Join us

तव्यावर मीठ घालताच झाली कमाल; काळाकुट्ट तवा झाला मिनिटात साफ - पाहा सोपी युनिक ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2024 14:06 IST

How to Clean a Burnt Pan With Salt in 20 Minutes : ना स्क्रबर ना भांडी घासण्याचा साबण; 'या' पद्धतीने तवा साफ केल्यास होईल कमाल

किचनमध्ये रोजच्या वापरासाठी आपण अनेक भांड्याचा वापर करतो (Cleaning Tips). ज्यात पॅनचा देखील समावेश आहे. पॅन किंवा तव्यामध्ये आपण अनेक पदार्थ तयार करतो (Kitchen Tips). विशेषतः डोसा, पोळी किंवा भाकरी. पण सततच्या वापरामुळे पॅन काळाकुट्ट आणि खराब होतो. जळलेले डाग सहसा घासूनही निघत नाही. ज्यामुळे पॅनवर काळा थर जमा होऊ लागतो.

स्क्रबरने घासल्यानंतरही हे काळे डाग निघत नाहीत. पॅनचा काळेपणा जर घासूनही निघत नसेल तर, आपण मिठाचा सोपा उपाय करून पाहू शकता. मिठाच्या उपायामुळे पॅनचा काळा थर काही मिनिटात निघून जाईल. शिवाय घासून मेहनत घेण्याचीही वेळ येणार नाही. पॅनचा काळा थर घालवण्यासाठी मिठाचा वापर नेमका कसा करावा? पाहूयात(How to Clean a Burnt Pan With Salt in 20 Minutes).

पॅनचा काळा थर काढण्यासाठी मिठाचा सोपा उपाय

- सर्वात आधी पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे मीठ पसरवून घाला. नंतर गॅसची फ्लेम वाढवा, व उलथनीने खरडून पॅनवरचा काळा थर काढून घ्या.

कोणता ब्रेड खाणं तब्येतीसाठी योग्य? व्हाइट की ब्राऊन? कोणता लवकर पचतो, कशाने वाढतं वजन?

- अशा प्रकारे पॅनवरचा काळा थर काही मिनिटात निघेल. नंतर पुन्हा ही प्रोसेस करा. जेणेकरून पॅनवरचा काळा थर पूर्णपणे निघेल.

- शेवटी पॅन पाण्याने आधी धुवून घ्या. स्क्रबरला भांडी घासण्याचा साबण लावून घासून घ्या. अशा प्रकारे पॅन चकाचक क्लिन होईल. काही मिनिटात स्वच्छ होईल.

पॅनचा काळा थर काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा उपाय

पोह्याचे आप्पे एकदा खाऊन तर पाहा, शाळेच्या डब्यासाठीही झटपट होणारा पौष्टीक पदार्थ, चवीलाही उत्तम

- पॅनचा काळेपणा दूर करण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकता. यासाठी पॅनवर बेकिंग सोडा शिंपडा, त्यावर गरम पाणी ओता, व त्यावर झाकण ठेवा.

- बेकिंग सोड्यातील घटक पॅनचा काळेपणा दूर करतील. ३० मिनिटानंतर स्क्रबरने पॅन घासून घ्या. नंतर धुवून घ्या. अशा प्रकारे काही मिनिटात पॅन क्लिन होईल. 

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्स