पावसाळ्यात घर कितीही स्वच्छ ठेवले तरी,किडे, सरपटणारे प्राणी, पाली, झुरळं घरात येतातच. मुख्य म्हणजे बाथरूममध्ये गांडूळ - गोम फार निघतात. त्यांचा उपद्रव नको वाटतो, किळसही येते. त्यांना मारुन टाकणंही नको वाटतं. पण म्हणूनच ते घरात येऊ नयेत म्हणून भन्नाट ५ टिप्स(How do you get rid of earthworms in a bathroom?).
स्वच्छता राखा
गांडुळांपासून सुटका मिळवण्यासाठी बाथरूम नेहमी स्वच्छ करत राहा. अस्वच्छ बाथरूममध्ये गोम - गांडूळ आपली अंडी घालतात. ज्यामुळे यांचा वावर वाढतो. साचलेल्या पाण्यात किंवा घाणीच्या ठिकाणी गांडूळ जास्त येतात. गांडूळ - गोमपासून सुटका हवी असेल, तर बाथरूमचा वापर झाल्यानंतर नेहमी क्लिन करा.
प्लास्टिक डिस्पोजेबल बॉक्स वापरून झाल्यानंतर फेकून देता? ४ भन्नाट वापर, किचन राहील स्वच्छ
बेकिंग सोडा
बाथरूमचा वापर झाल्यानंतर नेहमी स्वच्छ करा. बाथरूम स्वच्छ केल्यानंतर बेकिंग सोड्याचा वापर करा. यासाठी ड्रेनेज पाईपमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा टाका आणि अर्धा तास असेच राहू द्या. यानंतर पाणी चालू करून बेकिंग सोडा घालवा. यामुळे पुन्हा बाथरूममध्ये गोम - गांडूळ येणार नाहीत.
व्हाईट व्हिनेगर
बाथरूममधून गोम - गांडूळ घालवण्यासाठी व्हाईट व्हिनेगरचा वापर करा. यासाठी एक कप व्हिनेगर घ्या आणि ते दोन लिटर पाण्यात मिसळा. नंतर बाथरूम नीट स्वच्छ करा आणि शेवटी हे मिश्रण बाथरूममध्ये टाका आणि काही वेळ राहू द्या. यानंतर बाथरूम पूर्णपणे कोरडे करा. यामुळे गांडुळांसह इतर किडेही बाथरूममध्ये येणार नाही.
कुलरमधून सतत कुबट वास येतो? दुर्गंधी घरभर पसरते? ४ टिप्स, कुबट वास येणार नाही..
बाथरूम क्लिनर
बाथरूममध्ये येणाऱ्या गांडुळांसह इतर कीटकांपासून सुटका मिळवण्यासाठी बाथरूम क्लीनरचा वापर करून पाहा. यासाठी बाथरूमच्या प्रत्येक भागावर आणि टाइल्सवर क्लिनरने फवारणी करा. याचा दररोज वापर केल्यास बाथरूममध्ये गांडुळ येणार नाहीत.
मीठ
जर आपल्याला त्वरित गांडूळांना पळवून लावायचं असेल तर, मिठाचा वापर करा. गांडूळ दिसल्यावर त्यांच्यावर मीठ टाका. यामुळे गांडूळ पळून जातील. व त्यानंतर संपूर्ण बाथरूमची स्वच्छता करा.