सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेगवेगळे पदार्थ करण्यासाठी गॅस चालूच असतो. हिवाळ्याच्या दिवसांत तर सगळीकडेच थंडी असल्याने स्वयंपाक घरातला गॅस जरा जास्तच लागतो. एरवी जास्त दिवस पुरणारं सिलेंडर हिवाळ्यात ८ ते १० दिवस आधीच संपतं. आता सिलेंडर संपलं की सगळं स्वयंपाक घर जणू ठप्प झाल्यासारखं होतं. नाही म्हणायला इंडक्शन, मायक्रोवेव्ह मदतीला असतात. पण गॅस सिलेंडरची सर त्यांना नाहीच. त्यामुळे सिलेंडर आणखी किती दिवस चालणार आहे याचा जर आपल्याला अंदाज आला तर आपण तो संपण्यापुर्वीच काही व्यवस्था निश्चितच करून ठेवू शकतो (how to check gas level in LPG cylinder at home?). त्यासाठीच या काही टिप्स पाहा.. त्यावरून तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातलं सिलेंडर आणखी किती दिवस चालणार आहे, याचा अंदाज येईल. (tips and tricks to check how much gas is left in the kitchen cylinder)
स्वयंपाकाच्या सिलेंडरमध्ये किती गॅस आहे हे ओळखण्याच्या टिप्स..
१. ओल्या कपड्याचा वापर
स्वयंपाकाच्या सिलेंडरमध्ये किती गॅस आहे हे तपासण्यासाठी तुम्ही एखाद्या ओल्या कपड्याचा वापर करू शकता. हा प्रयोग करण्यासाठी सगळ्यात आधी एखादा टॉवेल किंवा तसाच सुती कपडा ओला करा आणि तो सिलेंडरभोवती गुंडाळा.
कमी वयातच सुरकुत्या येऊन हात खूपच काेरडे पडले? 'हा' घरगुती स्क्रब लावा- हात होतील सुंदर
आता ५ ते ७ मिनिटाने सिलेंडर त्या कपड्याने पुर्ण ओलं झालं की कपडा काढून टाका. त्यानंतर सिलेंडरचं निरिक्षण करा. एक- दोन मिनिटांनी सिलेंडरचा काही भाग सुकलेला दिसेल तर काही भाग ओलसर असेल. जो भाग ओलसर असेल तेवढा त्यात गॅस आहे. सिलेंडरच्या आतला गॅस थंड असतो. त्यामुळे त्या भागावरचं पाणी लवकर वाळत नाही, असं त्यामागचं लॉजिक सांगितलं जातं.
२. गॅसची फ्लेम
तुमच्या गॅसच्या फ्लेमचा रंग कसा आहे ही देखील गॅस सिलेंडर संपत आलं आहे का हे ओळखण्याची एक सोपी युक्ती आहे.
रात्री काही केल्या लवकर झोप येत नाही? ५ टिप्स- झोपेचे बिघडलेले चक्र सुधारेल- शांत झोप येईल
जर तुमच्या गॅस फ्लेमचा रंग निळसर झाला असेल तर गॅस अजून भरपूर दिवस चालेल. पण तोच जर केशरी रंगाचा दिसत असेल तर मात्र तुमच्या सिलेंडरमधला गॅस संपत आला आहे.