Lokmat Sakhi >Social Viral > त्वचेच्या स्वच्छतेसाठी लूफा वापरताय, पण त्याच्या स्वच्छतेच काय ? बघा 'लूफा' स्वच्छ करण्याची भन्नाट आयडिया...

त्वचेच्या स्वच्छतेसाठी लूफा वापरताय, पण त्याच्या स्वच्छतेच काय ? बघा 'लूफा' स्वच्छ करण्याची भन्नाट आयडिया...

Using Loofah during winters : How to Clean a Loofah : How to Clean Loofah the Right Way : How to Clean Loofah At Home : रोजच्या वापरातील हा 'लूफा' कसा स्वच्छ करायचा ते पाहा, अन्यथा होतील त्वचेचे अनेक आजार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 11:00 IST2024-12-21T10:58:37+5:302024-12-21T11:00:08+5:30

Using Loofah during winters : How to Clean a Loofah : How to Clean Loofah the Right Way : How to Clean Loofah At Home : रोजच्या वापरातील हा 'लूफा' कसा स्वच्छ करायचा ते पाहा, अन्यथा होतील त्वचेचे अनेक आजार...

How to Clean a Loofah How to Clean Loofah the Right Way HOW TO CLEAN YOUR LOOFAH PROPERLY | त्वचेच्या स्वच्छतेसाठी लूफा वापरताय, पण त्याच्या स्वच्छतेच काय ? बघा 'लूफा' स्वच्छ करण्याची भन्नाट आयडिया...

त्वचेच्या स्वच्छतेसाठी लूफा वापरताय, पण त्याच्या स्वच्छतेच काय ? बघा 'लूफा' स्वच्छ करण्याची भन्नाट आयडिया...

आंघोळ करताना आपली त्वचा अधिक स्वच्छ होण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचा वापर करतो. यापैकी अंग स्वच्छ करण्याचा 'लूफा' हा सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. एखाद्या फुग्याप्रमाणे (How to Clean Loofah the Right Way) दिसणारा गोल, मोठा, जाळीदार टेक्श्चर असणारा 'लूफा' हा आपल्या सगळ्यांच्याच घरात असतो. हा जाळीदार 'लूफा' वापरुन आपण आपली त्वचा स्वच्छ करतो. साधारणतः आपण सगळेच आंघोळ करताना अंगाला लावण्याच्या साबणाचा जास्तीचा फेस तयार करून तो 'लूफा' वर घेऊन या लूफाने हलकेच आपली त्वचा रगडून स्वच्छ करतो(How to Clean a Loofah).

लूफा कोणतंही जेल किंवा बॉडिवॉश लिक्विडला संपूर्ण शरीरावर अगदी सहज पसरवण्यासाठी मदत करतो. याचा वापर केल्याने साबणाचा किंवा बॉडिवॉशचा उत्तम फेस होतो. अशाप्रकारे आपण 'लूफा' वापरुन त्वचा स्वच्छ तर करतो परंतु या 'लूफाच्या' स्वच्छतेकडे आपण बहुतेकवेळा फारसे लक्ष देत नाही. शक्यतो पाहता आपल्या सगळ्यांच्याच घरात एक कॉमन 'लूफा' (How to Clean Loofah At Home) असतो, असा  'लूफा' घरातील सगळ्याच व्यक्ती आलटून, पालटून वापरतात. बरं,हा 'लूफा' स्वच्छ करायचा म्हणजे काय तर आपली आंघोळ झाल्यावर त्याला नळाखाली धरून त्यातील साबण धावून त्याला वाळण्यासाठी बाथरुमच्या एका कोपऱ्यात लटकवले जाते. एवढीच काय ती आपण त्याच्या स्वच्छतेची काळजी घेतो. परंतु हे संपूर्णपणे चुकीचे आहे. फक्त साबण लावून मग पाण्याखाली धरून हा 'लूफा' स्वच्छ होत नाहीत. हा 'लूफा' वापरुन झाल्यावर आपल्या त्वचेतील घाण, धूळ, माती, बॅक्टेरिया सगळे याच्या जाळीदार टेक्श्चर मध्ये अडकून बसतात. त्यामुळे असा 'लूफा' लगेच दुसऱ्यांनी वापरणे योग्य नाही तसेच तो वेळीच स्वच्छ करणे देखील तितकेच गरजेचे असते.  अशावेळी 'लूफा' स्वच्छ करण्याची पद्धत बऱ्याचजणांना माहित नसते. तेव्हा रोजच्या वापरातील हा 'लूफा' कसा स्वच्छ करायचा ते पाहूयात.

