Join us  

किचन सिंक सारखे तुंबते? बेकिंग सोड्याचा करा 'असा' वापर; खर्च न करता - पाईपही होईल स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2024 6:59 PM

How to Clean a Kitchen Sink and Drain using Baking soda : किचन सिंकच्या पाईपमध्ये कचरा अडकला असेल तर, 'या' पद्धतीने स्वच्छ करा

किचन सिंकचा वापर सर्वांच्याच घरात होतो (Baking Soda). त्यात आपण भाजी, भांडी किंवा इतरही गोष्टी धुवून घेतो. मुख्य भांडी घासण्यासाठी आपण किचन सिंकचा वापर करतो (Kitchen Sink). मात्र, काही वेळा सिंकमध्ये अन्न अडकल्याने पाणी तुंबते. जे सहजासहजी बाहेर पडत नाही (Cleaning Tips). तुंबलेलं  सिंक साफ करण्यासाठी आपण प्लंबरला बोलावून घेतो. पण आपण तुंबलेलं किचन सिंक स्वतः घरातही स्वच्छ करू शकता. यासाठी आपल्याला विशेष मेहनत घेण्याची गरज नाही.

अगदी काही मिनिटात तुंबलेलं किचन सिंक स्वच्छ करायचं असेल तर, बेकिंग सोड्याचा वापर करून पाहा. अगदी काही मिनिटात तुंबलेलं किचन सिंक स्वच्छ होईल आणि पाईपमध्ये कोणतेही अन्न पदार्थ अडकणार नाही(How to Clean a Kitchen Sink and Drain using Baking soda).

किचन सिंकमध्ये अडकलेला कचरा कसा स्वच्छ करायचा?

- बेकिंग सोड्याचा वापर आपण स्वयंपाकात करतो. पण याचा वापर करून आपण किचन सिंकही स्वच्छ करू शकता.  बेकिंग सोडा हा सर्वोत्तम क्लिनिंग एजंट मानला जातो. यामुळे पाईपमध्ये अडकलेली घाण सहज निघेल. यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे बेकिंग सोडा, १ चमचा व्हिनेगर आणि थोडे पाणी घालून पेस्ट तयार करा.

दूध पिता पिता दगावलं तान्हं बाळ, व्हायरल बातमी : स्तनपान करताना आईने काय काळजी घ्यायला हवी?

तयार पेस्ट सिंकच्या ड्रेनेजमध्ये ओता आणि रबर स्टॉपने बंद करा. १० मिनिटानंतर पॅनमध्ये पाणी गरम करा. पाणी कोमट झाल्यानंतर ड्रेनेज पाईपमध्ये ओता. आणि नळ चालू करा. पाण्याच्या प्रवाहात सर्व घाण पाईपमधून निघून जाईल.

- इनोच्या वापरानेही आपण ड्रेनेजमध्ये अडकलेली घाण स्वच्छ करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा इनो घ्या, त्यात पाणी घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट ड्रेनेज पाईपमध्ये घाला. २० मिनीटांनंतर त्यावर व्हिनेगर घालून १० मिनिटांसाठी तसेच ठेवा.

कोण म्हणतं फक्त बिट खाऊन रक्त वाढतं? खा ‘हे’ ५ पदार्थ, हिमोग्लोबिन वाढेल लवकर

नंतर त्यावर कोमट पाणी ओता. यामुळे सिंकमध्ये साचलेला कचरा निघून जाईल आणि पाईपही स्वच्छ होईल. 

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्ससोशल व्हायरल