Join us  

ना डोक्यावर छप्पर ना पोटाला अन्न, ‘तिचा’ एक निर्णय आणि झाली कोट्यवधींची मालकीण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2023 3:50 PM

How One Woman Went from Homeless to Millionaire In Less Than Two Years याला म्हणतात नशीब! गरीब बिचाऱ्या महिलेचं नशिब पालटलं आणि जग बदललं ते असं..

कोणाचं नशीब कधी पलटेल..काही सांगता येत नाही.  नशिबाचा खेळ म्हणण्यापेक्षा योग जुळणं देखील महत्वाचे असते. जगण्यासाठी रोटी - कपडा - मकान या तीन मुलभूत गोष्टी हव्याच. पण या गोष्टी नसेल तर जगणे कठीण जाते. एका महिलेकडे ना राहायला घर होते, ना खायला जेवण. तिने श्रीमंती ही फक्त स्वप्नातच पाहिली होती. पण, अचानक तिचं नशीब चमकलं आणि क्षणात ती कोट्यवधींची मालकीण झाली. या महिलेला तब्बल ४१ कोटींची लॉटरी लागली. व ती एका रात्रीत मालामाल झाली(How One Woman Went from Homeless to Millionaire In Less Than Two Years).

ही कहाणी आहे, अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या एका महिलेची. सिया फोर्सेथ नावाच्या या महिलेला नुकतीच ५ मिलियन डॉलर, म्हणजेच जवळपास ४१ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्यामुळे ती एवढा मोठा जॅकपॉट जिंकणाऱ्या जगातील मोजक्या लोकांपैकी एक बनली आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, लुसिया २०१७ पासून बेघर आहे. ती जागा मिळेल त्या ठिकाणी राहत होती. जेव्हा तिला हा जॅकपॉट घेण्यासाठी बोलावण्यात आले, तेव्हा त्याठिकाणी उपस्थित असलेले लोकही, तिला बघून आश्चर्यचकित झाले.

यासंदर्भात लुसिया म्हणाली, ''मी ६ वर्षांपूर्वी बेघर झाले, माझ्यासारख्या व्यक्तीसोबत असा काही चमत्कार घडेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी यावर्षी लग्न करणार आहे. ग्रॅज्युएशन या पदवीचे शिक्षण देखील लवकर पूर्ण होईल. एकंदरीत खूप आनंद होत आहे.''

ती पुढे म्हणते, ''स्वप्नात येणाऱ्या गोष्टी सत्यात घडताना बघून खूप आनंद होत आहे. माझ्याकडे पैसे नव्हते, पण एक दिवस अचानक वाटलं की लॉटरीचे तिकीट काढावं. कदाचित नशीब उघडेल. मी कॉन्ट्रा कोस्टा काउंटीमधील वॉलमार्ट स्टोअरमधून तिकीट खरेदी करण्याचा विचार केला.

तिथे पोहोचल्यावर मी जरा घाबरले. मग डोळे मिटून एक तिकीट निवडले. नंतर कळले की मला ही लॉटरी लागली''. लुसिया आता या पैशातून घर घेण्याचा विचार करत आहे. त्यानंतर लग्नही करणार आहे. त्यासाठी ती मुलगाही शोधत आहे.