Lokmat Sakhi >Social Viral > स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही? ६ भन्नाट टिप्स, लवकर होईल मोबाईल चार्ज

स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही? ६ भन्नाट टिप्स, लवकर होईल मोबाईल चार्ज

How to Charge Your Android Phone Faster पावसाळ्यात वारंवार लाईट जाते, यासाठी स्मार्टफोन झटपट चार्ज करण्यासाठी काही टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2023 05:52 PM2023-07-02T17:52:17+5:302023-07-02T17:53:07+5:30

How to Charge Your Android Phone Faster पावसाळ्यात वारंवार लाईट जाते, यासाठी स्मार्टफोन झटपट चार्ज करण्यासाठी काही टिप्स

How to Charge Your Android Phone Faster | स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही? ६ भन्नाट टिप्स, लवकर होईल मोबाईल चार्ज

स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही? ६ भन्नाट टिप्स, लवकर होईल मोबाईल चार्ज

सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला स्मार्टफोनची सवय लागली आहे. अनेकांना स्मार्टफोन शिवाय जमत नाही. स्मार्टफोनमुळे अनेक कामं सोपी झाली आहेत. सध्या पावसाळा सुरु आहे. पावसामुळे अनेक भागात सतत लाईट ये - जा करत असते. लाईट गेल्यामुळे स्मार्टफोनला चार्ज करणे कठीण होऊन जाते. व लाईट आल्यानंतर मोबाईल फोन झटपट चार्जिंग देखील होत नाही. जर आपला स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी जास्त वेळ घेत असेल तर, या काही टिप्सचा वापर करून पाहा. या टिप्समुळे अवघ्या काही मिनिटात स्मार्टफोन चार्ज होईल(How to Charge Your Android Phone Faster).

टर्बो चार्जरचा वापर करा

स्मार्टफोन जलद गतीने चार्ज करण्यासाठी टर्बो किंवा वेगवान चार्जरचा वापर करा. यामुळे सामान्य चार्जरच्या तुलनेत या वेगवान चार्जरमुळे स्मार्टफोन लवकर चार्ज होईल.

वरण-मसाल्यांचे डाग पडल्याने कुकरचं झाकण पिवळं पडलंय? ३ टिप्स, शिट्टी आणि झाकण होईल स्वच्छ

डार्क मोडचा वापर करा

डार्क मोडला चालू ठेवल्याने फोनची बॅटरी कमी खर्च होते. यामुळे स्मार्ट फोनचे ब्राईटनेस ही नियंत्रणात राहते. ज्यामुळे स्मार्टफोन वेगाने चार्ज होतो.  डार्क मोडमध्ये फोनची स्क्रीन आणि अॅप्लिकेशन डार्क थीममध्ये दिसते. यामुळे बॅटरी कमी खर्च होते.

अनावश्यक अॅप्स बंद करा

अनावश्यक अॅप्स जास्त बॅटरी खर्च करते. जे वापरण्यात येत नसतील त्या अनइन्स्टॉल करा. जेणेकरून इतर अॅप्सवर बॅटरी खर्च होणार नाही. अॅप्सला बॅकग्राउंडमध्ये चालवण्याची गरज नाही. अनावश्यक अॅप्स बंद केल्यास स्मार्टफोन लवकर चार्ज होण्यास मदत मिळते.

वायरलेस चार्जिंगचा वापर करा

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा असेल तर, त्याचा वापर करा. या चार्जरमुळे स्मार्टफोन जलद गतीने चार्ज होतो. आपण स्मार्टफोनला चार्जिंग पॅडवर ठेवून चार्ज करू शकता.

पावसाळ्यात घरात ट्यूबभोवती पाकोळ्या-किडे भिरभिरतात? ५ उपाय, किड्यांना न मारता ठेवा घराबाहेर

एअरप्लेन मोडचा वापर करा

स्मार्टफोन झटपट चार्ज व्हावा, यासाठी चार्ज करताना फोन एअरप्लेन मोडमध्ये चालू करा. एअरप्लेन मोडमध्ये फोनच्या सर्व नेटवर्कचे कनेक्सन बंद केले जाते. यामुळे बॅटरी कमी खर्च होते. तसेच स्मार्टफोन झटपट चार्ज होण्यास मदत मिळते.

चार्ज करताना स्मार्टफोन वापरू नका

जर तुम्ही चार्जिंगच्या वेळीही स्मार्टफोन वापरत असाल, तर स्मार्टफोनची बॅटरी खूप हळू चार्ज होते. जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन लवकर चार्ज करायचा असेल, तर, चार्जिंग करताना स्मार्ट फोन वापरू नका.

Web Title: How to Charge Your Android Phone Faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.