Join us  

ऑफिसमध्ये आदर-अटेंशन हवे, न विसरता करा १० गोष्टी-बॉसही देईल कामाचे क्रेडिट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 4:07 PM

How to Be More Professional At Work : कोणताही विषय, कोणतीही  गोष्ट समजून घेऊन नंतर त्यावर रिएक्ट करा. आधीच व्यक्त होऊ नका.  

प्रत्येक ऑफिसमध्ये असे लोकं असतात जी सर्वांना आवडतात आणि सगळेजण त्यांना सन्मानही देतात.  इतकंच नाही तर लोक आपल्या मनातील भावना त्यांच्यासमोर व्यक्त करतात.  व्यक्तीवर लक्ष दिल्यास जाणवतं की काही सवयी  त्यांना लोकप्रिय बनवतात. (Tips To How To Behave In The Workplace) अशा लोकांच्या रोजच्या सवयी त्यांचा सन्मान, वॅल्यू वाढवतात अशा कोणत्या सवयी आहेत. ज्यामुळे तुमचं महत्व वाढू शकते ते पाहूया. (How to Be More Professional At Work)

1) असे लोक इतरांचे म्हणणे पटकन समजतात. कोणत्याही गोष्टीवर भांडण करण्याऐवजी ते गोष्टी समजण्यावर जास्त जोर देतात. त्यांच्या हिशोबाने लोकांना कंविन्स करतात.

2) चांगली पर्सनलिटी तुमचा आत्मविश्वास वाढवते. चांगल्या पर्सनॅलिटीचे लोक सर्वांना आवडतात म्हणून स्वत:ला टापटिप ठेवा.

3)  असे लोक नेहमी शिकायला तयार असतात. स्किल्स शिकल्याने आत्मविश्वास वाढतो. इतकंच नाही तर व्यक्तीला समजून घेण्यासही मदत होते. असे लोक शिकायला नेहमी तयार असतात आणि त्यांची ग्रोथ चांगली होके. इतरांना मोटिव्हेट आणि हेल्प करण्यासाठी नेहमी तयार असतात. एकमेकांना मदत करतात.

4) ऑफिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत असतात. प्रत्येक विषयाबद्दल ते माहीत  करून घेतात आणि आपलं मत विचारतात.  ज्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यास मदत होते. 

5) कोणताही विषय, कोणतीही  गोष्ट समजून घेऊन नंतर त्यावर रिएक्ट करा. आधीच व्यक्त होऊ नका.  न ऐकताच तुम्ही एखाद्या विषयावर मत मांडलं तर चुकीचं बोलू शकता म्हणून विचार करून बोला.

6) तुम्ही कितीही महागडे कपडे,  शूज वापरत असाल तरी आत्मविश्वाची कमतरता असेल तर पर्सनॅलिटी चांगली राहणार नाही. सेल्फ कॉन्फिडेंन्स लेव्हल वाढवण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वास ऑफिस आणि घर दोन्हींसाठी महत्वाचे असतो.  काऊंसलिंग किंवा ऑइलाईन मोटिव्हेशनल व्हिडिओज पाहून तुम्ही आत्मविश्वास वाढवू शकता.

मुलांच्या उत्तम वाढीसह मेंदूविकासासाठी आहारात हवे ५ पदार्थ, एकाग्रता-स्मरणशक्तीही वाढेल

7)  ऑफिसमध्ये कधीही उशीरा येऊ नका. वेळेत आपलं काम पूर्ण करा आणि वेळेवर जा. यामुळे तुमचा आदर्श इतरांना मिळेल आणि लोक तुमचा आदर करतील

8) आपली  जबाबदारी कायम पूर्ण करा. सतत कारणं देऊन काम टाळणं तुमच्या करियरच्या दृष्टीने आणि कामाच्या दृष्टीनेही चुकीचं आहे. म्हणून कामाला महत्व द्या.

९)  ऑफिसमध्ये कितीही पॉलिटिक्स सुरू असेल तरीही तुम्ही आपल्या कामाची प्रामाणिक राहा. काम चोख करा. जर तुमचे काम उत्तम असेल तर तुम्ही कुठेही  कसेही काम करू शकता तुम्हाला कोणीही काही बोलणार नाही.

कंबर-गुडघ्यांचं दुखणं फार वाढलंय? बाबा रामदेव सांगतात ५ पदार्थ खा-हाडं ठणकणंच होईल बंद

१०) ऑफिसच्या वेळेत गॉसिप करण्यापेक्षा आपल्या स्किल डेव्हलपमेंटकडे लक्ष देता. ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त इतर कामं शिकून घ्या.

टॅग्स :पालकत्व