Lokmat Sakhi >Social Viral > किचन-ओटा, बेसिनजवळ रात्री खूप झुरळं फिरतात? १ उपाय, एकही झुरळ घरात दिसणार नाही

किचन-ओटा, बेसिनजवळ रात्री खूप झुरळं फिरतात? १ उपाय, एकही झुरळ घरात दिसणार नाही

How to Avoid Small Cockroaches (Cockroach Ghalvnyache Gharguti Upay) : झुरळांचा स्पर्श झालेले पदार्थ लहान मुलांनी खाल्ले तर आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 03:51 PM2023-11-22T15:51:27+5:302023-11-22T21:16:28+5:30

How to Avoid Small Cockroaches (Cockroach Ghalvnyache Gharguti Upay) : झुरळांचा स्पर्श झालेले पदार्थ लहान मुलांनी खाल्ले तर आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो.

How to Avoid Small Cockroaches in Kitchen : Small Cockroaches in Kitchen at Night | किचन-ओटा, बेसिनजवळ रात्री खूप झुरळं फिरतात? १ उपाय, एकही झुरळ घरात दिसणार नाही

किचन-ओटा, बेसिनजवळ रात्री खूप झुरळं फिरतात? १ उपाय, एकही झुरळ घरात दिसणार नाही

साफ सफाई (Home Hacks) केल्यानंतरही घरात सिंक, खिडकीजवळ झुरळांचा सुळसुळाट  झालेला दिसून येतो. एकदा झुरळं घरात शिरले की त्यांना बाहेर काढणं कठीण असतं. झुरळांना पळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे, कॉईल किंवा लिक्विडवर पैसे खर्च करतात इतके उपाय करूनही झुरळ दूर होत नाहीत. (How to Get Rid Of Cockroaches in Kitchen) 

झुरळांचा वावर वाढल्यामुळे खाण्यापिण्याचे पदार्थही दुषित होतात आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. झुरळांचा स्पर्श झालेले पदार्थ लहान मुलांनी खाल्ले तर आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. किचनमधील काही पदार्थ झुरळांना कायमचे दूर पळवण्यासाठी फायदेशीर ठरतील. (How To Get Rid of Cockroaches Kitchen Home Remedies)

झुरळांना पळवण्याचे लिक्विड कसे तयार करायचे

एप्पल सायडर व्हिनेगर,  लिंबाचे साल, हॅण्ड सॅनिटायजर, १५ लवंग हे साहित्य घरगुती लिक्वीड तयार करण्यासाठी लागेल.

स्प्रे कसा तयार करायचा?

एक बाऊल घ्या त्यात २ कप एप्पल सायडर व्हिनेगर घाला. नंतर एका बाऊलमध्ये लिंबाची साल कापून किंवा किसून घाला. एल्कोहोलयुक्त हॅण्ड सॅनिटायजरसुद्धा ४ चमचे मिक्स करा.  १५ लवंग घालून हे मिश्रण काहीवेळासाठी तसंच सोडून द्या. नंतर  हे मिश्रण स्प्रे  बॉटलमध्ये भरून किचन सिंक, कपाट किंवा फरशीवर स्प्रे करा. घरातील कोपरे, खिडक्या  ज्या ठिकाणी झुरळं जास्त येतात असं तुम्हाला वाटत असेल तिथे स्प्रे करा. 

झुरळांना पळवण्यासाठी स्प्रे कसा फायदेशीर ठरतो. (Getting Rid of Cockroaches in The Kitchen)

झुरळाना आंबट आणि  तीव्र सुगंध अजिबात आवडत नाही. यात वापरण्यात आलेलं व्हिनेगर आणि लिंबाच्या सालीच्या वासाने कॉकरॉच दूर पळतात. या स्प्रे च्या वापराने  झुरळांव्यतिरिक्त इतर किटकही दूर पळतील. हॅण्ड सॅनिटायजरचा वास झुरळांना दूर पळवण्यास फायदेशीर ठरतो. 

चपाती, पराठे करण्यात सकाळचा खूप वेळ जातो? कमी बजेटमध्ये घ्या रोटी मेकर्स, दुप्पट वेळ वाचेल

इतर उपाय

१) जर तुमच्याघरी रॉकेल असेल  तर याचे काही थेंब  किचनच्या कोपऱ्यांवर घाला. पण जेवणापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घ्या.  रॉकेलच्या तीव्र वासाने झुरळं पळून जातील आणि घरही स्वच्छ राहील.

पोट कमी करायचं-व्यायामासाठी वेळ नाही? ५ मिनिटं भिंतीला पाय लावा-झरझर घटेल चरबी

२) लवंगाचा रंग झुरळाप्रमाणेच असतो पण  लवंग  झुरळांना पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरतात. घराच्या कोपऱ्यांमध्ये लवंग ठेवा आणि प्रत्येक महिन्यात या लवंगा बदलत राहा. 

३) बेकिंग सोडा प्रत्येकाच्याच घरात असतो. एक कप पाण्यात साखर मिसळून त्यात बेकींग सोडा घाला आणि घराच्या कोपऱ्यावर शिंपडा.  साखरेचा वास झुरळांना स्वत:कडे आकर्षीत करेल. बेकींग सोड्यामुळे झुरळ जास्त दिवस घरात टिकणार नाहीत.  

Web Title: How to Avoid Small Cockroaches in Kitchen : Small Cockroaches in Kitchen at Night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.