Lokmat Sakhi >Social Viral > नॉनस्टिक भांड्यांचा तेलकट-चिकटपणा जात नाही? वापरुन पहा 'हा' पांढरा पदार्थ, नॉनस्टिक भांडी दिसतील नवी...

नॉनस्टिक भांड्यांचा तेलकट-चिकटपणा जात नाही? वापरुन पहा 'हा' पांढरा पदार्थ, नॉनस्टिक भांडी दिसतील नवी...

How To Clean A Non-Stick Cookware With Toothpaste : How To Remove Burned Oil From A Nonstick Pan : How to Clean Nonstick Pans : How to Clean a Non-Stick Pan -Easy Methods that Work : नॉनस्टिक भांड्यांचे कोटिंग खराब होऊ नये किंवा ती स्वच्छ करण्यासाठी वापरुन पहा नेहमीच्या वापरातील हा पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 17:44 IST2025-01-03T17:30:39+5:302025-01-03T17:44:39+5:30

How To Clean A Non-Stick Cookware With Toothpaste : How To Remove Burned Oil From A Nonstick Pan : How to Clean Nonstick Pans : How to Clean a Non-Stick Pan -Easy Methods that Work : नॉनस्टिक भांड्यांचे कोटिंग खराब होऊ नये किंवा ती स्वच्छ करण्यासाठी वापरुन पहा नेहमीच्या वापरातील हा पदार्थ...

How To Clean A Non-Stick Cookware With Toothpaste How To Remove Burned Oil From A Nonstick Pan How to Clean Nonstick Pans | नॉनस्टिक भांड्यांचा तेलकट-चिकटपणा जात नाही? वापरुन पहा 'हा' पांढरा पदार्थ, नॉनस्टिक भांडी दिसतील नवी...

नॉनस्टिक भांड्यांचा तेलकट-चिकटपणा जात नाही? वापरुन पहा 'हा' पांढरा पदार्थ, नॉनस्टिक भांडी दिसतील नवी...

रोजचा स्वयंपाक करताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांचा वापर करतो. या भांड्यांमध्ये काही भांडी ही नॉनस्टिक किंवा विशेष असे वेगळे कोटिंग केलेली असतात. नॉन-स्टिक पॅन आपल्या सगळ्यांच्याच किचनमधली (How To Clean A Non-Stick Cookware With Toothpaste) एक अतिशय महत्त्वाची वस्तू आहे. नॉन-स्टिक पॅनमध्ये (How To Remove Burned Oil From A Nonstick Pan) एक विशेष कोटिंग असते जे अन्न तव्याला चिकटण्यापासून प्रतिबंधित करते. वापरायला सोपे आणि स्वस्तात मिळणारे नॉनस्टिक पॅन (How to Clean Nonstick Pans) आपली बरीच  कामं सोपी करतात, यात जेवण शिजवणं देखील आरामदायक (How to Clean a Non-Stick Pan -Easy Methods that Work) ठरत. या प्रकारच्या नॉनस्टिक पॅन्सची खासियत वेगळी असते. यात बर्‍याच वेगवेळ्या डिशेस अगदी सहज शिजवल्या जाऊ शकतात ज्या सामान्य पॅनमध्ये बनवणे खूप कठीण असते. 

नॉनस्टिक पॅन्समध्ये अन्न शिजवताना जळत तसेच चिकटत नाही, यामुळेच नॉन-स्टिक पॅनमध्ये अन्न शिजवणे सोपे जाते. असे असले तरीही कालांतराने या नॉनस्टिक पॅन्सचा सतत वापर करून खराब होतात. याचबरोबर, नॉन-स्टिक पॅनच्या स्वच्छतेची वेळीच योग्य ती काळजी घेतली पाहिजे. जर आपण हे नॉन-स्टिक पॅन किंवा इतर नॉन-स्टिक भांडी योग्य पद्धतीने व्यवस्थित स्वच्छ केली नाही तर त्यावरील कोटिंग खराब होऊ लागते. अशा नॉन-स्टिक भांड्यांवरील कोटिंग खराब झाल्यामुळे ही भांडी वापरण्यायोग्य राहत नाही, तसेच अशा भांड्यांचा काहीच उपयोग नसतो.  हे कोटिंग खराब झाल्यामुळे या पॅनमध्ये काही पदार्थ बनवल्यास ते तव्याच्या पृष्ठभागाला चिकटू लागतात. अशावेळी नेमके काय करावे किंवा नॉनस्टिक भांड्यांची स्वच्छता कशी करावी याची एक खास सोपी ट्रिक पाहूयात.     

