Join us  

घरभर झुरळे फिरतात? २ सोप्या ट्रिक्स, झुरळं रात्रभरात होतील गायब..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 7:12 PM

How do you get rid of roaches overnight without killing them? घरात झुरळांचा होतोय त्रास, करून पाहा २ सोपे घरगुती उपाय

झुरळ म्हटलं तर अनेकांच्या अंगावर काटा येतो. घरातील अस्वच्छ ठिकाणी झुरळं फार फिरतात. त्यांचा हा वावर कमी करण्यासाठी आपण अनेक प्रॉडक्ट्सचा वापर करतो. चपलेपासून अत्यंत महागड्या कीटकनाशकांपर्यंत अनेक उपाय करून पाहतो. परंतु, गेलेले झुरळं पुन्हा घरात येऊन थैमान घालतात.

महागडे प्रॉडक्ट्स झुरळांना घरातून पळवून काढतीलच असं नाही. मुख्य म्हणजे किचनमध्ये झुरळांचा वावर वाढतो, ज्याचा थेट फटका आपल्या आरोग्यावर होतो. हे झुरळं जेवणावरून व भांड्यांवरून फिरतात. ज्यामुळे आरोग्याच्या निगडीत समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. या झुरळांपासून सुटका करायची असेल तर हे घरगुती उपाय नक्कीच करुन पाहा(How do you get rid of roaches overnight without killing them?).

पहिली ट्रिक

छोटे गोळे तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

बोरिक पावडर (कॅरम पावडर) - 4 चमचे

मैदा किंवा अ‍ॅरोरूट पावडर

साखर

पदार्थांचे फोटो पाहून भूक भागली असती तर जगात अजून काय हवे? रिसर्चचा अजब दावा

झुरळांना पळवून लावण्यासाठी छोटे गोळे तयार करा, यासाठी सर्व साहित्य एकत्र घेऊन मळून घ्या. व त्याचे लहान गोळे तयार करा. हे गोळे स्वयंपाकघरातील कॅबिनेटमध्ये, सिंकच्या मागे, डस्टबिनजवळ, ओव्हनच्या बाजूला, फ्रिजच्या खाली व  घरातील इतर कोपऱ्यात ठेवा. हे लाडू १५ दिवसांत बदलत राहा.

दुसरी ट्रिक

स्प्रे करण्यासाठी लागणारं साहित्य

अगरबत्ती

कपूर

स्प्रे बाटली

लिंबू किंवा व्हिनेगर

कापूस

कळकट-तेलकट झालेल्या उशा धुवायच्या आहेत? १ उपाय-उशा दिसतील नव्यासारख्या

स्प्रे करण्यासाठी एक कागद घ्या, त्यावर कापूर व अगरबत्तीच्या स्टिक वेगळ्या करून ठेवा. त्यांची बारीक पावडर करा. बारीक पावडर केल्यानंतर एका स्प्रे बाटलीत भरा, त्यात अर्धा कप व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिसळा, व थोडे पाणी घाला.

हे मिश्रण चांगले मिक्स करा. आता स्वयंपाकघरातील कोपऱ्यात फवारणी करा. किंवा कापसावर तयार लिक्विड घ्या, व कापसाचा गोळा कोपऱ्यात ठेवा. या मिश्रणाचा वास खूप तीव्र असतो. ज्यामुळे झुरळ पळून जातात.

टॅग्स :किचन टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल