Lokmat Sakhi >Social Viral > रोज वापरुन स्टीलचे चमचे काळेकुट्ट झाले ? बेकिंग सोडा - व्हिनेगरचा सोपा उपाय, चमचे दिसतील चांदीसारखे लख्ख...

रोज वापरुन स्टीलचे चमचे काळेकुट्ट झाले ? बेकिंग सोडा - व्हिनेगरचा सोपा उपाय, चमचे दिसतील चांदीसारखे लख्ख...

Make old tarnished spoons look new again : How to Clean Stainless Steel Cutlery : How to clean stainless steel cutlery at home simple easy : किचनमधील स्टीलच्या चमच्यांवर काळा थर आणि घाण जमा झाली असल्यास असे करा स्वच्छ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 06:26 AM2024-08-30T06:26:35+5:302024-08-30T06:30:19+5:30

Make old tarnished spoons look new again : How to Clean Stainless Steel Cutlery : How to clean stainless steel cutlery at home simple easy : किचनमधील स्टीलच्या चमच्यांवर काळा थर आणि घाण जमा झाली असल्यास असे करा स्वच्छ...

How to clean a stainless steel spoon Easiest Way to Clean Stainless Steel Utensils How to clean stainless steel cutlery at home simple easy | रोज वापरुन स्टीलचे चमचे काळेकुट्ट झाले ? बेकिंग सोडा - व्हिनेगरचा सोपा उपाय, चमचे दिसतील चांदीसारखे लख्ख...

रोज वापरुन स्टीलचे चमचे काळेकुट्ट झाले ? बेकिंग सोडा - व्हिनेगरचा सोपा उपाय, चमचे दिसतील चांदीसारखे लख्ख...

किचनमधील स्टीलचे चमचे हे आपल्या नेहमीच्या वापरातले असतात. कोणताही पदार्थ खाण्यासाठी किंवा पदार्थ तयार करताना तो ढवळण्यासाठी आपण वेगवेगळ्या आकाराचे लहान - मोठे स्टीलचे चमचे वापरतो. आपल्या किचनमध्ये स्टीलच्या धातूंपासून तयार झालेल्या भांड्यांचा वापर हा अधिक प्रमाणात केला जातो. स्टेनलेस स्टीलची भांडी स्वयंपाकघरात दीर्घकाळापासून वापरली जात आहेत(Easiest Way to Clean Stainless Steel Utensils).

स्टेनलेस स्टील हा स्वयंपाकासाठी सर्वोत्तम धातू देखील मानला जातो. या स्टीलच्या चमच्यांचा वापर वारंवार केला जातो त्यामुळे ही स्टीलची भांडी कालांतराने काळी पडू लागतात. या स्टीलचा भांड्यांवरील चमक हळुहळु नाहीशी होते. चमक नाहीशी झालेले हे चमचे फारच जुने दिसू लागतात. स्टीलच्या भांड्यांचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याची चमक, पण चमक हरवली तर ती वापरणे कठीण होते. स्टेनलेस स्टीलचे चमचे आणि काटे घरगुती उपायांद्वारे कसे स्वच्छ केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया(How to clean stainless steel cutlery at home simple easy).

स्टीलचे चमचे नव्यासारखे स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक... 

एका मोठ्या काचेच्या डिशमध्ये अल्युमिनियम फॉईल संपूर्णपणे अंथरुन डिश पूर्ण कव्हर करुन घ्यावी. त्यानंतर त्यात गरम उकळते पाणी ओतावे. आता त्यात व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिक्स करावा. या तयार मिश्रणात किचनमधील स्टीलचे चमचे ३ ते ५ मिनिटे बुडवून ठेवावे. नंतर या मिश्रणातून चमचे बाहेर काढून स्वच्छ पाण्याने आणि लिक्विड डिशवॉशने धुवून घ्यावेत. या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही भांड्यांमध्ये वेगळी चमक पाहू शकता.

टॉवेल धुवूनही मळका - अस्वच्छ दिसतो ? ८ सोप्या टिप्स, रोजच्या वापरातला टॉवेलही दिसेल नव्यासारखा... 


टॉयलेट सीट पिवळी - अस्वच्छ दिसते ? ३ सोपे उपाय, स्वच्छ - पांढरीशुभ्र दिसेल टॉयलेट सीट इन्फेक्शनही टळेल... 

इतर उपाय... 

१. बेकिंग सोडा आणि लिंबू :- एका छोट्या बाऊलमध्ये बेकिंग सोडा घेऊन त्यात लिंबाचा रस मिक्स करुन त्याची थोडी घट्टसर पेस्ट तयार करुन घ्यावी. ही पेस्ट खूपच जाडसर आणि घट्ट झाल्यास आपण त्यात गरजेनुसार पाणी देखील घालू शकता. त्यानंतर स्टीलच्या भांड्यांना ही पेस्ट लावून घ्यावी. ही पेस्ट स्टीलच्या भांड्यांवर किंवा चमच्यांवर किमान तासभर तशीच राहू द्यावी. तासाभरानंतर गरम पाण्याने भांडी स्वच्छ धुवून घ्यावीत. या पेस्टचा वापर केल्याने स्टीलच्या भांड्यांवरील काळपट थर निघून जाऊन भांडी पुन्हा नव्यासारखी स्वच्छ होतात.   

२. भांडी धुतल्यानंतर करा 'हे' काम :- 

धुतल्यानंतर भांड्यांवर पाण्याचे डाग पडतात. त्यामुळे त्याची चमक निस्तेज दिसू लागते. तसेच, भांडी साफ करूनही घाण दिसतात. अशा परिस्थितीत, ही समस्या टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना पाण्याने धुतल्यानंतर स्वच्छ सूती कापड्याने पुसणे. असे केल्याने भांडी चमकताना दिसतात.

Web Title: How to clean a stainless steel spoon Easiest Way to Clean Stainless Steel Utensils How to clean stainless steel cutlery at home simple easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.