Join us  

भांडी घासण्याचा स्क्रबर किती दिवस वापरावा? तज्ज्ञ सांगतात, १ चूक पडते महागात -इन्फेक्शनचा धोका वाढतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2024 7:19 PM

Kitchen Cleaning Sponge Scrub Health Risks & Maintenance Tips : How long is it safe to use a sponge for cleaning, even if you keep it clean and use it often : स्वयंपाकघरातील स्क्रबर - स्पंजमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात म्हणून असा स्क्रबर वापरणे टाळा...

भांडी घासण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या घासणी किंवा स्क्रबरचा वापर करतो. हे स्क्रबर स्पंज, तार किंवा प्लॅस्टिक अशा वेगवेगळ्या मटेरियल पासून तयार केलेले असतात. रोजची खरकटी भांडी घासण्यासाठी या स्क्रबरचा वापर होतो. पूर्वी भांडी घासण्यासाठी काथ्याचा वापर केला जायचा. पण हळूहळू स्टील,अ‍ॅल्यूमिनिअमची भांडी जाऊन नॉनस्टीक, काचेच्या किंवा सिरॅमिक भांड्यांचा वापर केला जाऊ लागला. त्यामुळे ही भांडी घासण्यासाठी काथ्याऐवजी स्पंज किंवा स्क्रबरचा वापर करण्यात येऊ लागला आहे. स्वयंपाक घरातील फक्त भांडीच नाही तर संपूर्ण किचन स्वच्छ करण्यासाठी आपण या स्क्रबरचा वापर करतो. या एका स्क्रबरने आपण अनेक प्रकारच्या वस्तू स्वच्छ करु शकतो. आपण हा स्क्रबर एकदा का वापरायला काढला की जोपर्यंत तो फाटून पूर्णपणे जीर्ण होत नाही तोपर्यंत आपण तो स्क्रबर वापरतो. परंतु असे करणे योग्य आहे का ? एकदा वापरायला काढलेला हा स्क्रबर नेमका किती दिवसांसाठी वापरावा याबद्दल अनेकांना माहिती नसते(Kitchen Cleaning Sponge Scrub Health Risks & Maintenance Tips).

भांडी साफ करण्यासाठी स्क्रबरचा जास्त वेळ वापर केल्यानेही आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. २०१७ मध्ये, जर्मनीतील फर्टवांगेन विद्यापीठात यासंबंधीचा अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासानुसार, स्वयंपाकघरातील स्क्रबर आणि स्पंजमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात. नवी दिल्लीतील फिजिशियन डॉक्टर अकबर नक्वी यांनी स्क्रबरच्या वापराबद्दल अधिक माहिती सांगितली आहे.  यामुळे या भांडी घासण्याच्या स्क्रबरची स्वच्छता नेमकी कशी करावी, तसेच एक स्क्रबर किती दिवस वापरावा अशा अनेक गोष्टींची माहिती समजून घेऊयात(How long is it safe to use a sponge for cleaning, even if you keep it clean and use it often?)

१. किचन स्पंजमध्ये बॅक्टेरिया कधी वाढू शकतात?

 बहुतेक घरांमध्ये स्पंज किंवा स्क्रबरचा वापर दिवसातून किमान २ ते ३ वेळा केला जातो, त्यामुळे तो ओला राहतो. सुकायला पुरेसा वेळ मिळत नाही. या सततच्या ओलाव्यामुळे त्यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया वाढू लागतात. याशिवाय स्पंज किंवा स्क्रबरच्या आतील भागात अन्नाचे छोटे कण जास्त काळ अडकून राहिल्यास बॅक्टेरियाचा धोका अधिक वाढतो.

मातीच्या भांड्यात स्वयपाक केला की भांड्यांचा तेलकट वास जात नाही? ८ सोपे उपाय-भांडी चमकतील नव्यासारखी... 

२. स्क्रबर आणि स्पंजमध्ये कोणत्या प्रकारचे बॅक्टेरिया असू शकतात?

 भांडी, सिंक किंवा गॅस स्टोव्ह साफ करताना, स्पंजच्या आतील भागात अडकलेले छोटे कण अनेक वेळा पाण्याने धुतल्यानंतरही बाहेर पडत नाहीत. जेव्हा हे कण जास्त काळ स्क्रबर आणि स्पंजला चिकटून राहतात तेव्हा त्यांच्यामध्ये साल्मोनेला, ई. कोलाय आणि स्टॅफिलोकोकस सारखे जीवाणू वाढू लागतात.

३. स्क्रबर आणि स्पंजच्या बॅक्टेरियामुळे कोणत्या प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात?

 डॉ. अकबर नक्वी सांगतात की जर भांडी व्यवस्थित स्वच्छ केली गेली नाहीत तर स्क्रबर आणि स्पंजमधील बॅक्टेरिया भांड्यांना चिकटून अन्नासोबत पोटात जाऊ  शकतात. हे आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. स्क्रबरमध्ये असलेले साल्मोनेला, ई-कोली किंवा स्टॅफिलोकोकस सारखे जीवाणू अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढवतात. या जीवाणूंमुळे उलट्या, जुलाब किंवा पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात. अशा घाणेरड्या स्पंजला स्पर्श केल्याने त्वचेची जळजळ, पुरळ किंवा बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.

घरातील डस्टबीनमधून येते कुबट दुर्गंधी? ५ सोपे उपाय, डस्टबीन वारंवार स्वच्छ करण्याची गरजच नाही...

४. स्वयंपाकघरातील स्क्रबर किंवा स्पंज कधी बदलावे?

 फिजिशियन डॉ. अकबर नक्वी सांगतात की दर दोन किंवा तीन आठवड्यांनी किचन स्क्रबर बदलले पाहिजेत.

५. जिवाणूंच्या धोक्यापासून आपण स्वयंपाकघरातील स्पंजचे संरक्षण कसे करू शकतो?

जर तुम्ही नियमितपणे स्पंज किंवा स्क्रबर वापरत असाल तर ते व्यवस्थित स्वच्छ करणे गरजेचे आहे. स्पंजला ब्लिच किंवा डिटर्जंटच्या पाण्यात थोड्यावेळासाठी   भिजवा. त्यानंतर ते पिळून उन्हात चांगले वाळवा. साफसफाईनंतर स्पंज नीट न वाळवल्याने ओलाव्यामुळे त्याला कुबट वास येऊ शकतो. स्पंज कायम ओला राहिल्याने त्याला बुरशी देखील लागू शकते, म्हणून, साफसफाईनंतर स्पंज व्यवस्थित उन्हात वाळवा. ओले स्पंज वापरणे टाळा.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स