Join us

कबुतरांच्या विष्ठेच्या वासामुळे हैराण झालात? बाल्कनीत लावा 'हे' रोप, सोप्या टिप्स - घरही राहिल स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2025 13:07 IST

How to keep pigeons away from balcony: Pigeon deterrents for balcony: Protect daffodil plants from pigeons: Simple pigeon repellent hacks: Pigeon control balcony tips: Easy ways to avoid pigeons in balcony garden: Daffodil plant protection from pigeons: Natural pigeon repellents for garden: कबुतर बाल्कनीत आल्याने संपूर्ण बाल्कनीचा लूक खराब होतो. त्यांच्या विष्ठेच्या वासाने संपूर्ण घर अस्वच्छ होते.

प्रत्येकालाच आपले घर नेहमीच स्वच्छ आणि सुंदर दिसावे असे वाटते. यासाठी आपण घरातील प्रत्येक कोपरा मोठ्या प्रेमाने आणि उत्साहाने सजवतात.(How to keep pigeons away from balcony) उन्हाळा सुरु झाला की, आपण आपल्या बाल्कनीत झाडे लावतो. या काळात अनेक पक्षी विसावा घेण्यासाठी आपल्या बाल्कनीत येतात, त्यातील एक कबुतर. (Pigeon deterrents for balcony)बाल्कनी म्हटलं तर आपण तिला सुंदर झाडे, फुले आणि टेबल खुर्च्यांनी सजवतो. परंतु कबुतर बाल्कनीत आल्याने संपूर्ण बाल्कनीचा लूक खराब होतो. (Simple pigeon repellent hacks)त्यांच्या विष्ठेच्या वासाने संपूर्ण घर अस्वच्छ होते. त्यामुळे आपल्याला सारखी बाल्कनी स्वच्छ करावी लागते. तसेच अनेक आजारही उद्भवतात. अशावेळी बाल्कनीत कोणते रोप लावायला हवे पाहूया. (Easy ways to avoid pigeons in balcony garden)

उन्हाळ्यात एसीचे बिल पाहून घाम फुटतो? ७ सोप्या टिप्स, बिल येईल कमी- मिळेल गारेगार हवेचं सुख

कबुतर आपल्या बाल्कनीत घाण करु नये यासाठी डॅफोडिल (नार्सिसस) नावाचे रोपटे आपण लावू शकतो. हे रोप दिसायला खूप सुंदर असते. डॅफोडिल वनस्पती कबुतरांना कसे घरापासून दूर ठेवते पाहूया. डॅफोडिल (नार्सिसस) वनस्पती त्याच्या वासासाठी ओळखली जाते. या वनस्पतीचा वास कबुतरांना असह्य करुन सोडतो. म्हणून ते डॅफोडिल्सजवळ जात नाहीत. तसेच हे झाड पर्यावरणही शुद्ध करते. या झाडाची अधिक काळजी घेण्याची देखील गरज नसते. 

या झाडाची निगा कशी राखायची?

1. डॅफोडिलला सूर्यप्रकाश आवडतो म्हणून आपण तो आपल्या बाल्कनीत लावायला हवा. त्याला अशा ठिकाणी ठेवा जिथे पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल. 

2. रोपाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल अशा ठिकाणी लावा. तसेच झाडाची मुळे कुजणार नाहीत, ती व्यवस्थित वाढतील. 

3. रोपाला नियमित पाणी द्या, परंतु माती आणि पाणी साचून राहाणार नाही याची काळजी घ्या. 

4. तसेच या रोपाला सेंद्रिय खत दिल्याने ते आणखी चांगले वाढते. तसेच हिरवेगार देखील राहाते.  

टॅग्स :सोशल व्हायरल