घरात प्रकाश पडावा म्हणून आपण प्रत्येक खोलीत किंवा गरज असेल तिथे ट्यूबलाईट लावतोच. या ट्यूबलाईटस आपण शक्यतो घराच्या भिंतींवर एका विशिष्ट उंचीवर लावतो, यामुळे त्यांची स्वच्छता करणे महाकठीण काम असते. ट्यूबलाईटस भिंतींवर खूपच उंचीवर लावल्या असल्याने त्यांना हवे तसे वेळोवेळी स्वच्छ करता येत नाही. काही सणवार असेल किंवा काही खास प्रसंग असेल तरच अशावेळी घराची साफसफाई करताना वर्षातून एकदा ट्यूबलाईटची स्वच्छता केली जाते, अन्यथा आपण या ट्यूबलाईटसच्या साफसफाईचा विचार देखील करत नाही(How do you clean a dusty Tube light).
घरात भिंतींवर लावलेल्या ट्यूबलाईट्स जर स्वच्छ केल्या तर त्या अधिक ब्राईट लाईट देतात. याउलट जर या ट्यूबलाईट्स वेळोवेळी स्वच्छ केल्या नाहीत तर त्यावर धूळ साचते. धूळ साचून या ट्यूबलाईटस खराब होतात, आणि हीच धूळ जर योग्य वेळी स्वच्छ केली नाही तर धूळ साचून त्यावर काळे, चिकट डाग तयार होतात. यामुळे ट्यूबलाईट्सचा प्रकाश नीट पडत नाही. अशावेळी काही सोप्या ट्रिक्स वापरुन आपण ट्यूबलाईट्सवरची धूळ अगदी सहजपणे स्वच्छ करु शकतो. ट्यूबलाईट्सवरील धूळ स्वच्छ करण्यासाठी सोप्या ट्रिक्स कोणत्या ते पाहूयात(5 Tips To Clean Dusty Tube Light).
ट्यूबलाईट्स कशा स्वच्छ कराव्यात ?
१. डिटर्जंट आणि पाणी :- डिटर्जंटसचा वापर करुन आपण खराब झालेल्या ट्यूबलाईट्स अगदी सहजपणे स्वच्छ करु शकतो. कोमट पाण्यांत १ ते २ टेबलस्पून डिटर्जंट घालून ते व्यवस्थित पाण्यांत विरघळवून घ्यावे. या द्रावणात स्वच्छ कॉटनचे कापड भिजवून त्याने ट्यूबलाईट स्वच्छ पुसून घ्यावी. त्यानंतर कोरड्या फडक्याने ट्यूबलाईट स्वच्छ पुसून घ्यावी.
२. व्हाईट व्हिनेगर आणि पाणी :- एका स्प्रे बाटलीमध्ये व्हाईट व्हिनेगर आणि पाणी दोन्ही समप्रमाणात घेऊन मिक्स करावे. हे द्रावण ट्यूबलाईटवर स्प्रे करुन १० ते १५ मिनिटे तसेच थांबावे जेणेकरुन ट्यूबलाईटवरचा चिकट, काळा थर निघून जाण्यास मदत होईल. त्यानंतर ट्यूबलाईट कापडाने स्वच्छ पुसून घ्यावी.
पावसाळ्यात भाज्या नीट धुतल्या नाहीतर पडाल आजारी, भाज्या धुण्याची सोपी पद्धत...
३. बेकिंग सोडा आणि पाणी :- बेकिंग सोडा आणि पाणी समप्रमाणात घेऊन त्याची थोडी पातळसर पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट ट्यूबलाईटवर लावून घ्यावी. थोड्यावेळासाठी ट्यूबलाईटवर ही पेस्ट अशीच राहू द्यावी त्यानंतर ट्यूबलाईट कापडाने पुसून स्वच्छ करुन घ्यावी.
४. मायक्रोफायबर कापड :- मायक्रोफायबर कापड धूळ आणि घाण अगदी सहज शोषून घेते. मायक्रोफायबर कापडाने ट्यूबलाईट स्वच्छ पुसून घ्या. मळलेली ट्यूबलाईट स्वच्छ करण्यासाठी कोरडे मायक्रोफायबर कापड वापरावे.
५. टूथपेस्ट :- मऊ ब्रश किंवा स्पंजला थोडीशी टूथपेस्ट लावा. ट्यूबलाईटच्या पृष्ठभागावर टूथपेस्ट हलक्या हाताने घासून घ्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुसून कोरड्या कापडाने वाळवा.
छोट्याशा कुंडीतही रुजते कढीपत्त्याचे रोप, हिरवागार-ताजा-सुगंधी कढीपत्ता पटकन घाला फोडणीत!
अशाप्रकारे आपण काही सोप्या ट्रिक्स वापरुन अगदी झटपट मळलेली ट्यूबलाईट चुटकीसरशी स्वच्छ करु शकता.