१. 'लूफा' कसा स्वच्छ करावा ?

'लूफा' स्वच्छ करण्याची अशी एक विशिष्ट पद्धत असते. 'लूफा' प्रत्येक वापरानंतर स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी तो कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. लूफा कोमट पाण्यांत धुतल्यानंतर थोडेसे कोमट पाणी घेऊन त्यात संपूर्णपणे बुडेल असा व्यवस्थित १० ते १५ मिनिटे भिजत ठेवावा. त्यानंतर एका भांड्यात व्हिनेगर घेऊन त्यात हा लूफा संपूर्णपाने बुडेल असा व्यवस्थित भिजवून ३० मिनिटे तसाच ठेवावा. त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने लूफा नीट धुवून घ्यावा. त्यानंतर यातील सगळे पाणी काढून तो संपूर्णपणे सुकू द्यावा. त्यानंतरच तुमचा लूफा परत नवीन वापरासाठी तयार होईल. अशाप्रकारे आपण लूफा स्वच्छ करु शकतो.  

२. 'लूफा' वेळीच स्वच्छ केला नाहीतर काय होते ? 

लूफावर जेल किंवा लिक्विड पसरवल्यानंतर आणि त्याआधीही लूफा ओला करणं गरजेचं असतं. एकदा ओला केल्यानंतर लूफा बराच वेळ ओला राहतो. ज्यामुळे यावर बॅक्टेरिया, किटाणु आणि यीस्ट तयार होतात. लूफामध्ये तयार झालेले बॅक्टेरिया, किटाणु आणि यीस्ट आपल्या शरीरामध्ये साबणाच्या फेसामार्फत पसरत असतात. तुम्ही लूफाचा वापर शरीराच्या प्रत्येक अवयवावर करता. जिथून बॅक्टेरिया कधी कधी पाण्याचा वापर करूनही दूर होत नाहीत. तर ते आणखी वाढतात. यामुळे स्किन इन्फेक्शनचा धोका आणखी वाढतो. इन्फेक्शन व्यतिरिक्त आपल्या त्वचेवर पिंपल्सही होऊ शकतात.    

मेहनत न करता वॉशिंग मशीनमध्ये उशा धुण्याची पाहा भन्नाट ट्रिक, हट्टी डाग गायब-उशी दिसेल नवीकोरी...


हिवाळ्यात सतत घालून स्वेटर-कानटोपी-मफलर मळले? न धुता गरम कपडे स्वच्छ करण्याची पाहा ट्रिक...

३. लूफा वापरताना लक्षात ठेवा... 

१. लूफाचा वापर केल्यानंतर तुम्ही तो पूर्णपणे व्यवस्थित कोरडा करा.
२. लूफा वापरताना तो थेट त्वचेवर घासू नका. लूफा वापरण्यासाठी साबण किंवा बॉडिवॉश लिक्विडचा फेस करणं आवश्यक असते. 
३. लूफा त्वचेसाठी दररोज न वापरता आठवड्यातून फक्त एकदाच याचा वापर करावा. 
४. प्लॅस्टिक लूफा किंवा इतर कोणत्याही मटेरियल पासून तयार झालेले लूफा वापरत असाल तर दर ३ महिन्यांनी लूफा बदला.

Web Title: How to Clean a Loofah How to Clean Loofah the Right Way HOW TO CLEAN YOUR LOOFAH PROPERLY

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.