Join us  

लादी पुसायचा मॉप काळाकुट्ट होऊन त्यातून कुबट दुर्गंधी येते ? १ सोपी ट्रिक, कष्ट न घेताच मॉप होईल स्वच्छ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2024 5:15 PM

How to Clean a Mop Head : फरशी पुसण्याच्या मॉपचे अस्वच्छ कापड स्वच्छ करण्यासाठी एक सोपी ट्रिक...

लादी पुसण्यासाठी आजकाल प्रत्येक घरात मॉप वापरला जातो. मॉप वापरल्याने अगदी चुटकीसरशी लादी पुसून स्वच्छ होते. तसेच या मॉपचा वापर केल्याने आपल्याला खाली वाकून लादी पुसण्याची गरज भासत नाही. यामुळेच अगदी कमी मेहेनतीत काम पटकन होऊन जाते. हा मॉप तसा फारच उपयोगी असला तरीही त्याची स्वच्छता ठेवणे हे फार मोठे कठीण काम असते. शक्यतो आपण मॉप सोबत येणाऱ्या बादलीत पाणी घेऊन संपूर्ण लादी पुसून घेतो. लादी पुसल्यानंतर आपण हा मॉप धुवून लगेच आहे त्याच ठिकाणी वाळत घालतो. आपण मॉप धुवून बाथरूममध्येच(What is the best way to clean a dirty mop head) एका कोपऱ्यात ठेवतो. परंतु हा मॉप जर व्यवस्थित वाळला नाही तर त्यातून कुबट दुर्गंधी येते. त्याचबरोबर काहीवेळा हा मॉप कितीही धुतला तरीही तो स्वच्छ होतच नाही. पावसाळ्यात तर हा मॉप व्यवस्थित वाळलेला नसेल आणि आपण तो आहे तसाच ओला ठेवला तर संपूर्ण घरभर याचा कुबट दुर्गंधी पसरते(How Do I Make My Mop White Again).

कापडी मॉपने वारंवार फरशी पुसून कालांतराने तो धूळ, माती, चिकटून काळा होतो. याचबरोबर हा कापडाचा मॉप अतिशय जाड असल्याने तो नेहमी  व्यवस्थित धुवून सुकवुनच ठेवला पाहिजे. वेळीच त्याची योग्य ती स्वच्छता केली नाही तर हा पांढराशुभ्र मॉप काळा अस्वच्छ दिसू लागतो. जर हा मॉप व्यवस्थित न वाळवता तसाच ओला ठेवला तर त्यातून कुबट दुर्गंधी येऊ लागते. एवढेच नव्हे तर काहीवेळा त्यावर बुरशी चढून तो खराब देखील होतो. मॉपचे कापड स्वच्छ करण्याकडे आपण काहीवेळा फारसे लक्षच देत नाही. परंतु हा मॉप स्वच्छ करण्यासाठीची सोपी ट्रिक कोणती ते पाहूयात(How To Clean Mop Heads).

 काळाकुट्ट झालेला मॉप कसा स्वच्छ करावा ? 

सगळ्यात आधी एका मोठ्या टबमध्ये उकळते गरम पाणी घ्यावे. या गरम पाण्यांत व्हाईट व्हिनेगर घालावे. त्यानंतर त्यात बेकिंग सोडा घालावा. या पाण्याच्या द्रावणात हा काळाकुट्ट झालेला मॉप किमान अर्धा तास तरी भिजत ठेवावा. अर्ध्या तासानंतर हा मॉप साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. अशाप्रकारे आपण काळाकुट्ट झालेला मॉप अगदी चुटकीसरशी सहज स्वच्छ करु शकतो. 

पावसाळ्यात भाज्या नीट धुतल्या  नाहीतर पडाल आजारी, भाज्या धुण्याची सोपी पद्धत... 

मुसळधार कोसळणाऱ्या पावसांत कुठे अडकलात तर? कायम बॅगेत ठेवा ५ वस्तू, राहा सुरक्षित रोजच...

मॉपच्या खालचे कापड नेमके कधी बदलावे ? 

 मॉपच्या खालचे कापड हे सतत फरशी पुसून खराब झालेले असते. असे कापड आपण कितीही धुतले तरीही ते पाहिजे तसे स्वच्छ होत नाही. असे असले तरीही  ते कापड प्रत्येक वापरानंतर साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्यावे. यासोबतच हे खराब झालेले मॉपचे कापड एका ठराविक काळानंतर बदलणे आवश्यक असतेच. दर २ ते ३ महिन्यातून एकदा हे मॉपच्या खालचे कापड बदलणे गरजेचे असते.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स