Join us

नवरात्रीत अखंड दिवा लावताय ? दिवा विझू नये यासाठी ८ टिप्स, दिवा अखंड तेवत राहील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2024 07:31 IST

How do you keep Akhand Jyot burning for a long time : How To Start and Manage Akhand Jyoti or Akhand Deepam During Navaratri : Akhand Diya Navratri : नवरात्रीत अखंड दिवा लावणार असाल तर जाणून घ्या या महत्वाच्या टिप्स...

नवरात्र सुरु होण्यास आता काही मोजकेच दिवस बाकी आहेत. नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहात होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसवले जातात. यासोबतच काहीजण अखंड दिवा (Akhand Diya Navratri) देखील तेवत ठेवतात. या दिव्यात नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते. संपूर्ण नऊ दिवस ही अखंड ज्योत तेवत ठेवली जाते. खरंतर, नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस ही दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवणे सोपे नाही. यासाठी फार लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक दिवा लावणे गरजेचे असते(How To Start and Manage Akhand Jyoti or Akhand Deepam During Navaratri).

नवरात्रीच्या नऊ दिवसांत अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरु आहे. या प्रथेला स्वतःचे असे धार्मिक आणि अध्यात्मिक महत्व असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अखंड दिव्याची ज्योत लावल्यानंतर ही ज्योत नऊ दिवस तेवत राहावी यासाठी आपण काही खास टिप्सचा वापर करु शकतो. या टिप्सचा वापर करुन नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा विझू न देता तेवत ठेवण्यास मदत होईल(How do you keep Akhand Jyot burning for a long time).  

नवरात्रीत अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी काय करावे ? 

१. अखंड ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा. यामुळे दिव्यात तेल, तूप जास्त प्रमाणात राहू शकेल. शक्यतो मातीच्या किंवा पितळेच्या दिव्यात ज्योत लावावी.

२. अखंड ज्योत लावताना तूप किंवा मोहरी, तिळाच्या तेलाचा वापर करावा. दिव्यातील तेल, तूप संपत आले की पुन्हा त्यात तेल - तूप घालावे. 

नवरात्र स्पेशल: काळे पडलेले ऑक्सिडाइज्ड दागिने चमकतील नव्यासारखे, घ्या ६ टिप्स- गरब्यासाठी व्हा रेडी... 

३. अखंड दिव्याची वात काहीजण कापूस वापरुन तयार करतात तर कधी रक्षा सूत्राचा देखील वापर केला जातो. जर आपण कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजेच नऊ दिवस पुरेल इतकी तयार करुन घ्या. जर रक्षा सूत्राचा वापर करणार असाल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावे. रक्षा सूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात यामुळे ज्योत अखंड तेवत राहते. 

४. दिवा लावण्यासाठी त्यात तेल - तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडेसे तांदुळाचे दाणे घालावेत. या तांदुळाच्या दाण्यांमुळे दिव्याला अखंड तेवत राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, यामुळे दिवा विझत नाही. 

नवरात्रीत रुजवण घालण्याची पाहा ‘ही’ सोपी पद्धत, येईल हिरवागार कोवळा सुंदर बहर...

५. दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा, जेणेकरुन त्याची ज्योत विझण्याची भीती राहत नाही. 

६. अखंड दिवा वाऱ्याने विझू नये म्हणून भोवती काचेचे आच्छादन ठेवावे.

गरबा खेळून घाम येतो - मेकअप पसरू नये म्हणून 'असा ' करा वॉटरप्रूफ मेकअपबेस...

७. अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याच्या मदतीने काढायला विसरु नका. ठराविक तासांनी ज्योतीवरील काजळी काढून घ्यावी. यामुळे दिवा अखंड तेवत राहण्यास मदत होते. काजळी काढताना दिव्याची वात किंचित वर करावी यामुळे ज्योत थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विझत नाही, याउलट वात लहान असेल तर ती पटकन विझते यामुळे काजळी काढतांना विशेष लक्ष देणे गरजेचे असते. 

८. सगळ्यात महत्वाचे म्हणजे दिवा नवरात्रीचे नऊ दिवस अखंड तेवत ठेवण्यासाठी दिव्यात भीमसेनी कापूराची एक वडी घालावी. जर भीमसेनी कापूर नसेल तर आपण दिवा प्रज्वलित करताना एकदाच त्यात एक लवंग आणि अगदी चिमूटभर हळद घालावी यामुळे दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळून दिवा न विझता अखंड तेवत राहण्यास मदत मिळते.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४नवरात्रीसोशल व्हायरल