सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. आजकाल लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन असतोच. या स्मार्टफोनचा वापर आपण अनेक वेगवेगळ्या कामांसाठी करतो. यासोबतच या स्मार्टफोनमुळे (How to Stop Seeing Reels on Instagram) आपली अनेक काम अगदी चुटकीसरशी होतात. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा अनेक सोशल मिडिया (How To Stop Instagram Reels From Watching) अप्सचा आपण रोज वापर करत असतो. सध्याचा विचार केला असता, आजकाल रिल्सचा जमाना आहे. जो - तो व्यक्ती हातात मोबाईल घेऊन रिल्स बघण्यात व्यस्त असतो(How to Break the Instagram Addiction Cycle of Reels).
स्मार्टफोन म्हणजे अनेक कामांसोबतच विरंगुळा किंवा टाईमपास करण्याचे एक महत्वाचे साधन देखील आहे. आजकाल आपण पाहिलेच असेल की प्रत्येकजण मोबाईलवर इंस्टाग्राम उघडून रिल्स बघण्यात अधिक बिझी असतात. चालता, फिरता, उठता, बसता सतत आहे त्याच ठिकाणी तासंतास बसून रिल्स स्क्रोल करून पाहिले जातात. सुरुवातीचे काही दिवस आपल्याला हे रिल्स पाहून थोडा विरंगुळा वाटतो खरे, पण आपली हीच लहानशी सवय नंतर आपल्या रोजच्या जीवनाचा एक अतिशय महत्वपूर्ण भाग बनून जाते. सतत मोबाईलवर रिल्स पाहण्याची सवय लागली की आपली ही सवय मोडता मोडत नाही. मग ते घरातील आजी - आजोबा असू दे किंवा लहानमुलं मोकळ्या वेळात मोबाईलवर रिल्स बघण्याची सवय लागली की इतर गोष्टींचा विसर पडतो. यामुळे आपण दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर रिल्स बघण्यातच घालवतो. अशावेळी कितीही ठरवून आपल्याकडून ही रिल्स बघत तासंतास घालवण्याची सवय मोडणं फारच कठीण होऊन बसते. जर तुम्हाला देखील अशीच सतत हातात मोबाईल घेऊन रिल्स बघण्याची सवय लागली असेल तर ती सोडवण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहूयात.
सतत मोबाईलवर रिल्स बघण्याची सवय कशी मोडावी ?
१. कधीकधी सोशल मिडियापासून ब्रेक घेणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे, ज्याला 'डिजिटल डिटॉक्स' असेही म्हणतात. डिजिटल डिटॉक्समुळे तुमचे मन ताजेतवाने आणि फ्रेश होते. याचबरोबर तुम्हाला वास्तविक जीवनात परत आणते. हे तुम्हाला तुमच्या डिजिटल वापराबद्दल जागरूक करते आणि याच्या मदतीने तुम्ही तुमच्या सवयी सुधारू शकता.
२. जेव्हा कधी आपल्याला रिल्स पाहण्याचा मोह अनावर होईल तेव्हा स्वतःला इतर अॅक्टिव्हिटीमध्ये बिझी करून घ्यावे. आपण रिल्स स्क्रोल करण्याच्या वेळात आपल्या आवडीचे इतरही छंद जोपासू शकतो. अशा फावल्या वेळात आपण एखादे आवडते पुस्तक वाचू शकता, गाणी ऐकू शकता, योगसाधना - मेडिटेशन करु शकता. यामुळे तुमचा वेळ तर योग्य मार्गी लागेल शिवाय, तुमची मानसिक स्थितीही सुधारेल.
ना कामात मन लागतंय, ना झोप येते धड? छातीत धडधडतं- तुम्हाला खरंच ‘हा’ भयंकर आजार झालाय...
३. माइंडफुलनेस म्हणजे प्रत्येक क्षणी पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे. जेव्हाही तुम्हाला इन्स्टाग्राम तपासावेसे वाटेल, तेव्हा क्षणभर थांबा आणि तुम्ही खरोखरच त्याचा आनंद घेत आहात की नाही याचा विचार करा. आपण रिल्स बघण्याचा खरोखरच आनंद घेत आहोत की, ती फक्त आपली सवय झाली आहे हे स्वतःच स्वतःला विचारून तपासून पाहावे.
४. जर तुम्ही तुमच्या मनोरंजनासाठी रील इ. पाहत असाल तर तुमच्या करमणुकीचे माध्यम बदला. जर आपल्याला करमणूक किंवा थोडा वेळ घालवायचा असल्यास तुमच्या मित्र - मंडळींना भेटा, कुटुंबासोबत वेळ घालवा, कुटुंबासोबत एखादा खेळ खेळा, तुमचे आवडते छंद जोपासा. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला मोबाईलपासून दूर ठेवू शकाल.
मध -साखर नको, फक्त वाटीभर लिंबाचा रस वापरुन घरच्याघरी वॅक्सिंग करण्याची नवी पद्धत...
५. सुट्टीच्या दिवशी किंवा वीकेंड दरम्यान आपला मोबाईल फोन स्वतःपासून दूर ठेवा. कुठेतरी बाहेर फिरायला जा. घरी कुटुंबासोबत चित्रपट पहा, बागकाम करा . यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि तुम्ही तुमच्या सुट्टीचा आनंदही घेऊ शकाल.
६. रिल्स पाहण्यासाठी आपल्या मेंदूला जे काही ट्रिगर करते असे नोटिफिकेशन्स मोबाईलवर बघणे बंद करा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला वारंवार मोबाईलवर नोटिफिकेशन्स येत असतील तर असे नोटिफिकेशन्स पूर्णपणे बंद करा. हे तुमच्या मेंदूला पुन्हा पुन्हा ट्रिगर होण्यापासून रोखतील.
७. रिल्सच्या व्यसनापासून मुक्ती मिळवायची असेल तर मोबाईलमध्ये अलार्म लावा. मोबाइल्सवर रिल्स बघण्यासाठी ठराविक वेळेसाठीच मोबाईल फोन वापरा. १५ ते २० मिनिटे पूर्ण होताच तुमचा अलार्म वाजेल आणि तुम्ही फोनपासून स्वतःला दूर ठेवाल.
८. जर आपण सर्व प्रयत्न करूनही आपले रिल्स पाहण्याचे व्यसन सुटत नसेल, तर तुम्ही ते सर्व अॅप्लिकेशन तुमच्या मोबाइल फोनमधून काढून टाकावे जे तुम्हाला पुन्हा पुन्हा रिल्स पाहण्यास प्रवृत्त करतात.