Join us  

Diwali Home Cleaning : धूळ साचून पंखा कळकट झालाय? ४ ट्रिक्स, स्टूलवर न चढता-हात लावता १ मिनिटांत चमकेल फॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 4:01 PM

How to Clean a Ceiling Fan : होममेड क्लिनरच्या  वापराने पंखा कमी वेळात स्वच्छ होईल. 

दिवाळीच्या आधी घराची साफसफाई करायला  सुरूवात होते. फरश्या, सोफा, टाईल्स कितीही स्वच्छ केल्या तरी असे काही भाग असतात जे नेहमी अस्वच्छ राहतात. (Fan kaise clean kare) प्रत्येकाच्याच घरात सिलिंग फॅन असतात. (Diwali Home Cleaning Tips)  रोज वापरले जाणारे सिलिंग फॅन धूळ, मातीचे कण लागून लागून खराब होतात. घरात कोणीही शिरल्यानंतर सगळ्यात आधी  फॅनकडे लक्ष जातं. (How to Clean a Ceiling Fan)

अशात जर घरात व्यवस्थित स्वच्छता ठेवली नाही तर घर खराब दिसतं. पंखा स्वच्छ करण्यासाठी सोप्या टिप्स आणि ट्रिक्स पाहूया. जेणेकरून  साफसफाई लवकर होण्यास मदत होईल. सिलिंग फॅन जास्त उंचावर असल्यामुळे तो साफ करणं कठीण वाटतं. होममेड क्लिनरच्या  वापराने पंखा कमी वेळात स्वच्छ होईल. (Four Ways to Clean a Ceiling Fan)

 

सगळ्यात आधी धूळ-माती काढून घ्या

कधीही पंखा स्वच्छ करताना थेट ओला कपडा लावू नका. आधी डस्टर किंवा मॉपच्या साहाय्याने धूळ माती काढून घ्या किंवा एका काठीला सुती कापड बांधून पंख्यावरची धूळ काढू शकता. 

पंखा स्वच्छ करण्याचे लिक्विड कसे तयार करावे?

पंखा स्वच्छ करण्याचे क्लिनर तयार करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घ्या.   या २ पदार्थांनी पंख्याला नव्यासारखी चमक येईल. एका वाटीत सम प्रमाणात व्हिनेगर आणि बेकींग सोडा मिसळा. त्यात तुम्ही थोडं पाणी घालू शकता.

झाडांना फुलंच येत नाहीत? मातीत मिसळा ५ रुपयांचा ‘हा’ पदार्थ; गुलाब-जास्वंदाला लागतील फुलंच फुलं

पंख्याचे बटन बंद असेल याची खात्री केल्यानंतर ब्रशच्या साहाय्याने हे मिश्रण पंख्याच्या ब्लेड्सना लावा आणि १० मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. नंतर पंखा एकाओल्या स्क्रबरच्या मदतीनं घासून स्वच्छ करा. या उपायाने पंख्यावरील सर्व डाग स्वच्छ होतील आणि पंखा नव्यासारखा चमकदार दिसेल. 

व्हिनेगर आणि लिंबाचे क्लिनर

हे क्लिनर बनवण्यासाठी एका भांड्यात व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिसळा हे क्लिनर अप्लाय केल्यानं धूळ, माती निघून जाईल. हे होममेड क्लिनर  १० मिनिटांसाठी पंख्याच्या ब्लेडला लावून ठेवा. त्यानंतर पाणी आणि स्क्रबरच्या मदतीने घालून पंख्याचे ब्लेड्स स्वच्छ करा. 

न भिजवता- न घासता चादरी- बेडशीट धुण्याच्या ३ ट्रिक्स; जास्त मेहनत न करता स्वच्छ होतील चादरी

डिटर्जेंट आणि बेकींग सोड्याचे क्लिनर

जर तुमच्याकडे इतर क्लिनिंग इंग्रेडीएट्स नसतील तर तुम्ही घरच्याघरी सहज मिळणाऱ्या डिटर्जेंट आणि बेकींग सोड्याचा वापर करून क्लिनर तयार करू शकता.  सगळ्यात आधी याची जाडसर पेस्ट तयार करा. नंतर पंखा छतावरून खाली उतरवून ब्लेड्स ओले करून व्यवस्थित पुसून घ्या हे मिश्रण १० मिनिटांसाठी लावून ठेवा. पंख्यावर पाण्याचा स्प्रे करून ब्रशच्या मदतीने साफ करा. या उपायाने पंखा चकचकीत नव्यासारखा दिसेल.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलसुंदर गृहनियोजनदिवाळी 2023