Join us  

घाई - गडबडीत किसणीवर किसताना बोटाला लागतं ? आता ती भीती विसरा, २ सोप्या ट्रिक्स, हाताला लागणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2023 9:13 PM

Grate With Confidence : To Prevent Injury to Fingers During Grinding Activity : अनेकदा किसणीवर किसताना किसणी हातांतून सटकून बोटं कापण्याची शक्यता असे अशावेळी वापरा दोन सोपे उपाय...

रोजचा स्वयंपाक करायचा म्हणजे आपल्याला किचनमध्ये कापणे, चिरणे, सोलणे, किसणे अशा अनेक कृती कराव्या लागतात. गृहिणी रोजच्या कामात या सगळ्या कृती आवर्जून करतातच. अशी किचनमधील छोटी - मोठी कामे करण्यासाठी किचनमध्ये विविध उपकरणं देखील असतात. आपण या उपकरणांचा वापर करुन किचनमधील ही रोजची कामे अतिशय सहजरित्या चटकन करु शकतो. किचनमधील मिक्सर, फूड प्रोसेसर, ओव्हन, मायक्रोव्हेव यासोबतच इतर लहान - मोठी उपकरण देखील रोजची काम कमी वेळात करण्यास मदत करतात(How do you grate without hurting your fingers?).

रोजचा स्वयंपाक करायचा म्हटलं की, आपल्याला त्यात वेगवेगळ्या गोष्टी या किसून घ्याव्या लागतात. वाटण - घाटण करण्यासाठी सुक - ओलं खोबर किसावे लागते. आलं लसूण पेस्ट तयार करण्यासाठी हे दोन्ही जिन्नस किसून घ्यावे लागतात. याउलट जर कधी काही खास पदार्थ बनवायचा म्हटलं की त्या त्या वेळी गरजेनुसार वेगवेगळ्या भाज्या चिरुन घ्याव्या लागतात. कोशिंबीर करायची असल्यास गाजर, बीट किसावे लागते. घरातील काही लहान मुलं भाज्या खाण्यासाठी नाकं मुरडतात अशावेळी गृहिणी या भाज्या किसून बारीक करुन त्याचा छान स्टफ परत बनवते. अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण किसणे ही कृती करतो. असे असले तरीही काहीवेळा किसणीवर किसताना (How do you grate without cutting your fingers) अचानक किसणी सटकून बोट कापले जाण्याची शक्यता अधिक असते. असा प्रसंग कदाचित आपल्यासोबत याआधी देखील झाला असेल. अशा परिस्थितीत, किसणीवर किसताना आपले हात, बोट कापले जाऊ नये यासाठी २ सोप्या ट्रिक्स फॉलो करुयात(Grate With Confidence : To Prevent Injury to Fingers During Grinding Activity).

किसणीवर किसताना आपले बोट कापले जाऊ नये म्हणून नेमकं काय कराव... 

१. सगळ्यांत आधी एक मोठा बाऊल किंवा भांड घेऊन त्यावर आपली पसरट किसणी आडवी ठेवून द्यावी. आता ही बाऊल वरील किसणी डाव्या हाताने व्यवस्थित पकडावी जेणेकरून त्याला ग्रीप येईल. आता या किसणीवर आपल्याला जो कोणताही पदार्थ किसायचा आहे तो ठेवावा जसे की, गाजर, बटाटा, काकडी, बीट ठेवावे. त्यानंतर एक अजून एक किसणी घेऊन ती उजव्या हातात धारावी. या किसणीच्या सपाट पृष्ठभागाने जो पदार्थ किसायचा आहे तो व्यवस्थित ग्रीप करून धरून घ्यावा व किसायला सुरुवात करावी. यामुळे आपले बोट किंवा हात कापले न जाता पदार्थ किसणीवर झटपट किसून होतो. त्याचबरोबर काहीवेळा किसताना या पदार्थाचा आकार लहान लहान होत जातो त्यामुळे शेवटी शेवटी तो पदार्थ आकाराने लहान होऊन पकडायला व्यवस्थित न जमल्याने आपण तो किसणे टाळतो. परंतु या सोप्या ट्रिकचा वापर करुन आपण बोट न कापता झटपट झटपट किसणीवर पदार्थ किसू शकतो. 

रोजच्या वापरातला चपातीचा तवा झाला खराब ? १ सोपी ट्रिक, तवा होईल पुन्हा नव्यासारखा चकाचक...

कुकरची शिटी स्वच्छ कशी करायची ? काचेच्या बाटलीवरचे स्टिकर कसे काढायचे ? घ्या एकदम सोपे झटपट उपाय...

२. यासोबतच आपण जेव्हा किसणीवर एखादा पदार्थ किसतो तेव्हा तो पदार्थ किसता किसता त्याचा आकार लहान होतो. तो पदार्थ एकाच बाजूने किसला गेल्यामुळे तो पदार्थ आणि किसणी यांच्यामध्ये एक प्रकारची गॅप तयार होते. ही गॅप तयार झाल्यामुळे नंतर तो पदार्थ व्यवस्थित किसला जात नाही. अशावेळी तो पदार्थ आपण ज्या बाजूने किसत होतो त्याच्या विरुद्ध बाजूने पकडून किसण्यास सुरुवात करावी असे केल्यामुळे तो पदार्थ पटकन किसला जातो. किसणीवर एखादा पदार्थ किसताना तो एकाच बाजूने किसणीवर न घासता हळूहळू सगळ्या बाजुंनी फिरवत किसावा यामुळे तो व्यवस्थित किसला जातो.

डबे - बरण्यांचा लोणची - मसाल्यांचा वास जात नाही ? १ सोपी ट्रिक - वास जाईल पटकन...

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्स