Join us  

कुलरमधून सतत कुबट वास येतो? दुर्गंधी घरभर पसरते? ४ टिप्स, कुबट वास येणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 1:26 PM

How to Clean a Smelly or Moldy Cooler कुलरमधून कुबट वास घालवण्यासाठी काही सोप्या टिप्स..

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आपण अनेक उपकरणांचा वापर करतो. प्रत्येक घरात फॅन, एसी, कुलरचा वापर होतो. पण यांना नियमित साफ करणे देखील महत्वाचे आहे. वेळेवर साफ न केल्यास यातून दुर्गंधी येते. व ही दुर्गंधी घरभर पसरते. अनेक लोकं कुलरचा वापर करतात. कुलरमुळे घर थंड राहते. व गरमीमुळे होणारी शरीराची लाही - लाही देखील कमी होते.

पण ज्याप्रमाणे कुलरचे फायदे आहेत, त्याचप्रमाणे नुकसान देखील आहेत. कुलरमधून येणारा आवाज, व त्यात असलेल्या पाण्याला कुबट वास येणे, ज्यामुळे कुलर खराब तर होतेच, यासह त्यातून कुबट वास घरभर पसरते. कुलरमधून कुबट वास येऊ नये असे वाटत असेल तर, काही ट्रिक्स आपल्याला मदत करतील. ज्यामुळे कुलरमधून कुबट वास येणार नाही(How to Clean a Smelly or Moldy Cooler).

कुलरमधून वास का येतो?

वेळेवर साफ न केल्यामुळे कुलरमधून कुबट वास येतो. जर आपण आठवड्याला कुलर साफ नाही केले, तर नक्कीच त्यातून कुबट वास येईल. कुलर वेळेवर साफ न केल्यास त्यात किडे देखील तयार होतात. याशिवाय कूलरमधील कूलिंग पॅडमधील साच्यातूनही दुर्गंधी येऊ शकते. अशा परिस्थितीत कुलरला दर आठवड्याला स्वच्छ करा.

बाथरूम १० मिनिटात स्वच्छ चकाचक करण्याच्या ६ टिप्स, दुर्गंधी होईल कमी

कडूनिंबाची पानं

कडूनिंबाची पाने दुर्गंधी आणि बॅक्टेरिया या दोन्हींचा नायनाट करण्यासाठी उपयुक्त ठरते. जर कुलरमधून कुबट वास येत असेल तर, कडूनिंबाच्या पानांचा वापर करून पाहा. यासाठी कडूनिंबाची पानं सुती कापडात बांधून ठेवा. व ही पोटली कुलरच्या पाण्यात ठेवा. या उपायामुळे पाण्यातून दुर्गंधी पसरणार नाही. कडूनिंबाची ही पाने ३ - ४ दिवसांनी बदला.

संत्र्याची साल

संत्र्याच्या सालीचा वापर जास्त कुठे होत नाही. पण याचा वापर आपण कुलरची दुर्गंधी कमी करण्यासाठी करू शकतो. यासाठी संत्र्याची साल सुकवून त्याची पावडर तयार करून घ्या. यात आपण दालचिनी पावडरही मिक्स करू शकता. व ही पावडर कुलर जवळ शिंपडा. यामुळे घरात कुबट वास पसरणार नाही.

मिक्सरच्या भांड्यात ५ गोष्टी बारीक करणे तातडीने थांबवा, म्हणून पाती होतात खराब

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याचा वापर किचनमध्ये जास्त होतो. याच्या वापराने कुलरमधून येणाऱ्या कुबट वासापासून देखील सुटका मिळू शकेल. यासाठी कुलरच्या पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करा. या उपायामुळे कुलरमधून कुबट वास येणार नाही. पण पाणी सतत बदलत राहा.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल