किचनमधील सिंकमध्ये आपण अनेक काम करतो. या सिंकमध्ये भांडी घासण्यापासून ते फळे - भाजीपाला स्वच्छ करण्याची वेगवेगळ्या प्रकारची काम केली जातात. खरं, पाहता सिंकमध्ये (How to Clean a Kitchen Sink in 3 Minutes with Tea Powder) बहुतेक सगळी स्वच्छतेची काम केल्याने हे सिंक मात्र (How to Clean a Kitchen Sink) अस्वच्छ होते. सतत या सिंकमध्ये पाणी असल्याने ओलावा राहतो तसेच घाण देखील राहते यामुळे सिंक सततच्या वापराने काही दिवसांनी (The Secret to Cleaning Stainless Steel Sinks Like a Pro) खराब दिसू लागते. यासाठीच, किचनमधील सिंकची योग्य ती सफाई वेळच्यावेळी करणे आवश्यक असते.
सिंकची स्वच्छता योग्य पद्धतीने दररोज न केल्यास त्यावर घाणीचा थर साचून ते अस्वच्छ दिसते. इतकेच नव्हे तर अशा खराब सिंकमधून घाणेरडी - कुबट दुर्गंधी देखील येऊ लागते. अशा परिस्थितीत, घाणेरडे सिंक स्वच्छ केले नाही तर त्यात झुरळं आणि इतर किटकांची वाढ होण्याची देखील शक्यता असते. अशावेळी हे घाणेरडे सिंक स्वच्छ करण्यासाठी महागडे साबण, डिटर्जंट वापरण्यापेक्षा आपण एक खास घरगुती उपाय नक्की करुन पाहू शकतो. हा घरगुती उपाय केल्याने आपले सिंक फक्त स्वच्छच होणार नाही तर नव्यासारखे चमकू लागेल. पण यासाठी नेमकं करायचं काय ते पाहूयात.
किचनमधील सिंक स्वच्छ करण्यासाठी वापरा उरलेली चहापावडर...
चहा पिऊन झाल्यावर जी चहापावडर गाळणीत उरते तीच चमचाभर चहापावडर सिंक स्वच्छ करण्यासाठी बस्स काफी है... सगळयात आधी ही चमचाभर चहापावडर गाळणीत ठेवून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर चहापावडर सिंकमध्ये व्यवस्थित ओतून सर्वत्र पसरवून घ्यावी. चहापावडर सर्वत्र व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर मीठ घेऊन ते पुन्हा सगळ्या सिंकमध्ये पसरवून घ्यावे.
कढई ते गॅस बर्नर, स्वयंपाकघरातील कोणती वस्तू किती वर्षे वापरावी ? वेळीच बदला नाहीतर तब्येत बिघडेल...
त्यानंतर स्क्रबर किंवा घासणीने सिंक स्वच्छ घासून घ्यावे. ४ ते ५ मिनिटे घासून घेतल्यानंतर ही चहापावडर उचलून फेकून द्यावी आणि पाणी ओतून सिंक स्वच्छ धुवून घ्यावे. सिंक स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुम्ही बघाल तर सिंकवरील काळे - मळके डाग निघून जाऊन सिंक नव्यासारखे चमकू लागेल. अशाप्रकारे आपण उरलेली चहापावडर फेकून न देता त्याचा वापर करून किचन सिंक धुवून नव्यासारखे स्वच्छ करु शकतो.