Join us  

लादी पुसण्याच्या पाण्यात 'ही' वस्तू मिसळा; चकाचक होईल फरशी, घरातले डासही होतील गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:59 PM

How to Clean A Dirty Mop Easily : लोक घर पुसण्याचं कापड घरातील कोणत्याही कोपऱ्यांमध्ये लपवून ठेवतात.

फरशी स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसभरातून कमीत कमी १ ते २ वेळा लादी पुसावीच लागते. जर घरात लहान मुलं असतील तर दिवसातून २ ते ३ वेळा लादी पुसावी लागते. (Cleaning Tips) लोक फरशी स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांचा किंवा लादी पुसण्याच्या डस्टरचा वापर करतात. (How to Clean A Dirty Mop Easily) लादी पुसण्याचं कापड काही दिवसांनी खराब दिसू लागतं.

जर वेळीच तुम्ही ते स्वच्छ केले नाही तर २ ते ३ दिवसांत काळे दिसू लागते. लोक घर पुसण्याचं कापड घरातील कोणत्याही कोपऱ्यांमध्ये लपवून ठेवतात.  काही सोप्या हॅक्सचा वापर करून तुम्ही घर स्वच्छ चमकदार ठेवू शकता. (Mix These Ingredient in Water Before Flooring)

घाणेरडं लादी पुसण्याचं कापड कसे स्वच्छ करावे?

फरशी सतत साफ केल्यानं  कापडाला धूळ, माती लागते आणि कपडा मळतो. कितीहीवेळा कपडा पाण्यात घालून ठेवला तरी त्यातून घाण निघत नाही. काही मिनिटांत कपडा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही महागडं लिक्विड वापरण्यापेक्षा काही सोपे उपाय करू शकता. सगळ्यात आधी एक मोठ्या भांड्यात पाणी गरम करून घ्या. लक्ष ठेवा की पाणी व्यवस्थित उकळायला हवं.

त्यानंतर पाण्यात  चमचे मीठ, 1 चमचा डिटर्जेंट पावडर आणि 1 चमचा लिंबाचा मिसळून मिक्स करा. पाणी व्यवस्थित उकळून एका बादलीत काढून घ्या.  नंतर पाण्यात काढून ठेवा. लादी पुसण्याचं कापड पाण्यात राहू द्या जोपर्यंत थंड होत नाही. पाणी काढून घ्या आणि ब्रशच्या मदतीने रगडून घ्या. स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. तुम्हाला दिसेल घर एकदम नव्यासारखं झालं आहे.

दुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती? पोटभर खाऊनही वजन वाढणार नाही

चिकट लादी कशी स्वच्छ करायची?

रोज लादी पुसण्याचं कापड व्यवस्थित धुवून सुकवून घ्या. नाहीतर ते लवकर खराब होईल. किचनमध्ये वापरले जाणारे कपड्यांची साफ-सफाई करणं फार महत्वाचे आहे. चहा पावडर किंवा लिंबाच्या पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. प्रत्येक दिवशी चहाचा वापर करून चहा पावडर फेकू नका तर ते सांभाळून ठेवा. जेव्हा तुमच्याकडे १ वाटी वेस्ट चहा पावडर असेल  तेव्हा ती एका मोठ्या भांड्यात काढून घ्या.

नंतर एका मोठया भांड्यात पाणी घालून ते उकळवून घ्या. त्यात 2 चमचे लिंबाचा रस आणि 1 चमचा मीठ मिसळा. त्यानंतर व्हिनेगर घाला हे पाणी व्यवस्थित  उकळू द्या. त्यानंतर हे पाण्या रंग बदलल्यानंतर लादी पुसण्याच्या बादलीत घाला. त्यात घाणेरडा कापड घालून 10 मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. असं केल्यानं चिकटपणा कमी होईल.

ब्लिचचा उपयोग

लादी पुसताना खराब बॅक्टेरिया स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ब्लिचचा वापर करू शकता. याच्या मदतीने बॅक्टेरियांसोबत फरशी चमकण्यासही मदत होईल. यासाठी पाण्यात 1 झाकण ब्लिच मिसळा त्यात 1 चमचा डिटर्जेंट पावडर घाला आणि १० मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर पाण्याने धुवून घ्या. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स