Join us  

जीन्स न धुता भरपूर वापरता? त्वचेचे आजार लागतील मागे, तज्ज्ञ सांगतात जीन्स धुताना काय करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2024 4:56 PM

How Often Should You Wash Jeans : How often do you really need to wash your jeans : जीन्स मळून खराब होत नाही म्हणून सारखी एकच जीन्स वापरताय ? जीन्स धुण्याच्या काही खास टिप्स...

प्रत्येकाच्या वॉर्डरॉबमध्ये असणारे कॉमन आऊटफिट म्हणजे जीन्स. जीन्स हे एक असे आऊटफिट आहे जे टीशर्ट, कुर्ता कशावरही सहज मॅचिंग होते. निळी, काळी, ग्रे, अशा बेसिक रंगांच्या जीन्स तर सगळ्यांकडेच असतात. काही मोजक्याच जीन्स असल्या तरीही त्या आलटून - पालटून वापरता येतात. स्त्री असो किंवा पुरुष जीन्स हे दोघांनाही कम्फर्टेबल वाटणारे असे आऊटफिट आहे. त्याचबरोबर आपण एकदा एक जीन्स वापरायला काढली की ती हमखास तीन ते चार वेळा वापरुन मगच धुवायला टाकतो. जीन्सचे कापड इतर कापडांपेक्षा जाड व मळखाऊ असल्याने ती शक्यतो आपण एकदा वापरुन धूत नाही(How often do you wash your jeans).

जीन्स हा बहुसंख्य लोकांचा आवडीचा आऊटफिट आहे. लहानांपासून ते अगदी म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सगळेच जीन्स घालणे पसंत करतात. मोकळी - ढाकळी, वापरायला सुटसुटीत अशी ही जीन्स सगळ्यांचीच फेव्हरेट आहे. या जीन्सची एक खासियत म्हणजे ही जीन्स कितीही रगडून बरेच दिवस वापरली तरीही ती नव्यासारखीच दिसते. जीन्स फारशी मळत नाही किंवा त्याच्यावर पडलेले डाग लगेच दिसत नाहीत त्यामुळे आपण जीन्स वारंवार (How often should you wash your jeans) धूत नाही. परंतु असे करणे योग्य आहे का ? एकच जीन्स नेमके किती वेळा वापरुन धुवायला टाकावी? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. त्यामुळे जीन्स किती वेळा वापरुन मग धुवायला टाकावी ? तसेच ती कशी धुवावी हे पाहूयात(How often do you really need to wash your jeans).

क्लीवलैंड क्लीनिकचे डर्मेटोलॉजिस्ट डॉ. आलोक विज सांगतात की, जीन्स संदर्भात काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. जेव्हा आपण जीन्स घालून बाहेर जातो तेव्हा त्या जीन्सवर धूळ, माती, अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, किटाणू येऊन चिकटतात. एवढेच नव्हे तर या जीन्सवर आपल्या स्किनमधील ऑईल, डेड स्किन, घाम इत्यादी गोष्टी चिटकून बसतात. या सगळ्यांमुळे आपली जीन्स ही एका प्रकारे बॅक्टरियाचे घरच झालेले असते. जर आपल्या जीन्समध्ये बॅक्टरियाचे प्रमाण वाढले तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्किन प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता असते. यामुळे आपल्या स्किनवर काळे - पांढरे चट्टे येणे, पुरळ येणे, स्किन लालसर होणे यासोबतच स्किनला फंगस येणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. जर आपल्या जीन्सवर जास्त प्रामाणात धूळ - माती लागून ती मळकी झाली आणि आपण ती तशीच न धुता वारंवार घातली तर आपल्याला स्किन प्रॉब्लेम्स होऊ शकतात.   

कढई - पातेली रोज वापरुन काळीकुट्ट झाली ? पाहा, कोळशाचा लहानसा तुकडा करेल जादू... 

किती दिवसांनी जीन्स धुतली पाहिजे ? 

जर जीन्स खूपच मळली असेल किंवा त्यावर अन्नपदार्थांचे डाग पडले असतील तर जीन्स लगेच धुणे गरजेचे असते. ज्या व्यक्तींना भरपूर प्रमाणात घाम येतो अश्यांनी जीन्स केवळ एकदा वापरुन ती लगेच धुवायला टाकावी. याउलट ज्यांना कमी घाम येतो त्यांनी २ ते ३ वेळा एक जीन्स वापरायला काहीच हरकत नाही. 

जीन्स कशी स्वच्छ करावी ? 

जीन्स वारंवार धुतल्याने त्याचा रंग फिकट होऊ शकतो, त्याचबरोबर कापडही खराब होऊ शकते. त्यामुळे जीन्स धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करावा. शक्यतो जीन्स वॉशिंग मशीनमध्ये न धुता हातांनी धुवावी. जीन्स धुण्यासाठी सौम्य डिटर्जंटचा वापर करावा. 

जीन्स फ्रिजिंग काय असते ?

जीन्सला सॅनिटाईझ करुन जर ती फ्रिजमध्ये ठेवली तर त्यातील बॅक्टेरिया मरुन जातात. याबाबत डॉ. आलोक विज म्हणतात, जर आपल्याला फ्रिजिंग पद्धतीने जीन्स स्वच्छ करायची असल्यास (- ८०) डिग्री च्या खाली तापमान असायला हवे, तेव्हाच ही जीन्स स्वच्छ होते.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स