किचनमध्ये तळणीचे पदार्थ तळताना अनेकदा खूप धूर होतो. आत्तापर्यंत अनेक गृहिणींना हा अनुभव आलाच असेल. शक्यतो तळणीचे पदार्थ म्हणजे डिप फ्राय केलेले पदार्थ तळताना घरात धूर होणे ही सामान्य (How do you fry at home without spreading) गोष्टी आहे. कित्येकदा आपण (Hack to prevent smell from spreading in home while frying) पाहिले असेलच भजी, वडे किंवा पुरी, पापड तळताना असे पदार्थ गरम तेलात सोडताच ते तळले जात (Cooking Tips) असताना त्याचा धूर सर्वत्र घरभर पसरतो. अशा धुराने घरातील लहान मुले किंवा वृद्ध व्यक्तींना याचा त्रास होतो. या धुरामुळे खोकला किंवा शिंका येऊ लागतात(Useful tips to Fry Food without smelling up the House & Kitchen).
तळणीचे पदार्थ तळताना सतत असा धूर येत असेल तर त्याचा त्रास हा सगळ्यांना कमी अधिक प्रमाणांत होतोच. कोणताही तळणीचा पदार्थ तळताना घरभर पसरलेला धूर असा सहजासहजी निघत नाही. घरातील हा धूर संपूर्णपणे निवळे पर्यंत वाट पहावी लागते. अशावेळी आपण काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर तळणीचे पदार्थ तळताना घरात धूर होणार नाही. यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूयात. यापुढे तळणीचे पदार्थ तळताना किचन आणि संपूर्ण घरात धूर होणार नाही.
तळणीचे पदार्थ तळताना घरात धूर होऊ नये म्हणून काय करावे ?
१. किचन - घराचे दार खिडक्या उघडा :- तळणीचे पदार्थ तळताना नेहमी किचन व घराचे दार खिडक्या उघड्या ठेवा. यामुळे पदार्थ तळत असताना निघणारा धूर या उघड्या खिडक्या - दरवाज्यांतून सहजपणे बाहेर जाईल. यामुळे तळणीचे पदार्थ तळताना घरात धूर होणार नाही.
२. व्हिनेगर वापरा :- तळणीचे पदार्थ तळताना घरात धूर होऊ नये म्हणून आपण व्हिनेगरचा वापर करु शकतो. यासाठी कोणतेही पदार्थ तळताना नेहमी कढईच्या जवळ व्हिनेगरने भरलेलं एक ग्लास ठेवावं. यासाठी एका ग्लासात अर्ध्यापर्यंत व्हिनेगर भरुन ते पदार्थ तळताना जवळ ठेवावे. यामुळे घरात धूर पसरत नाही. पदार्थ तळताना येणारा धूर आणि वास व्हिनेगर शोषून घेतो, त्यामुळे घरात धूर पसरत नाही.
एकमेकात अडकलेले वाट्या-डबे-वाडगे कसे काढायचे? ही घ्या १ सोपी युक्ती-झटपट स्मार्ट काम...
३. एग्जॉस्ट फॅन :- आपल्यापैकी बहुतेक जणांच्या किचनमध्ये एका कोपऱ्यात एग्जॉस्ट फॅन लावलेला असतो. हा एग्जॉस्ट फॅन किचन किंवा घरातील धूर किंवा दुर्गंधी शोषून घेऊन बाहेरच्या बाजूला टाकतो. यासाठी तळणीचे पदार्थ तळत असताना किचनमधील एग्जॉस्ट फॅन लावावा, यामुळे पदार्थ तळताना किचनमध्ये फारसा धूर होत नाही.
४. गॅसची फ्लेम कमी ठेवा :- तळणीचे पदार्थ तळताना आपण शक्यतो गॅसची फ्लेम मोठी करतो, यामुळे तेल तापून धूर येऊ लागतो. अशावेळी आपल्याला हवे तेवढ्या प्रमाणांत तेल गरम झाले की गॅसची आच मंद करावी. यामुळे तेल गरजेपेक्षा जास्त तापत नाही, परिणामी घरभर धूर होत नाही.
मेहनत न करता वॉशिंग मशीनमध्ये उशा धुण्याची पाहा भन्नाट ट्रिक, हट्टी डाग गायब-उशी दिसेल नवीकोरी...