Lokmat Sakhi >Social Viral > माठ खरेदी करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, टाळा केमिकलने रंगवलेले माठ

माठ खरेदी करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, टाळा केमिकलने रंगवलेले माठ

How To Choose Clay Pots And Maintain It मातीचे मडके खरेदी करताय? तुमचे मडके केमिकल - खराब मातीपासून तर बनले नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2023 03:29 PM2023-04-30T15:29:16+5:302023-04-30T15:30:03+5:30

How To Choose Clay Pots And Maintain It मातीचे मडके खरेदी करताय? तुमचे मडके केमिकल - खराब मातीपासून तर बनले नाही ना?

How To Choose Clay Pots And Maintain It | माठ खरेदी करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, टाळा केमिकलने रंगवलेले माठ

माठ खरेदी करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, टाळा केमिकलने रंगवलेले माठ

उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी पिण्याची फार इच्छा होते. थंड पाण्याशिवाय तहान भागात नाही. थंड पाणी पिण्यासाठी आपण प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी साठवून ठेवतो. व हे प्लास्टिक बॉटल फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवतो. फ्रिजमधलं पाणी पिण्यापेक्षा माठातले पाणी पिण्याचा सल्ला आपल्याला अनेकांनी दिला असेल. माठातले पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

सध्या बाजारात अनेक प्रकारचे मातीचे माठ मिळतात. काही केमिकल मातीचा वापर करून तयार केले जातात तर, काही नैसर्गिक मातीचा वापर करून तयार केले जातात. केमिकल मातीच्या माठातून पाणी प्यायल्याने तोंडाचा संसर्ग, घसा खवखवणे आणि पोटात इन्फेक्शन अशा प्रकारचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे माठ खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे(How To Choose Clay Pots And Maintain It).

माठ खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

- माठ खरेदी करताना माठ फुटलेला तर नाही, किंवा त्याला तडेतर गेले नाही हे तपासून घ्या. तडा असल्यास पाणी गळून जाईल. व पाणी थंड राहणार नाही.

- माठाच्या तळभागाला तपासून घ्या, जर त्याचा आकार व्यवस्थित नसेल तर तो एका जागी स्थिर राहणार नाही. डळमळत राहेल. व त्यातून पाणी सांडण्याची शक्यता जास्त असते.

नव्या झाडूमधून फार भुसा पडतो, घरभर पसरतो? २ टिप्स, नवा झाडू घेतला की नक्की वापरा..

- मडके खरेदी करताना साधे मडके खरेदी करा. ज्या माठांवर कलाकृती असते, ते माठ खरेदी करू नका. कारण पेंटचं तेल पाण्यात मिसळू शकते. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

- माठ खरेदी करण्यापूर्वी त्यात पाणी टाका, व त्यातून मातीचा सुगंध येत आहे की नाही हे तपासा. जर त्यातून मातीचा गंध येत नसेल तर समजून जा, हे माठ केमिकल किंवा खराब मातीपासून बनले आहे. 

उन्हाळ्यात स्वयंपाक करताना किचनमध्ये उभे राहवत नाही? ५ टिप्स, किचन राहील थंड नेहमी

- सध्या बाजारात टॅप लागलेले माठाची मागणी आहे, जे दिसायला आकर्षक असतात परंतु लवकर खराब होतात. म्हणून मातीचे साधेच माठ खरेदी करा.

- नेहमी कुंभाराकडून मडके खरेदी करा. माठाचे सुगंध, याशिवाय त्याचा तळ, व साधे मडके खरेदी करा.

माठाची घ्या अशी काळजी

- माठातले पाणी थंडगार ठेवण्यासाठी माठ नेहमी थंड ठिकाणी ठेवा. अशा ठिकाणी ठेवा जिथे सावली असेल.

- माठाला जमिनीवर ठेऊ नये त्याला आधी स्टॅण्डवर ठेवा, ज्यामुळे माठाला हवा मिळत राहील आणि पाणी थंडगार होईल. 

- माठाला मातीच्या झाकणाने झाकून ठेवा. यामुळे पाणी देखील झाकलेले राहील आणि थंडगार राहील.

- माठाचे पाणी दररोज बदला. जर दररोज बदलणे शक्य नाही तर आठवड्यातून एकदा पाणी आवर्जून बदला. व आठवड्यातून माठाला स्वच्छ करा. कारण त्याला फंगस लागण्याची शक्यता असते.

Web Title: How To Choose Clay Pots And Maintain It

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.