Lokmat Sakhi >Social Viral > तासनतास रिल्स पाहता ? करा ५ गोष्टी - भणभणलेले डोके - स्ट्रेस होईल चटकन कमी...

तासनतास रिल्स पाहता ? करा ५ गोष्टी - भणभणलेले डोके - स्ट्रेस होईल चटकन कमी...

How to Stop Seeing Reels on Instagram : रिल्स पाहण्याच्या सवयींमुळे केवळ वेळच वाया जात नाही तर आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. या टिप्सच्या मदतीने आपण या व्यसनावर मात करू शकता....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2023 12:53 PM2023-10-26T12:53:02+5:302023-10-26T13:13:17+5:30

How to Stop Seeing Reels on Instagram : रिल्स पाहण्याच्या सवयींमुळे केवळ वेळच वाया जात नाही तर आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. या टिप्सच्या मदतीने आपण या व्यसनावर मात करू शकता....

How to Break the Instagram Addiction Cycle of Reels, How to Stop Seeing Reels on Instagram. | तासनतास रिल्स पाहता ? करा ५ गोष्टी - भणभणलेले डोके - स्ट्रेस होईल चटकन कमी...

तासनतास रिल्स पाहता ? करा ५ गोष्टी - भणभणलेले डोके - स्ट्रेस होईल चटकन कमी...

सध्याचा काळ हा सोशल मिडीयाचा जमाना आहे. आजकाल आपण येता - जाता सोशल मिडीयाचा जास्त वापर करतो. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा अनेक सोशल मिडिया अप्सचा आपण रोज वापर करत असतो. सध्याचा विचार केला असता, आजकाल रिल्सचा जमाना आहे. जो - तो व्यक्ती हातात मोबाईल घेऊन रिल्स बघण्यात व्यस्त असतो. अगदी शाळकरी मुलांपासून ते वयस्कर आजी - आजोबांपर्यंत सगळेच रिल्स बघून आपले मनोरंजन करतात. परंतु मनोरंजनाचे हे माध्यम आता लोकांसाठी अडचणीचे (How to Break the Instagram Addiction Cycle of Reels) ठरत आहे. आपण केवळ ५ मिनिटांसाठी मोबाईल फोन हातात घेतो पण रील्स (How can I stop watching Instagram reels? Is it an addiction?) स्क्रोल करत तास निघून जातात हे आपल्याला अनेकदा कळतही नाही. यामुळे वेळ तर वाया जातोच सोबतच आरोग्यावर याचे वाईट दुष्परिणामदेखील दिसून येतात(how to stop watching instagram reels).

टीव्हीवर चित्रपट पाहणे, सीरियल पाहणे आणि रेडिओवर गाणी ऐकणे या सगळ्या गोष्टी आता इतिहास जमा झाल्यात की काय असे चित्र दिसत आहे. या सतत रिल्स बघण्याच्या सवयींमुळे आपण दिवसांतील कित्येक तास हे वाया घालवतो. अशी सतत रिल्स (Addicted to Reels? How to limit Instagram usage without deleting the app) पाहण्याची सवय लागल्यामुळे त्याचे गंभीर व्यसनात कधी रूपांतर होते हे सांगता येत नाही. आपल्यापैकी बरेचजण असे असतात की आपल्याला आता रील पहायची नाहीत, परंतु सवयीमुळे आपण पुन्हा रील पाहू लागतो. असे कित्येकजण रिल्स (Addicted To Instagram’s Reels?) बघण्याच्या या सवयींपासून आपला पिच्छा (How to stop watching Reels on Instagram) सोडवण्याचा भरपूर प्रयत्न करतात. परंतु काहीवेळा ही सवय सोडण्यास वेळ लागू शकतो. जर आपल्यालासुद्धा रिल्स पाहण्याचे व्यसन लागले असेल तर काही सोप्या टिप्स फॉलो करुन आपण ही सवय सहज सोडवू शकता(How to Stop Seeing Reels on Instagram). 

सतत रिल्स बघण्याच्या या सवयींपासून सुटका करुन घेण्यासाठी टिप्स :- 

१. जर तुम्‍ही तुमच्‍या मनोरंजनासाठी रील इ. पाहत असाल तर तुमच्‍या करमणुकीचे माध्यम बदला. जर आपल्याला करमणूक किंवा थोडा वेळ घालवायचा असल्यास तुमच्या मित्र - मंडळींना भेटा, कुटुंबासोबत वेळ घालवा, कुटुंबासोबत एखादा खेळ खेळा, तुमचे आवडते छंद जोपासा. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला मोबाईलपासून दूर ठेवू शकाल.

तासंतास ऑफिसमध्ये बाक काढून - वाकून बसता ? चुकीच्या बॉडी पोश्चर सुधारण्याचे ७ फायदे, पाठीचा कणा सांभाळा...

२. सुट्टीच्या दिवशी किंवा वीकेंड दरम्यान आपला मोबाईल फोन स्वतःपासून दूर ठेवा. कुठेतरी बाहेर फिरायला जा. घरी कुटुंबासोबत चित्रपट पहा, बागकाम करा . यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि तुम्ही तुमच्या सुट्टीचा आनंदही घेऊ शकाल.

ट्रेडमिलवर चालावे की बाहेर मॉर्निंग वॉक ? फिट राहण्यासाठी नेमकं काय आहे फायदेशीर...

३. रील पाहण्यासाठी आपल्या मेंदूला जे काही ट्रिगर करते असे नोटिफिकेशन्स मोबाईलवर बघणे बंद करा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला वारंवार मोबाईलवर नोटिफिकेशन्स येत असतील तर असे नोटिफिकेशन्स पूर्णपणे बंद करा. हे तुमच्या मेंदूला पुन्हा पुन्हा ट्रिगर होण्यापासून रोखतील.

 ४. रिल्सच्या व्यसनापासून मुक्ती मिळवायची असेल तर मोबाईलमध्ये अलार्म लावा. मोबाइल्सवर रिल्स बघण्यासाठी ठराविक वेळेसाठीच मोबाईल फोन  वापरा. १५ ते २० मिनिटे पूर्ण होताच तुमचा अलार्म वाजेल आणि तुम्ही फोनपासून स्वतःला दूर ठेवाल. 

दिवसभरात १०,००० पाऊले चालले म्हणजे हार्ट ॲटॅकचा धोकाच नाही, तज्ज्ञ सांगतात असं तुम्हाला वाटत असेल तर...

५. जर आपण सर्व प्रयत्न करूनही आपले रिल्स पाहण्याचे व्यसन सुटत नसेल, तर तुम्ही ते सर्व अ‍ॅप्लिकेशन तुमच्या मोबाइल फोनमधून काढून टाकावे जे तुम्हाला पुन्हा पुन्हा रिल्स पाहण्यास प्रवृत्त करतात.

Web Title: How to Break the Instagram Addiction Cycle of Reels, How to Stop Seeing Reels on Instagram.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.