Join us  

फोडण्यांच्या तेलानं-धुरानं किचनच्या खिडक्या चिकट-मेणचट झाल्या? ४ भन्नाट टिप्स- खिडक्या चमकतील चटकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 1:49 PM

How do you clean greasy kitchen windows? किचनच्या खिडक्या पुसणं हे फार अवघड काम, त्या स्वच्छ करण्यासाठी कमी कष्टाच्या भन्नाट टिप्स

किचन स्वच्छ असेल तर, घरातील गृहिणी देखील प्रसन्न राहते. किचन साफ करताना तिचा खूप वेळ जातो. मुख्य म्हणजे किचनच्या खिडक्या खूप चिकट - कळकट होतात. जेवण बनवताना फोडणीचे - तेलाचे डाग त्यावर पडतात. ग्रीस, धूळ, आणि तेलाच्या डागांमुळे खिडक्या खूपच घाण दिसू लागतात. ज्यामुळे किचनची शोभा कमी होते.

किचनच्या खिडक्या स्वच्छ करण्यासाठी लोकं महागड्या उप्त्पादानांचा वापर करतात. परंतु, यामुळे किचनच्या खिडक्यातील चिकटपणा लवकर निघत नाही. महागड्या उप्त्पादानांचा वापर करण्यापेक्षा, आपण घरगुती साहित्यांनी देखील किचनच्या खिडक्या स्वच्छ करू शकता(How do you clean greasy kitchen windows?).

व्हिनेगर

स्वयंपाक घरातील खिडक्या स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी दोन ग्लास पाण्यात एक ग्लास व्हाईट व्हिनेगर मिसळा. व हे पाणी स्प्रे बाटलीत भरा. यानंतर हे मिश्रण खिडक्यांच्या काचेवर स्प्रे करा, व पंधरा मिनिटे असेच राहू द्या. नंतर स्क्रबरने हलकेच घासून स्वच्छ करा. यामुळे काही मिनिटात जास्त मेहनत न घेता खिडक्या स्वच्छ होतील.

पांढरे कपडे धुवून - धुवून पिवळट पडले? एक भन्नाट ट्रिक - धुतल्याक्षणी कपडे दिसतील पांढरेशुभ्र

तांदुळाचे पाणी

चिकट - कळकट खिडक्या स्वच्छ करण्यासाठी आपण तांदुळाच्या पाण्याचा वापर करू शकता. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये तांदळाचे पाणी भरून खिडक्यांवर स्प्रे करा. १० मिनिटानंतर स्क्रबरने खिडक्या घासून स्वच्छ करा.

कॉर्नस्टार्च

कॉर्नस्टार्चचा वापर फक्त जेवण करण्यासाठी नसून, खिडक्या स्वच्छ करण्यासाठीही होतो. यासाठी तीन ते चार चमचे कॉर्नस्टार्च घेऊन त्यात थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट खिडक्यांवर लावा आणि दहा मिनिटे तसेच राहू द्या. १० मिनिटानंतर स्क्रबरने खिडक्या घासून काढा, व कोमट पाण्याने खिडक्या स्वच्छ धुवून घ्या.

नव्या झाडूतून घरभर भुसा पडतो? २ टिप्स, भुसा पडणे होईल बंद - कचरा कमी

बेकिंग सोडा - लिंबू

आपण बेकिंग सोडा आणि लिंबूच्या मदतीने खिडक्या स्वच्छ करू शकता. यासाठी एका वाटीमध्ये चार ते पाच चमचे बेकिंग सोडा घ्या, त्यात लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट खिडक्यांवर लावा, व काही वेळ तसेच राहू द्या. त्यानंतर स्क्रबरने खिडक्या घासून स्वच्छ करा.

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्सहोम रेमेडी