Join us  

धुळीने माखलेला फॅन साफ करण्याची युनिक ट्रिक, १० मिनिटात पंखा दिसेल नव्यासारखा - चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 3:58 PM

How to Clean A Fan in Less Than 10 Minutes! - 3 Tricks : ३ स्मार्ट पद्धतीने पंखा स्वच्छ करा; पंखा लवकर घाण होणार नाही...

उन्हाळा असो किंवा हिवाळा प्रत्येक ऋतूत सिलिंग फॅनची आवश्यकता भासते (Cleaning Tips). पण उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पंख्याचा वापर होतो. उकाड्यापासून शरीराला गारवा मिळावा म्हणून आपण पंख्याचा वापर करतो. पण महिनोमहिने फॅनच्या स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यामुळे अधिक अस्वच्छ होतो. पंखा काळपट आणि जुना झाल्यासारखा दिसतो. तर काही वेळेला पंखा फिरत असताना आवाजही येतो.

पंखा साफ करणं गरजेचं. जर आपल्याला पंखा साफ करणं किचकट वाटत असेल तर, स्मार्ट पद्धतीने साफ करून पाहा. या स्मार्ट पद्धतीने सिलिंग फॅन साफ केल्याने, काही मिनिटात पंखा क्लिन होईल. शिवाय लवकर खराब देखील होणार नाही(How to Clean A Fan in Less Than 10 Minutes! - 3 Tricks).

सिलिंग फॅन स्वच्छ करण्याचा सोपा उपाय

डस्ट क्लीनरने धूळ साफ करा

१ रुपयाही खर्च न करता सुटलेलं पोट कमी करायचं? वाचा विराट कोहलीच्या न्यूट्रिशनिस्टने दिलेला सल्ला

सर्वप्रथम पंख्यावरील धूळ डस्ट क्लिनरने साफ करा. आपल्याला डस्ट क्लीनर बाजारात सहज उपलब्ध होईल. यामुळे पंख्यावरील धूळ आणि घाण साफ होईल आणि घाण बऱ्याच प्रमाणात निघून जाईल. पंख्याचा वरचा भाग आणि प्लेट्स डस्टरने पूर्णपणे स्वच्छ होईल.

क्लीनर लिक्विड तयार करा

पंखा स्वच्छ करण्यासाठी आपण घरगुती क्लीनर लिक्विड तयार करू शकता. या लिक्विडमुळे फॅन प्लेट्स स्वच्छ होईल. यासाठी एका बॉटलमध्ये डिटर्जेंटचं पाणी घ्या. त्यात लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा घालून मिक्स करा. आता या पाण्यात सुती कापड बुडवून पंखा पुसून घ्या. यामुळे पंख्याचा वरचा भाग आणि प्लेट्स क्लिन होईल. शिवाय चिकटपणा आणि घाण साफ होईल.

कमीतकमी वेळात जास्त वजन कसे घटवाल? ५ सोपे हेल्दी बदल - आठवडाभरात दिसेल फरक-स्किनही चमकेल

कोरड्या कापडाने स्वच्छ करा

ओल्या कापडाने पंखा पुसल्यानंतर, कोरड्या कापडाने पुसून घ्या. यासाठी सुती कापड घ्या. या कापडाने पंख्याचा वरचा भाग आणि प्लेट्स क्लिन करा. पुसल्यानंतर पंखा नव्यासारखा क्लिन दिसेल.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल