Lokmat Sakhi >Social Viral > काळाकुट्ट झालेला फॅन साफ करण्यासाठी शिडीची गरजच नाही; १० मिनिटात पंखा करा चकचकीत

काळाकुट्ट झालेला फॅन साफ करण्यासाठी शिडीची गरजच नाही; १० मिनिटात पंखा करा चकचकीत

How To Clean A Fan in Under 10 Minutes! : सिलिंग फॅनवर जमा झालेली घाण होईल मिनिटात स्वच्छ; फक्त स्वच्छ करताना..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2024 03:12 PM2024-09-20T15:12:48+5:302024-09-20T15:14:27+5:30

How To Clean A Fan in Under 10 Minutes! : सिलिंग फॅनवर जमा झालेली घाण होईल मिनिटात स्वच्छ; फक्त स्वच्छ करताना..

How To Clean A Fan in Under 10 Minutes! | काळाकुट्ट झालेला फॅन साफ करण्यासाठी शिडीची गरजच नाही; १० मिनिटात पंखा करा चकचकीत

काळाकुट्ट झालेला फॅन साफ करण्यासाठी शिडीची गरजच नाही; १० मिनिटात पंखा करा चकचकीत

ऋतू कोणताही असो, आपल्या घरात सिलिंग फॅनचा वापर होतो (Cleaning Tips). स्पीड एकवर का असेना आपण सिलिंग फॅन चालू ठेवतोच. फॅनशिवाय जास्त वेळ घरात बसणं अवघड होतं (Social Viral). पण नियमित फॅनचा वापर केल्याने त्यावर धूळ जमा होते. आणि फॅनची धूळ चालू केल्यानंतर अंगावर पडते.

धुळीतील बॅक्टेरिया नाकात जातात, ज्यामुळे आपण सतत आजारीही पडतो. त्यामुळे सिलिंग फॅन साफ करणं गरजेचं आहे. शिवाय फॅनमधून चांगली हवा येण्यासाठीही साफ करणं गरजेचं आहे. पण सिलिंग फॅन साफ करण्यासाठी आपल्याला शिडी किंवा उंच वस्तूची गरज भासते. आपण शिडीशिवायही सिलिंग फॅन स्वच्छ करू शकता. ते कसे पाहा(How To Clean A Fan in Under 10 Minutes!).

हॅन्गर उपयुक्त ठरेल

कपड्यांच्या हॅन्गरनेही आपण पंखा साफ करू शकता. यासाठी हॅन्गरवर जुना कापड बांधा. आता त्याच्या खाली एक काठी बांधा. आणि या काठीच्या मदतीने पंखा साफ करा. झटपट साफसफाईचे काम पूर्ण होईल.

कांद्याचा कुरकुरीत डोसा खाऊन तर पाहा! १० मिनिटात इन्स्टंट रेसिपी; नाश्ता टेस्टी

क्लिनिंग डस्टरचा करा असा वापर

सिलिंग फॅन स्वच्छ करण्यासाठी आपण क्लिनिंग डस्टरचा वापर करू शकता. क्लीनिंग डस्टर्स बाजारात सहज उपलब्ध आहेत आणि ते खरेदी करण्यासाठी आपल्याला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. डस्टर लिक्विड साबणामध्ये बुडवा आणि पिळून घ्या. नंतर पंखा डस्टरच्या मदतीने स्वच्छ करा.

कांदा चिरायला बराच वेळ जातो; तळतानाही करपतो? फॉलो करा १ ट्रिक; स्वयंपाक होईल झटपट

व्हॅक्यूम क्लिनरचा करा वापर

घाण झालेला पंखा स्वच्छ करण्यासाठी आपण व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करू शकता. व्हॅक्यूम क्लिनरला ब्रश जोडा आणि काळजीपूर्वक पंख्याच्या ब्लेडवरील घाण पुसून काढा. या पद्धतीने पंखा पुसल्याने काही मिनिटात पंखा चमकेल. 

Web Title: How To Clean A Fan in Under 10 Minutes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.