नॉनस्टिक भांड्यांचा तेलकट-चिकटपणा घालवण्यासाठी टूथपेस्ट वापरा... 

नॉनस्टिक भांडी सतत वापरून खराब होतात किंवा काहीवेळा ही भांडी योग्य पद्धतीने स्वच्छ न केल्यास त्याचे कोटिंग खराब होते. याचबरोबर, काहीवेळा या नॉनस्टिक भांड्यांचा हट्टी तेलकट-चिकटपणा जाता जात नाही. अशावेळी आपण कितीही वेळा ही भांडी स्वच्छ धुवून देखील ही भांडी हवी तशी मनासारखी स्वच्छ होतच नाहीत. अशावेळी या नॉनस्टिक भांड्यांचा हट्टी तेलकट-चिकटपणा घालवण्यासाठी आपण नेहमीच्या वापरातील टूथपेस्टचा वापर करू शकतो. 

संत्र्याच्या सालांचे करा होममेड लिक्विड डिशवॉश, भांड्यांना येईल नवी चमक - होईल पैशांची बचत...

१. नॉनस्टिक भांड्यात सर्वातआधी टूथपेस्ट घेऊन ती सर्वत्र पसरवून घ्यावी. त्यानंतर त्यावर व्हिनेगर, लिक्विड डिशवॉश, आणि लिंबाचा रस घालावा. आता हे सगळे घटक एकत्रित करून भांडी घासण्याच्या स्पंजने हे नॉनस्टिक भांड घासून घ्यावे. टूथपेस्ट आणि इतर पदार्थांची ही तयार पेस्ट नॉनस्टिक भांड्यांवर घासून त्यानंतर ५ ते १० मिनिटे तशीच ठेवून द्यावी. ही पेस्ट संपूर्णपणे सुकल्यानंतर थोड्या कोमट पाण्याने हे भांड स्वच्छ धुवून घ्यावे. यामुळे नॉनस्टिक भांड्यांचा हट्टी तेलकट-चिकटपणा अगदी सहजपणे निघण्यास मदत होते. 

पार्लरमध्ये केली जाणारी महागडी केरेटीन ट्रिटमेंट करा घरीच, होईल पैशांची बचत - केस होतील चमकदार...

२. नॉनस्टिक कुकवेअर स्वच्छ करण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो. यासाठी ही फॉइल बॉलच्या शेपमध्ये मोल्ड करावी आणि नंतर या फॉइल बॉलच्या मदतीने पावडर, साबण किंवा लिक्विडच्या मदतीने ही भांडी धुवावीत. यामुळे भांड्यांवरचे जुने डाग सहजपणे काढले जातात.

३. तुमचा नॉनस्टिक पॅन किंवा कढई खूपच खराब झाली असेल, तर त्याच्या स्वच्छतेसाठी बेकिंग सोडा, व्हिनेगार आणि मीठ एकत्र मिसळून वापरू शकता. ही पेस्ट स्क्रबने भांड्यावर लावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने भांडी धुवा.  

हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्या, कोरडी त्वचा? बस्स वाटीभर दही काफी है! पाहा खास उपाय... 

४. ब्लीचिंग पावडरचा वापर सर्वसामान्यपणे घर किंवा बाहेरची स्वच्छता करण्यासाठी केला जातो; पण नॉनस्टिक भांडी स्वच्छ करण्यासाठीही ही पावडर वापरता येते. यासाठी ब्लीचिंग पावडर गरम पाण्यात मिसळून घ्यावी आणि नंतर त्याच्या साह्याने भांडी स्वच्छ करावीत. या पावडरमुळे कढई आणि पॅनची चकाकी कायम राहील.  

५. नॉनस्टिक जळलेला पॅन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कांद्याचा वापर करू शकता. यासाठी एका पॅनमध्ये कांदा घालून व्यवस्थित उकळून घ्या. या पाण्याने आणि भांडी धुण्याच्या साबणाने किंवा लिक्विड डिशवॉशने स्वच्छ धुवा. यामुळे पॅनला चमक येईल.

Web Title: How To Clean A Non-Stick Cookware With Toothpaste How To Remove Burned Oil From A Nonstick Pan How to Clean Nonstick Pans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.