त ठरू शकतात त्याबद्दल जाणून घेऊया...

स्वयंपाकघरातील सिंक तुंबणं हे खूप सामान्य आहे. कारण भांडी स्वच्छ करताना त्यात घाण साचू लागते. म्हणूनच उरलेले अन्नपदार्थ भांड्यातून आधीच काढून घेऊन टाकावेत आणि नंतर भांडी घासण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो. पण कधी कधी घाईघाईत ते अन्न तसंच राहतं आणि सिंकमध्ये अडकतं. त्यामुळे ड्रेनेजमधून पाणी खाली जात नाही. ड्रेनेज साफ करण्यासाठी प्लंबरला बोलवू शकता. मात्र जर तुम्ही घरच्याघरीच किफायतशीर उपाय शोधत असाल तर या तुमच्यासाठी काही सोप्या पद्धती खूप उपयुक्त ठरू शकतात त्याबद्दल जाणून घेऊया...

उकळतं पाणी

जर सिंक तुंबलं असेल तर जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही. फक्त एका भांड्यात पाणी उकळा आणि ते सिंकमध्ये ओता. काही वेळाने सिंकमध्ये साचून राहिलेलं पाणी ड्रेनेजमधून निघून जाईल

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचे मिश्रण सिंकमधील ड्रेनेज साफ करण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय ठरू शकतो. यासाठी अर्धा कप बेकिंग सोडा टाका. नंतर, एक कप व्हिनेगर घाला. असं केल्याने एक केमिकल रिएक्शन होईल ज्यामुळे ड्रेनेजमध्ये साचलेला कचरा निघू लागेल. नंतर १५ मिनिटांनी गरम पाण्याने सिंक धुवून घ्या.

प्लंजर वापरा

तुमच्या ड्रेनमध्ये अडकलेला कचरा काढण्यासाठी प्लंजर हा आणखी एक सोपा मार्ग आहे. सर्वप्रथम सिंकमध्ये पुरेसे गरम पाणी भरा जेणेकरून प्लंजरचा रबरी भाग पाण्यात बुडेल. नंतर, प्लंजरला जोरात वर आणि खाली हलवा. यामुळे अडकलेली घाण मोकळी होण्यास मदत होईल.

तारेचा वापर

जर वरील पद्धती काम करत नसतील, तर तुम्ही पातळ तारेच्या मदतीने ड्रेनेज साफ ​​करण्याचा प्रयत्न देखील करू शकता. पाईपमध्ये तार हळूहळू घाला आणि फिरवा. तारेमुळे ड्रेनेजच्या पाईपला ओरखडे पडणार नाहीत याची काळजी घ्या. 

टॅग्स :किचन टिप्स