उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत सिलिंग फॅनचा आवश्यकता भासते. पण महिनोंमहिने फॅनच्या स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यामुळे धुळीचे थर जमा होता आण पंखा कळकट, जुना झाल्यासारखा दिसतो तर काही वेळा पंखा फिरत असताना आवाजही येतो. घरातील इतर भागांची स्वच्छता करतो त्याचप्रमाणे पंखा स्वच्छ करणंही गरजेचं असतं. (How to Clean Ceiling Fans Without Making a Mess)
काही मिनिटांत तुम्ही पंखा स्वच्छ करू शकता. गुडघे, कंबरदुखी प्रेग्नंसी या कारणांमुळे अनेकांना टेबल किंवा खुर्चीवर चढून पंखा स्वच्छ करणं शक्य होत नाही. धुळीमुळे जर पंखा लवकर खराब झाला असेल तर त्याची स्वच्छता करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How to Clean a Ceiling Fan)
क्लिनिंग डस्टरचा वापर करा
सिलिंग फॅन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही क्लिनिंग डस्टरचा वापर करू शकता. बाजारात अशा प्रकारचे डस्टर्स सहज उपलब्ध होतात. याच्या साहाय्याने पंख्याची डस्टींग अगदी सोप्या पद्धतीनं करू शकता. टेबल किंवा खुर्चीवर चढण्याची आवश्यकता नाही. मोठा पाईप असलेला क्लिनिंग डस्टर तुमचं काम अधिक सोपं करू शकतो.
घरात सतत ढेकूण होतात? ५ सोपे उपाय, एकही ढेकूण दिसणार नाही, परत होणार नाहीत...
डस्टरच्या साहाय्याने सिलिंग फॅन स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी पंख्याच्या ब्लेडवरची सगळी धूळ साफ करा. धूळ साफ करण्याची अजिबात घाई करू नका. त्यानंतर एक बादतील पाणी, नारळाचं तेल, मीठ, व्हिनेगर आणि डिटर्जेंट मिसळून एक मिश्रण तयार करा. यात डस्टर भिजवून ते पिळून घ्या आणि आरामात पंखा स्वच्छ करा.
वॅक्यूम क्लिनरचा वापर करा
वॅक्यूम क्लिनरचा वापर करून तुम्ही पंखा स्वच्छ करू शकता. यामुळे कचरा रूममध्ये इतरत्र पसरणार नाही. वॅक्यूम क्लिनरचं हॅण्डल पकडा आणि पंख्याच्या पात्यांवर फिरवा. याला ब्रश अटॅच करायला विसरू नका. यामुळे पंख्याला लागलेली धूळ सहज स्वच्छ होईल.
नॉनस्टीक तवा कळकट, चिकट झालाय? ४ उपाय, ५ मिनिटांत स्वच्छ होईल तवा-दिसेल नवाकोर
डस्टिंग ब्रश
घराच्या भिंतीवरील धूळ स्वच्छ करण्यासाठी तुम्ही डस्टिंग ब्रशचा वापर करू शकता. डस्टींग ब्रशच्या मदतीने अगदी सहज पंखा स्वच्छ होतो. २ महिन्यातून एकदा तुम्ही डस्टींग ब्रशचा वापर करून पंखा क्लिन करू शकता.