Join us  

स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅक मधील घाण साफ करणे आता झाले सोपे, वापरा या २ ट्रिक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2024 12:36 PM

How Do You Clean Sliding Window Tracks : 2 Quick & Easy Methods for Cleaning Window Tracks : स्लायडिंग खिडक्यांचा अ‍ॅल्युमिनियम ट्रॅक स्वच्छ करणे हा खूप मोठा टास्क असतो, म्हणूनच ते सोप्या पद्धतीने कस करायचं ते पहा ...

आजकाल बहुतेक सगळ्यांच्याच घराला स्लायडिंग विंडोज असतात. घराला स्लायडिंग विंडोज असली की, खिडकी उघड - बंद करणे सोपे जाते.  स्लायडिंग विंडोज दिसतानाही फार छान दिसतात. स्लायडिंग विंडोज बसवण्यासाठी आधी त्याचे ट्रॅक खिडकी लावायच्या जागी अ‍ॅटॅच केले जातात. मग या ट्रॅकमध्ये खिडकी बसवली जाते. स्लायडिंग विंडोजची स्वच्छता व्यवस्थित करता येते, परंतु नुसत्या खिडक्या स्वच्छ करुन फायद्याचे नाही. या खिडक्यांच्या अ‍ॅल्युमिनियम ट्रॅक स्वच्छ करणे हा खूप मोठा टास्क असतो(What is the best way to clean window tracks).

स्लायडिंग विंडोजचे अ‍ॅल्युमिनियम ट्रॅक हे खूप लहान असतात. या आकाराने लहान असणाऱ्या अ‍ॅल्युमिनियम ट्रॅकची स्वच्छता करणे कठीण काम असते.  आपला हात किंवा बोट यात जात नाही, त्यामुळे त्याची सफाई करता येत नाही. या अ‍ॅल्युमिनियम ट्रॅककडे दुर्लक्ष केले तर त्यात धूळ, माती साचून ते खराब होऊ लागतात. एवढेच नव्हे तर त्यात घाण साचून काहीवेळा खिडक्या उघड - बंद करताना बरीच अडचण येते. त्यामुळे अ‍ॅल्युमिनियम ट्रॅक स्वच्छ करण्याचं हे काम अतिशय किचकट (How to Maintain & Clean Aluminum Sliding Windows Tracks)किंवा कंटाळवाणं असलं तरीही ते झटपट कसे करता येईल ते पाहूयात. यासाठीच हे अ‍ॅल्युमिनियम ट्रॅक स्वच्छ करण्याच्या दोन सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवूयात(2 Quick and Easy Methods for Cleaning Window Tracks).

स्लायडिंग विंडोजचे ट्रॅक स्वच्छ करण्याचे उपाय... 

१.   स्लायडिंग विंडोजचे ट्रॅक स्वच्छ करण्यासाठी आपल्याला भांडी घासायची हिरवी स्पंजची घासणी व एक क्लिप लागणार आहे. सगळ्यांत आधी ही हिरवी घासणी लिक्विड सोपं किंवा साबणाच्या पाण्यात भिजवून ओली करून घ्यावी. त्यानंतर बरोबर मधोमध एक फोल्ड देऊन घासणी दुमडून घ्यावी. दुमडून घेतलेल्या भागाच्या मध्ये एक कपड्यांना लावतो तो क्लिप बसवून घ्यावा. आता घासणीची एक बाजू बंद असेल जी फोल्ड करून क्लिपमध्ये अडकवली होती. तर दुसरी बाजू ओपन असेल. हा ओपन असलेला भाग अ‍ॅल्युमिनियम ट्रॅकच्या अरुंद खाचांमधे जाईल आणि यामुळे आपण अ‍ॅल्युमिनियम ट्रॅकची स्वच्छता करु शकता.    

हाताला कणभर पीठ न लागता कणीक मळा, पाहा ही पीठ भिजवण्याची जादूई पिशवी...

 

लिंबू आणि संत्र्यांच्या साली फेकू नका, ‘असा’ करा वापर, घर दिसेल चकाचक - स्वच्छ...

२. अ‍ॅल्युमिनियम ट्रॅकची स्वच्छता करण्यासाठी एक जाडसर स्पंज लागणार आहे. सगळ्यात आधी अ‍ॅल्युमिनियम ट्रॅकची जेवढी रुंदी आहे तेवढा आकाराचा स्पंज घ्या. अ‍ॅल्युमिनियम ट्रॅकवर स्पंज ठेवा आणि जिथे जिथे त्या ट्रॅकवर खाचा आहेत तिथे तिथे स्पंजवर खुणा करा आणि तो भाग थोडा कापून घ्या. आता तो स्पंज ट्रॅकवर ठेवा. आता तुम्ही जिथे स्पंज थोडा कापला आहे तो भाग बरोबर खिडकीच्या ट्रकच्या आतल्या बाजूमध्ये जाईल आणि तिथली घाण स्वच्छ होईल. सुरुवातीला कोरड्या स्पंजने माती काढून घ्या. त्यानंतर स्पंज ओला करून पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घ्या. अशा प्रकारे तुम्ही या दोन सोप्या ट्रिक्स वापरुन स्लायडिंग विंडोजच्या अ‍ॅल्युमिनियम ट्रॅकची अत्यंत सहजपणे सफाई करु शकता.

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स