Lokmat Sakhi >Social Viral > बाथरूम साफ करताना हातांची जळजळ होते? केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर टाळा, करून पाहा ५ रुपयांच्या तुरटीचा वापर

बाथरूम साफ करताना हातांची जळजळ होते? केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर टाळा, करून पाहा ५ रुपयांच्या तुरटीचा वापर

How do you use alum to clean Bathroom : टाईल्स, वॉश बेसिन, नळावरील गंजाचे डाग काढण्यासाठी करा ५ रुपयांच्या तुरटीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2023 06:31 PM2023-12-07T18:31:24+5:302023-12-07T18:32:10+5:30

How do you use alum to clean Bathroom : टाईल्स, वॉश बेसिन, नळावरील गंजाचे डाग काढण्यासाठी करा ५ रुपयांच्या तुरटीचा वापर

How do you use alum to clean Bathroom | बाथरूम साफ करताना हातांची जळजळ होते? केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर टाळा, करून पाहा ५ रुपयांच्या तुरटीचा वापर

बाथरूम साफ करताना हातांची जळजळ होते? केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर टाळा, करून पाहा ५ रुपयांच्या तुरटीचा वापर

आपले घर स्वच्छ आणि नीटनेटके राहावे असे प्रत्येकाला वाटते. पण कामाच्या व्यापामुळे प्रत्येक वेळेस घर साफ करायला वेळ मिळेलच असे नाही. घर साफ करण्यापेक्षा बाथरूम (Bathroom Cleaning Tips) साफ करताना महिलांचा घाम गळतो. कारण बाथरूममधील फरशी, नळावरील गंजाचे डाग, वॉश बेसिनवरील पिवळट डागांमुळे बाथरूम अधिक खराब दिसते. अनेकदा साफ करूनही हे डाग सहसा लवकर निघत नाही. बाथरूम स्वच्छ करण्यासाठी आपण महागड्या केमिकल उत्पादनांचा वापर करतो. या प्रॉडक्ट्सच्या वापराने बाथरूम स्वच्छ होईलच असे नाही.

जर आपल्याला महागड्या उत्पादनांचा वापर करायचा नसेल तर, ५ रुपयांच्या तुरटीचा वापर करून पाहा. आता तुम्ही म्हणाल, तुरटीच्या वापराने बाथरूम कसे स्वच्छ होईल? याच्या वापराने आपण बाथरूममधील डाग सहज काढू शकता. बाथरूममधील डाग काढण्यासाठी तुरटीचा वापर कसा करावा पाहूयात(How do you use alum to clean Bathroom).

वॉश बेसिन

पाण्याच्या डागांमुळे अनेकदा वॉश बेसिन खराब दिसते. अशावेळी आपण वॉश बेसिन स्वच्छ करण्ण्यासाठी आपण तुरटीचा वापर करू शकता. यासाठी तुरटीचा तुकडा पाण्यात २० मिनिटांसाठी घालून ठेवा. तुरटी पाण्यात चांगली विरघळली की त्या पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळा. आता हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरा, व या पाण्याने आठवड्यातून दोनदा वॉश बेसिन स्वच्छ करा.

गरब्याचा जागतिक सन्मान, युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून घोषित! गरब्याच्या तालावर जग थिरकणार

नळावरील गंज काढण्यास उपयुक्त

पाण्याच्या सततच्या संपर्कात आल्यामुळे नळावर गंज चढतो. हे गंजाचे डाग आपण तुरटीच्या वापराने काढू शकता.  यासाठी २ इंच तुरटी किंवा तुरटीची पावडर एक मग पाण्यात मिसळा. त्यानंतर त्यात एक चमचा व्हिनेगर घाला. नळावर हे पाणी शिंपडा आणि काही वेळ तसेच राहू द्या. त्यानंतर क्लिनिंग ब्रश किंवा स्क्रबच्या मदतीने साफ करा.

गॅस सिलेंडरच्या पाईपलाही असते एक्सपायरी डेट, आत्ताच घरातील पाईप चेक करा, अन्यथा घडेल दुर्घटना, वेळीच काळजी घ्या.

टाईल्स

बाथरूमच्या टाइल्स आणि आरशांवर अनेकदा पाण्याचे डाग पडतात. या डागांमुळे बाथरूम अस्वच्छ दिसते. यासाठी १ लिटर पाण्यात तुरटीचे १ ते २ इंच आकाराचे तुकडे घालून गरम करा. यानंतर या पाण्यात कापड ओले करून त्याने टाईल्स स्वच्छ करा. 

Web Title: How do you use alum to clean Bathroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.