Lokmat Sakhi >Social Viral > चहाचे गाळणे काही केले तरी काळेकुट्टच? ३ सोप्या ट्रिक्स, गाळणी स्वच्छ-चकाचक

चहाचे गाळणे काही केले तरी काळेकुट्टच? ३ सोप्या ट्रिक्स, गाळणी स्वच्छ-चकाचक

Kitchen tips: अनेक घरांमध्ये चहाचं गाळणं (tea strainer) असं काही काळं- कुळकुळीत झालेलं असतं की ते पाहूनच चहा पिण्याची इच्छा होत नाही.. चहाची गाळणी स्वच्छ ठेवण्यासाठी हे काही उपाय करून बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 06:59 PM2022-01-05T18:59:34+5:302022-01-05T19:05:21+5:30

Kitchen tips: अनेक घरांमध्ये चहाचं गाळणं (tea strainer) असं काही काळं- कुळकुळीत झालेलं असतं की ते पाहूनच चहा पिण्याची इच्छा होत नाही.. चहाची गाळणी स्वच्छ ठेवण्यासाठी हे काही उपाय करून बघा..

How to clean tea strainer, home remedies to clean tea chhanni  | चहाचे गाळणे काही केले तरी काळेकुट्टच? ३ सोप्या ट्रिक्स, गाळणी स्वच्छ-चकाचक

चहाचे गाळणे काही केले तरी काळेकुट्टच? ३ सोप्या ट्रिक्स, गाळणी स्वच्छ-चकाचक

Highlightsकळकट्ट गाळणी कधी कधी पाहुण्यांसमोर अगदीच लाज आणते. म्हणूनच तर गाळणी स्वच्छ करण्यासाठी करून बघा हे काही उपाय... 

चहाची गाळणी म्हणजे प्रत्येक घरी लागणारी एक महत्वाची वस्तू.. काही घरांमध्ये तर दिवसातून चहाच एवढा जास्त वेळेस केला जातो की त्या घरात ३ ते ४ गाळण्या अगदी सहज वापरल्या जातात. प्रत्येकवेळी चहा गाळताना चहा पावडरचे काही कण गाळणीत अडकत जातात आणि मग गाळणं काळं व्हायला सुरुवात होते. घासणीने स्वच्छ केली तरी ही गाळणी (How to clean tea chhanni in Marathi) मग साफ होत नाही. अशी कळकट्ट गाळणी कधी कधी पाहुण्यांसमोर अगदीच लाज आणते. म्हणूनच तर गाळणी स्वच्छ (kitchen hygiene) करण्यासाठी करून बघा हे काही उपाय... 

photo credit- google

स्टीलची गाळणी कशी स्वच्छ करायची?
How to clean tea strainer?

१. जर तुम्ही स्टीलची गाळणी वापरत असाल तर ही गाळणी स्वच्छ करण्यासाठी ही पद्धत वापरा. गॅस मंद आचेवर लावा आणि गाळणी गॅसवर ७ ते ८ सेकंदासाठी उलटी ठेवा. गॅसवर गरम झाल्यामुळे त्यातील घाण मोकळी होईल. यानंतर डिश वॉश लिक्विडचा वापर करा आणि टुथ ब्रशचा उपयोग करून गाळणं साफ करा. गाळणीत अडकलेली घाण निघून जाईल आणि गाळणी स्वच्छ दिसू लागेल. 

 

२. तुमच्याकडे प्लॅस्टिकची गाळणी असेल तर आंघोळीला वापरतो ते साबण घेऊन त्याचा एका भांड्यात फेस करा. किंवा डिशवॉशचा फेस करा. त्यामध्ये ही गाळणी १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवा. यानंतर ब्रशच्या मदतीने गाळणी घासा आणि स्वच्छ करा. चहा पावडर अडकून गाळणी काळी पडू नये, यासाठी हा प्रयोग आठवड्यातून एकदा नियमितपणे करा. 

 

३. बेकींग पावडरचा वापर करूनही गाळणी स्वच्छ करता येते. हा उपाय करण्यासाठी बेकींग पावडरमध्ये पाणी टाका आणि त्याची घट्ट पेस्ट तयार करा. गाळणं आधी अर्धातास पाण्यात भिजत ठेवा. यानंतर बेकींग पावडरची पेस्ट गाळणीवर लावा. १० ते १५ मिनिटे ही पेस्ट गाळणीवर तशीच राहू द्या आणि त्यानंतर ब्रशचा वापर करून गाळणी घासून काढा. हा उपाय स्टील तसेच प्लॅस्टिक अशा दोन्ही गाळण्यांसाठी करता येईल. 
 

Web Title: How to clean tea strainer, home remedies to clean tea chhanni 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.