आजच्या युगात प्रत्येकाच्या घरात आपल्याला फ्रीज आढळेल. फ्रिजमध्ये अन्न साठवण्यापासून ते फळे, भाजी यासह विविध गोष्टी स्टोर करण्यात येते. फ्रिजमध्ये खाद्यपदार्थ अधिक काळ टिकतात, शिवाय इतरही वस्तू फ्रेश राहतात. काही लोकं फ्रीज हॉलमध्ये किंवा किचनमध्ये ठेवतात (Kitchen Tips). पण बरेच जण फ्रीज भिंतीला लावून ठेवतात.
मात्र, फ्रीज आणि भिंतीमधला अंतर अनेकांना ठाऊक नाही (Social Viral). पण भिंतीमधील अंतर आणि फ्रिजचा संबंध काय? भिंतीजवळ फ्रीज ठेवल्याने वीजबिल जास्त येते का? फ्रीज नेमकं कुठे आणि कसा ठेवावा? पाहूयात(How Close Should Your Refrigerator Be To The Wall).
फ्रीज भिंतीजवळ ठेवण्याचे दुष्परिणाम
- तज्ज्ञांच्या मते, फ्रीज भिंती जवळ नसून, ६ ते १० इंच लांब अंतरावर ठेवावे. खरंतर, कोणत्याही फ्रिजला आतून थंड ठेवण्यासाठी कुलिंग मशीनला खूप मेहनत घ्यावी लागते. या प्रोसेसच्या दरम्यान, ग्रीलद्वारे उष्णता आतून सोडली जाते. यामुळेच फ्रीज थेट भिंतीला चिकटवून ठेवू नये. यामुळे हवा कोंडली जाते.
हृदयद्रावक! पाळणा समजून आईनेच पोटच्या गोळ्याला ठेवले चालू ओव्हनमध्ये, काही वेळानंतर..
- जर आपण फ्रीज पूर्णपणे भिंतीला चिकटवून ठेवत असाल तर, गरम हवा बाहेर पडण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे फ्रिजला आतून थंड करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे आपल्या खिश्याला कात्री बसेल, एवढं मात्र नक्की.
- फ्रिजला जेव्हा गरम हवा बाहेर काढण्यास अडचण निर्माण होते, तेव्हा या प्रक्रियेत विजेचा वापर जास्त होतो. यामुळे वीज बिल तर वाढतेच, शिवाय फ्रिज बिघडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
- फ्रीज भिंतीजवळ लावताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. फ्रीज भिंतीपासून ६ ते १० इंच अंतरावर ठेवावे. यासह फ्रीज थेट हीटर किंवा इतर गरम स्त्रोतांजवळ ठेवू नये.
'ऐसा लग रहा है, मै जन्नत के बिचोंबीच खडी हूं!' - पाहा काश्मिरी मुलींचे सुंदर निरागस रिपोर्टिंग
- जर आपण फ्रीज आणि भिंतीमध्ये अंतर ठेवत नसाल तर, फ्रिजमधील तापमानात अधिक फरक पडू शकतो. अशावेळी फ्रीज आतून ओला होतो, शिवाय फ्रिजच्या आत बर्फ तयार होऊ लागते.