Lokmat Sakhi >Social Viral > कबुतरांच्या विष्ठेने बाल्कनी खराब होते-वास येतो? ३ उपाय करा, गॅलरीत एकही कबुतर बसणार नाही

कबुतरांच्या विष्ठेने बाल्कनी खराब होते-वास येतो? ३ उपाय करा, गॅलरीत एकही कबुतर बसणार नाही

How do I Stop Pigeons Pooing On My Balcony : कबुतरांच्या विष्ठेत एसिडीक एलिमेंट्स असतात जे मेटल किंवा पेंटप्रमाणे एखाद्या ठिकाणी डाग सोडतात.  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 07:37 PM2024-09-22T19:37:47+5:302024-09-22T19:39:46+5:30

How do I Stop Pigeons Pooing On My Balcony : कबुतरांच्या विष्ठेत एसिडीक एलिमेंट्स असतात जे मेटल किंवा पेंटप्रमाणे एखाद्या ठिकाणी डाग सोडतात.  

How do I Stop Pigeons Pooing On My Balcony Best Way To deter Pigeons From My Balcony | कबुतरांच्या विष्ठेने बाल्कनी खराब होते-वास येतो? ३ उपाय करा, गॅलरीत एकही कबुतर बसणार नाही

कबुतरांच्या विष्ठेने बाल्कनी खराब होते-वास येतो? ३ उपाय करा, गॅलरीत एकही कबुतर बसणार नाही

शहरांमध्ये राहणारे लोक अनेकदा आपल्या घरांमध्ये बाल्कनीमध्ये कबुतर येण्याच्या त्रास येण्याच्या समस्येनं त्रस्त असतात. याशिवाय बाल्कनीची रेलिंग आणि फरशीवर त्यांची विष्ठा पडलेली असते. ज्यामुळे घाण पसरते आणि डाग खराब दिसतात. कबुतरांच्या विष्ठेत एसिडीक एलिमेंट्स असतात जे मेटल किंवा पेंटप्रमाणे एखाद्या ठिकाणी डाग सोडतात.  हे हट्टी डाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How do I Stop Pigeons Pooing On My Balcony)

हाय केअर से हाय टू हायजिनच्या रिपोर्टनुसार बाल्कनीचा परिसर मोकळा आणि जास्तीत जास्त स्वच्छ ठेवा. कबुतरांची एंट्री ज्या भागातून होते ते भाग सिल करा. बाल्कनीच्या ग्रीलला जाळी लावून घ्या. कबुतरं येऊ नयेत यासाठी दालचिनी किंवा काळ्या मिरीचं पाणी घेऊन बाल्कनीत शिंपडा. नॅच्युरल पिजन स्प्रेमध्ये पेपरमिंट ऑईलसारखे घटक असतात ज्यामुळे कबुतरं येत नाही. एंटी बर्ड नेट्स बाल्कनीत लावून तुम्ही पक्ष्यांना दूर ठेवू शकता. (Best Way To deter Pigeons From My Balcony)


 काही वस्तूंची आवश्यकता असेल जसं की एक ओलं आणि एक सुकं कापड, स्क्रबर,  पाण्याची बादली, व्हिनेगर, बेकिंग सोडा. या वस्तू कबुतरांच्या विष्ठेचे डाग सहज काढून टाकण्यास मदत करतील ज्यामुळे कोणतंही नुकसान होणार नाही. 

चण्यांबरोबरच चुकूनही खाऊ नका 5 पदार्थ; तब्येत कधी खराब होईल कळणार नाही

सगळ्यात आधी रेलिंग वर जमा झालेली कबुतराची शीट नरम केल्यानंतर पाण्याचा वापर करा. एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा आणि प्रभावित भागांवर शिंपडा आणि सुकल्यानंतर सॉफ्ट कापडानं पुसून घ्या.  ज्यामुळे डाग साफ करणं सहज शक्य होईल. 

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा एक परिणामकारक उपाय आहे ज्यामुळे कबुतरांची विष्ठा निघून जाईल आणि हट्टी डाग निघून जाण्यास  मदत होईल. एक कप व्हिनेगरमध्ये २ चमचे बेकिंग सोडा मिसळा आणि हे मिश्रण डागांवर लावा १० ते १५ मिनिटं तसंच ठेवा. जेणेकरून  डाग व्यवस्थित मऊ राहतील. नंतर एका स्क्रबरने हलक्या हातानं रगडून  स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या. 

रोज चालूनही वजन कमीच होत नाही? पाहा वयानुसार चालण्याची योग्य पद्धत कोणती-स्लिम व्हाल

डाग काढून टाकल्यानंतर रेलिंग परिसर सुकवून एका मऊ कापडानं पॉलिश करा. जर तुमची रेलिंग मेटलची असेल तर मेटल पॉलिशचा वापरही करू शकता. यामुळे रेलिंग चमकदार आणि सुरक्षित राहील, कबुतरांना बाल्कनीत येण्यापासून  रोखण्यासाठी तुम्ही काही महत्वाचे उपाय करू शकता जसं की जाळी लावून घ्या.

Web Title: How do I Stop Pigeons Pooing On My Balcony Best Way To deter Pigeons From My Balcony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.