Join us

साबण - लिक्विड सोप नको, फक्त १ बर्फाचा तुकडा आणि नॉनस्टिक भांड्याचा तेलकटपणा होईल दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2025 19:18 IST

How To Clean A Non-Stick Cookware With Ice - Cube : How To Remove Burned Oil From A Nonstick Pan : How to Clean Nonstick Pans : How to Clean a Non-Stick Pan -Easy Methods that Work : नॉनस्टिक भांड्यांचे कोटिंग खराब होऊ नये किंवा ती स्वच्छ करण्यासाठी वापरुन पहा बर्फाचा इवलासा तुकडा...

आपल्या किचनमध्ये दररोज आपण वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरतो. या भांड्यांमध्ये काही भांडी ही नॉनस्टिक किंवा विशेष असे वेगळे कोटिंग केलेली असतात. नॉन-स्टिक पॅन (How To Clean A Non-Stick Cookware With Ice - Cube) आपल्या सगळ्यांच्याच किचनमधली एक अतिशय महत्त्वाची वस्तू आहे. नॉन-स्टिक पॅनमध्ये एक विशेष कोटिंग असते जे अन्न तव्याला चिकटण्यापासून प्रतिबंधित करते. वापरायला सोपे आणि स्वस्तात मिळणारे नॉनस्टिक पॅन आपली बरीच  कामं सोपी करतात(How to Clean Nonstick Pans).

नॉन-स्टिक भांड्यांच्या स्वच्छतेची वेळीच योग्य ती काळजी घेतली पाहिजे. जर आपण हे नॉन-स्टिक पॅन किंवा इतर नॉन-स्टिक भांडी योग्य पद्धतीने व्यवस्थित स्वच्छ केली नाही तर त्यावरील कोटिंग खराब होऊ लागते. अशा नॉन-स्टिक भांड्यांवरील कोटिंग खराब झाल्यामुळे ही भांडी वापरण्यायोग्य राहत नाही, तसेच अशा भांड्यांचा काहीच उपयोग नसतो. नॉन-स्टिक भांडी ही अतिशय नाजूक असतात. त्यावरील कोटिंग निघून जाऊ नये यासाठी अशी भांडी स्वच्छ (How To Remove Burned Oil From A Nonstick Pan) करताना काही गोष्टींची विषेश काळजी देखील घ्यावी लागते. अशा भांड्यांवरील तेलाचे चिकट डाग काढण्यासाठी आपण ही भांडी जोरात घासू शकत नाही, कारण यावरील कोटिंगचा थर निघण्याची भीती असते. हे कोटिंग खराब झाल्यामुळे या पॅनमध्ये काही पदार्थ बनवल्यास ते तव्याच्या पृष्ठभागाला चिकटू लागतात. अशावेळी नेमके काय करावे किंवा नॉनस्टिक भांड्यांची स्वच्छता कशी करावी याची एक खास सोपी ट्रिक पाहूयात(How to Clean a Non-Stick Pan -Easy Methods that Work).

फारसे न घासता देखील नॉन-स्टिक भांडी अशी करा स्वच्छ... 

१. नॉनस्टिक भांडी स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी जे भांड स्वच्छ करणार असाल ते भांड गॅसवर ठेवून हलकेच गरम करून घ्यावे. 

२. या गरम भांडयात चमचाभर मीठ सगळीकडे व्यवस्थित पसरवून घालावे.

चमचाभर मिठाने होतील घरातील 'ही' ८ कामं पटापट, चिमूटभर मिठाची ही पाहा जादू...

३. त्यानंतर यावर नेहमीच्या वापरातील डिशवॉश लिक्विड सोपं पसरवून घालावा. 

४. आता सगळ्यांत शेवटी बर्फाचा एक मोठा तुकडा घेऊन या भांड्यावर गोलाकार पद्धतीने फिरवून. ज्या भागात तेलकट - चिकट डाग असतील त्या भागावर बर्फाचा तुकडा फिरवून घ्यावा. 

फक्त २ मिनिटांत करा मॅगीची भेळ, चहासोबत खाण्यासाठी मस्त चमचमीत पदार्थ, खा मनसोक्त...

५. मग स्वच्छ पाण्याने भांड धुवून घ्यावे. भांड संपूर्णपणे कोरडं होऊ द्यावं मगच स्टोअर करुन ठेवावे. भांड सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्यावे. 

अशा प्रकारे आपण बर्फाचा एक छोटा तुकडा वापरुन देखील अगदी पटकन नॉन-स्टिक भांड्यांवरील तेलकट - चिकट डाग सहज काढू शकतो.

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सस्वच्छता टिप्स