उन्हाळ्यात गावी गेल्यानंतर काही लोक वर्षभर पुरेल इतके धान्य आणून ठेवतात (Kitchen Tips). पोतीभर धान्य किंवा तांदूळ आणल्यानंतर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक स्टोर करतो (Black Bugs). पण कधी चुकून ओला हात लागतो किंवा तांदूळ भरताना काहीतरी राहून जातं. ज्यामुळे तांदुळात किडे (Rice), अळ्या होतात. याचा लगेचच बंदोबस्त केला तर उत्तम. नाहीतर मग हळूहळू त्याचं प्रमाण वाढत जातं. शिवाय तांदुळातून कीड काढणं कठीण होऊन जातं. एवढ्या महागड्या धान्याचं नुकसान होऊ नये म्हणून, आपण काही घरगुती उपायांचा वापर करून पाहतो.
धान्य स्टोर करताना हे घरगुती उपाय उपयुक्त ठरतात. तर काही फोल ठरतात. जर आपण जास्त प्रमाणात तांदूळ स्टोर करून ठेवत असाल आणि, तांदुळाभोवती किडे, अळ्या फिरकू नये असे वाटत असेल तर, हिंगाचा सोपा उपाय करून पाहा. चिमुटभर हिंग फक्त जेवणाची चव वाढवत नसून, धान्याला कीड लागू नये म्हणून सरंक्षणही करते. पण तांदूळ स्टोर करताना हिंगाचा वापर कसा करावा?(How can you get rid of black bugs in rice).
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळ का खातात? ५ फायदे- रक्त शुद्ध, पचनक्रिया सुधारते आणि..
साठवताना तांदुळाला कीड लागू नये म्हणून हिंगाचा वापर कसा करावा?
तांदूळसह इतर धन्याला कीड लागू नये म्हणून, आपण हिंगाचा वापर करू शकता. हिंगाचा गंध तिखट असतो, ज्यामुळे धान्याभोवती कीड किंवा अळ्या फिरकणार नाही. यासाठी एका सुती कापडात हिंगाचे तुकडे किंवा हिंगाची पावडर घेऊन कापडाला गाठ मारा. हिंगाची पोटली धान्याची पोती किंवा डब्याच्या एका कोपऱ्यात ठेवा. यामुळे तांदूळ असो किंवा इतर धान्य, त्याच्याभोवतीने किडे किंवा अळ्या फिरकणार नाही.
चांदीचे दागिने-पैंजण काळे पडलेत? एक भन्नाट ट्रिक-१५ मिनिटात चमकतील दागिने आणि भांडी
टीप नंबर २
जर तांदूळ किंवा इतर धान्यात कीड लागली असेल तर, आपण बोरीक पावडरचा वापर करू शकता. यासाठी तांदूळ एकदा चाळणीने चाळून घ्या. तांदुळात बोरिक पावडर मिक्स करा. तांदळाची बरणी, कोठी यांना कुठेही ओलसरपणा नसेल याची काळजी घ्या. कोठीच्या तळाशी आणि मध्येमध्ये कडुनिंबाची पानं टाका, आणि त्यात तांदूळ किंवा इतर धान्य भरा. यामुळे धन्याला कीड लागणार नाही.