Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात कपडे वाळत नाही म्हणून कुणी 'असं' करतं का? पहा मुंबईकरांची कमाल.. व्हिडिओ व्हायरल 

पावसाळ्यात कपडे वाळत नाही म्हणून कुणी 'असं' करतं का? पहा मुंबईकरांची कमाल.. व्हिडिओ व्हायरल 

Social Viral: सारखा पाऊस (monsoon) सुरू असल्याने सध्या कपडे वाळविण्याची (drying clothes) अडचणच होत आहे.. या समस्येवर बघा मुंबईकरांनी कसा भन्नाट उपाय शोधून काढलाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 12:44 PM2022-07-16T12:44:29+5:302022-07-16T12:46:06+5:30

Social Viral: सारखा पाऊस (monsoon) सुरू असल्याने सध्या कपडे वाळविण्याची (drying clothes) अडचणच होत आहे.. या समस्येवर बघा मुंबईकरांनी कसा भन्नाट उपाय शोधून काढलाय...

How Mumbaikar dry their clothes in local train, Viral video of Mumbaikar | पावसाळ्यात कपडे वाळत नाही म्हणून कुणी 'असं' करतं का? पहा मुंबईकरांची कमाल.. व्हिडिओ व्हायरल 

पावसाळ्यात कपडे वाळत नाही म्हणून कुणी 'असं' करतं का? पहा मुंबईकरांची कमाल.. व्हिडिओ व्हायरल 

Highlightsसतत ८- १० दिवस पाऊस असेल तर कपडे सुकवायचे कसे हा प्रश्न घरातल्या महिलांना छळू लागतो. मुंबईकर महिलांनी मात्र या समस्येवर एक चांगला उपाय शोधून काढला आहे.

मुंबईकरांच्या बाबतीत एक गोष्ट नेहमीच बोलली जाते. ती म्हणजे मुंबईकर (Mumbaikar) हे अतिशय चिवट असतात. सहजासहजी हार मानणं किंवा एखादी गोष्ट जमत नाही, म्हणून सोडून देणं हे त्यांच्या स्वभावातच नसतं. म्हणूनच तर कोणतीही अडचण का येईना, कितीही त्रास का होईना ते प्रत्येक समस्येवर काही ना काही उपाय जरूर शोधून काढतातच.. आता मुंबईकरांच्या याच स्वभावाचा प्रत्यय सध्या समस्त नेटकरी घेत आहेत आणि त्यांनी शोधून काढलेल्या युक्तीचं कौतूक करत आहेत.

 

मागच्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रालाच पावसाने झोडपून काढले आहे. त्यातही मुंबई, ठाणे, कोकण या भागात तर जरा जास्तच पाऊस आहे. पाऊस अनुभवायला कितीही छान असला तरी अनेक प्रॅक्टीकल अडचणींना पावसामुळे तोंड द्यावेच लागते. यातली बहुतांश महिलांना छळणारी एक प्रमुख अडचण म्हणजे कपडे वाळवायचे कसे.. पावसामुळे एकतर घराबाहेर कपडे वाळत घालता येत नाहीत. त्यामुळे मग घरात वाळत घालावे लागतात. घरात वाळवले तर ढगाळ आणि दमट हवामानामुळे कपडे सुकता सुकत नाहीत. त्यांच्यातला ओलसरपणा तसाच राहतो. 

 

बरं आता एक- दोन दिवस कपडे नाही धुतले तर चालते. पण सतत ८- १० दिवस पाऊस असेल तर कपडे सुकवायचे कसे हा प्रश्न घरातल्या महिलांना छळू लागतो. मुंबईकर महिलांनी मात्र या समस्येवर एक चांगला उपाय शोधून काढला आहे. लोकलमध्ये प्रवास करताना ओले कपडे आपल्या सोबत ठेवायचे आणि जराशी मोकळी जागा बघून लोकलमध्ये (local train in Mumbai) असणाऱ्या हॅण्डलवर वाळत टाकायचे. बाहेरचं वारं लागून बऱ्यापैकी कपडे सुकत असतात. आहे की नाही मुंबईकर महिलांनी शोधलेला भन्नाट उपाय... लोकलमध्ये कपडे वाळत टाकल्याचा हा व्हिडिओ dadarmumbaikar या इन्स्टा पेजवरून शेअर करण्यात आला असून सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ''हे फक्त मुंबईतच होऊ शकतं...'', अशी कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आली आहे. 

 

Web Title: How Mumbaikar dry their clothes in local train, Viral video of Mumbaikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.