Join us  

गाद्या फार कळकट-घाणेरड्या दिसतात, डाग पडलेत? ५ उपाय- गाद्याही होतील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2023 7:19 PM

How To Clean A Mattress In 5 Simple Steps? पलंगावर काही सांडले, घरात लहान मुलं असतील तर गाद्या लवकर खराब होतात, त्यावर हे उपाय

आपला बेडरूम साफ असेल तर, झोप देखील उत्तम लागते. म्हणूनच लोकं झोपत असलेले ठिकाण स्वच्छ ठेवतात. परंतु, बेडवरती असणाऱ्या चादरींना आणि गाद्यांना साफ करायला विसरून जातात. खरंतर, गाद्यांना साफ करणे अतिशय अवघड काम आहे. अनेक वर्षांपासून आपण गादीला वापरत आलो असतो, आणि ती वजनाला देखील जड असते. त्यामुळे तिला सहसा सारखे साफ आपण करू शकत नाही.

धूळ माती जमून गादीला घाणेरडा वास देखील येते. काही लहान मुलं गादी ओली करतात, त्यामुळे गादीमध्ये जीव जंतू तयार होतात. जर आपल्याला या गाद्यांना स्वच्छ आणि साफ करायचं असेल. तर काही सोपे हॅक आपल्याला मदत करतील. जेणेकरून गाद्या पुन्हा नव्या सारख्या दिसू लागतील(How To Clean A Mattress In 5 Simple Steps?).

कडूलिंबाच्या पानांचा वापर करा

गादीवरील घाणेरडे डाग, जीव जंतू, कीटकनाशक दूर करण्यासाठी कडुलिंबाची पाने उपयुक्त ठरेल. यासाठी कडुलिंबाच्या पानांना रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी हे पाणी गादी साफ करण्यासाठी वापरा. असं केल्याने गादीमधून येणारा घाणेरडा वास, त्याचबरोबर छोटे सूक्ष्मजीव मरून जातील. यासह गादी बॅक्टेरिया फ्री राहील.

दीपिका पादुकोणच्या मानेवर नवा टॅटू? हा कोणता कोडवर्ड, काय त्याचा अर्थ?

कास्टिक सोड्याचा वापर करा

अनेकदा गादीवर चहा किंवा इतर अन्न पदार्थ पडते. या अन्नपदार्थांचे गडद डाग लवकर निघत नाही. हे डाग काढण्यासाठी आपण कास्टिक सोड्याचा वापर करू शकता. यासाठी सर्वप्रथम, गाद्यांवरती कास्टिक सोडा टाका. त्यानंतर अर्ध्या तासाने गादी स्वच्छ धुऊन काढा. याने गादीवरील हट्टी डाग लवकर निघून जाईल.

स्क्रब करा

घाणेरडी गादी स्वच्छ करण्यासाठी बेड स्क्रब करा. यासाठी कास्टिंग सोडामध्ये लिंबाचा रस मिसळून एक पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट गादीवर लावून स्क्रब करा. असे केल्याने गादीवरील किटाणू नष्ट होऊन जातील.

फेस वॅक्सिंग करतानाच्या वेदना का सहन करता? घरच्याघरी चिमूटभर हळद वापरुन करा वेदनारहित वॅक्सिंग

बेकिंग सोडा व लिंबूचा वापर करा

मळलेल्या गाद्यांना साफ करण्यासाठी, बेकिंग सोडा आणि लिंबू हा जबरदस्त हॅक आपल्याला मदत करेल. यासाठी स्प्रेच्या बॉटलमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा, लिंबाचा रस, लेवेंडर ऑइल आणि एक कप हायड्रोजन पेरॉक्साइड घेऊन सर्व मिश्रण मिक्स करा. त्यानंतर हा स्प्रे गादीवर शिंपडा, एका तासानंतर गादी टॉवेलच्या सहाय्याने रगडून सगळे चिवट डाग साफ करा. व गादीला सुकवण्यासाठी उन्हात ठेवा.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाहोम रेमेडी