रोजची आंघोळ करणे जितके महत्वाचे आहे तितकेच कपड्यांची स्वच्छता ठेवणे देखील महत्वाचे असते. कपडे स्वच्छ धुतल्याने त्यातील मळ, घाम, येणारी दुर्गंधी ही नाहीशी होऊन कपडे पुन्हा वापरण्यासाठी (How long do you soak clothes in detergent before washing?) फ्रेश होतात. आजकाल सगळ्यांकडे सामान्यतः कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. शक्यतो आता सहसा आता फारसे कुणीच हाताने कपडे धूत नाहीत. परंतु जेव्हा हाताने कपडे धुण्याची वेळ येते तेव्हा ते अधिक स्वच्छ होण्याच्या हेतूने ते आपण आधीच डिटर्जंच्या पाण्यांत बुडवून ठेवतो(For how much time should I soak clothes in detergent before washing?).
जर आपले कपडे जास्तच मळके किंवा घाणेरडे झाले असतील तर ते आपण वॉशिंग मशीन ऐवजी हाताने धुणे अधिक सोयीचे मानतो. अशा मळक्या कपड्यांवरचा मळ, घाण काढून टाकण्यासाठी हे कपडे धुण्याआधी आपण डिटर्जंच्या पाण्यांत भिजवून ठेवतो. जेणेकरून कपडे धुण्याआधी ३ ते ४ तास ते डिटर्जंटच्या पाण्यांत भिजवून ठेवले तर त्यातील मळ किंवा त्याला लागलेले डाग काढणे सोपे जाते. परंतु असे कपडे डिटर्जंटच्या पाण्यांत तासंतास (What Happens If You Soak Clothes For Too Long) बुडवून ठेवणे योग्य आहे का ? डिटर्जंटमध्ये कपडे जास्त वेळ भिजवल्याने घाण अधिक चांगली निघते असा काहींचा विश्वास असतो. परंतु कपडे नेमके किती वेळ (How To Soak Clothing Before Washing) पाण्यात भिजत ठेवावेत हे पाहूयात(How long do you soak clothes in detergent before washing).
डिटर्जंटच्या पाण्यामध्ये कपडे जास्त वेळ भिजवून ठेवल्यास काय होते ?
पाणी आणि डिटर्जंटचा वापर केल्याने कपडे स्वच्छ होतात यात शंका नाहीच. परंतु यासाठी कपडे तासंतास डिटर्जंटच्या पाण्यांत बुडवून ठेवणे हे अजिबात योग्य नाही. डिटर्जंटच्या पाण्यामध्ये कपडे जास्त वेळ भिजवत ठेवले तर ते खराब होण्याची शक्यता अधिक असते. प्रामुख्याने नाजूक नक्षीकाम किंवा डिझाईन्स केलेले कपडे हे असे तासंतास पाण्यात भिजवून ठेवल्याने त्यावरचे नक्षीकाम किंवा डिझाईन्स खराब होण्याची शक्यता असते. कपडे धुण्याआधी तासंतास पाण्यांत भिजत ठेवल्यास कपड्यांचा रंग जाणे, कापड खराब होणे, कपडे श्रींक होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊन कपडे खराब होण्याची शक्यता असते. यासोबतच कपडे तासंतास पाण्यांत भिजत ठेवल्याने ते धुतल्यानंतरही त्यातून कुबट दुर्गंधी येण्याची शक्यता असते.
वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये साचला काळा घाण थर ? ३ सोप्या ट्रिक्स, ड्रायर करा चुटकीसरशी स्वच्छ...
वीज बिल जास्त येईल म्हणून रोज वॉशिंग मशीन लावत नाही ? ६ टिप्स, रोज मशीन लावूनही वीजबिल येईल कमी...
कपडे धुण्यापूर्वी किती वेळासाठी डिटर्जंटच्या पाण्यांत भिजवून ठेवणे योग्य आहे ?
कपडे धुण्यापूर्वी जास्तीत जास्त अर्धा ते एक तासासाठी पाण्यांत भिजवून ठेवणे योग्य ठरु शकते. कपड्यांवर नेमका किती मळ, घाण, दुर्गंधी लागली आहे यावर ते किती वेळासाठी पाण्यात भिजत ठेवावेत हे महत्वाचे आहे. नाजूक नक्षीकाम, लेसवर्क किंवा थ्रेडवर्क केलेले कपडे २ ते ३ मिनिटेच पाण्यांत भिजत ठेवणे योग्य आहे. रेशमी आणि लोकरीचे कपडे ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळासाठी पाण्यात भिजवत ठेवू नये. त्याचवेळी, कापूस आणि इतर डेलिकेट कपडे केवळ ६० मिनिटे पाण्यात भिजवले जाऊ शकतात.
वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...
कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...
कपडे पाण्यांत भिजवण्यापूर्वी...
कपडे पाण्यात भिजवण्यापूर्वी त्यावरील सगळे डाग पाण्यांने स्वच्छ धुवून काढून घ्यावेत. त्यानंतरच कपडे पाण्यांत भिजवून ठेवावेत. लाईट रंगांच्या कपड्यांना कधीही डार्क रंगांच्या कपड्यांसोबत भिजत घालू नये. एकमेकांचा रंग कपड्यांना लागून कपडे खराब होण्याची शक्यता असते. नाजूक नक्षीकाम, लेसवर्क किंवा थ्रेडवर्क केलेले कपडे कधीही रफ फॅब्रिक असणाऱ्या कपड्यांसोबत भिजायला ठेवू नयेत.